३० एप्रिल दिनविशेष

३० एप्रिल दिनविशेष - इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक ३० एप्रिल चे दिनविशेष.
३० एप्रिल दिनविशेष | 30 April in History
३० एप्रिल दिनविशेष (दिनविशेष), छायाचित्र: मराठीमाती अर्काईव्ह.
तुकडोजी महाराज - यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाते. अंधश्रद्धा निर्मूलन व जातिभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले. त्यांनी मराठी व हिंदी भाषांमध्ये काव्यरचना केली आहे.

जागतिक दिवस

३० एप्रिल रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
 • वालपर्जिस दिन: जर्मनी, मध्य व पश्चिम युरोप.
 • राणीचा दिवस: नेदरलँड्स.
 • मुक्ती दिन: व्हियेतनाम.
 • बाल दिन: मेक्सिको.

ठळक घटना (घडामोडी)

३० एप्रिल रोजी घडलेल्या ठळक ऐतिहासिक घटना आणि घडामोडी
 • २००८: रशियाच्या इकॅटेरिनबर्ग शहराजवळ सापडलेल्या अस्थि झारेविच अलेक्सेई निकोलाएविच आणि त्याच्या एका बहिणीच्या असल्याचे रशियाच्या शास्त्रज्ञांनी जाहीर केले.
 • २००९: क्रायस्लर कंपनीने दिवाळे काढले.

जन्म (वाढदिवस, जयंती)

३० एप्रिल रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
 • १६६२: मेरी दुसरी, इंग्लंडची राणी.
 • १७७७: कार्ल फ्रीडरीश गाउस, जर्मन गणितज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ.
 • १८०३: आल्ब्रेख्ट ग्राफ फॉन रून, प्रशियाचा पंतप्रधान.
 • १८९३: होआकिम फॉन रिबेनट्रॉप, नाझी अधिकारी.
 • १९०८: ब्यार्नी बेनेडिक्ट्सन, आइसलँडचा पंतप्रधान.
 • १९०९: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज.
 • १९०९: जुलियाना, नेदरलँड्सची राणी.
 • १९२६: श्रीनिवास खळे, मराठी संगीतकार.
 • १९३३: विली नेल्सन, अमेरिकन संगीतकार.
 • १९४६: कार्ल सोळावा गुस्ताफ, स्वीडनचा राजा.
 • १९४९: अँतोनियो गुतेरेस, पोर्तुगालचा पंतप्रधान.
 • १९५९: स्टीवन हार्पर, कॅनडाचा पंतप्रधान.

मृत्यू (पुण्यतिथी, स्मृती दिवस, बलिदान दिवस, शहीद दिवस)

३० एप्रिल रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
 • ६५: लुकान, रोमन कवी.
 • १०६३: रेन्झॉँग, चीनी सम्राट.
 • १५६४: पोप मार्सेलस दुसरा.
 • १९००: केसी जोन्स, अमेरिकन रेल्वे अभियंता.
 • १९४५: एडॉल्फ हिटलर, जर्मन हुकुमशहा.
 • १९४५: एव्हा ब्रॉन, अ‍ॅडॉल्फ हिटलरची सोबतीण.
 • १९९५: मॉँग मॉँग खा, म्यानमारचा पंतप्रधान.


संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा

एप्रिल महिन्यातील दिनविशेष

नवी नोंद सुचवादुरूस्ती कळवासंदर्भ सूचीअस्वीकरण


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.