२३ एप्रिल दिनविशेष

२३ एप्रिल दिनविशेष - इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक २३ एप्रिल चे दिनविशेष.
२३ एप्रिल दिनविशेष | 23 April in History
२३ एप्रिल दिनविशेष (दिनविशेष). विल्यम शेक्सपियर (इंग्रजी भाषेतले प्रसिद्ध लेखक). चित्र: मराठीमाती अर्काईव्ह.
विल्यम शेक्सपियर - (२६ एप्रिल १५६४ - २३ एप्रिल १६१६) हा इंग्रजी भाषेतले प्रसिद्ध कवी, नाटककार आहे आणि त्यांना “फादर ऑफ ड्रामा” असेही म्हटले जाते. त्यांनी लिहिलेली नाटके व काव्ये इंग्लिश साहित्यात अजरामर आहेत. जगातील सर्व श्रेष्ठ लेखक, नाटककार म्हणून विल्यम शेक्सपिअर यांचे नाव घेतले जाते.

जागतिक दिवस

२३ एप्रिल रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
 • जागतिक पुस्तक दिवस.
 • जागतिक प्रताधिकार दिवस.
 • संयुक्त राष्ट्रांचा इंग्रजी भाषा दिवस.

ठळक घटना (घडामोडी)

२३ एप्रिल रोजी घडलेल्या ठळक ऐतिहासिक घटना आणि घडामोडी
 • १६३५: अमेरिकेतील पहिली सार्वजनिक शाळा बोस्टन लॅटिन स्कूल स्थापन झाली.
 • १८१८: दोनशे युरोपियन व दोनशे एतद्देशीय शिपायांसह इंग्रज अधिकारी मेजर हॉल यास कर्नल प्रॉयर याने रायगड किल्ल्याची टेहळणी करण्यास पाठविले.
 • १९२७: तुर्कस्तान बालदिनाची सुट्टी साजरी करणारा पहिला देश ठरला.
 • १९४२: हिटलरपासून सुटका मिळवण्यासाठी अमेरिकेत स्थायिक झालेला ज्यूवंशी लेखक श्टेफान झ्वाईग आणि त्याची पत्नी यांनी आत्महत्या केली.
 • १९६७: अंतराळवीर व्लादिमिर कोमारोव्ह याला घेऊन सोवियेत संघाचे अंतराळयान सोयुझ-१ अंतराळात प्रक्षेपित केले गेले.
 • १९७१: रझाकार आणि पाकिस्तानी सैन्याने तत्कालीन पूर्व पाकिस्तान (आताचा बांगलादेश) मध्ये ३००० हिंदूंची कत्तल केली.
 • १९८४: एड्स होण्यामागे कारणीभूत असणाऱ्या एच.आय.व्ही. विषाणूचा शोध.
 • १९९०: नामिबियाचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.
 • १९९३: एरिट्रियाने इथियोपियापासून स्वातंत्र्याचा कौल दिला.
 • १९९५: जागतिक पुस्तक दिवस पहिल्यांदा साजरा करण्यात आला.
 • २००५: यूट्यूबचा सहनिर्माता जावेद करीम यांचा पहिला व्हिडीओ यूट्यूबवर प्रकाशित झाला.

जन्म (वाढदिवस, जयंती)

२३ एप्रिल रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
 • ११८५: अफोन्सो दुसरा (पोर्तुगालचे राजे, मृत्यू: २५ मार्च १२२३).
 • १५९८: मार्टेन ट्रॉम्प (डच दर्यासारंग, मृत्यू: ३१ जुलै १६५३).
 • १६२१: विल्यम पेन (इंग्लिश दर्यासारंग, मृत्यू: १६ सप्टेंबर १६७०).
 • १६२८: योहान व्हान वेवरेन हड्डे (डच गणितज्ञ, मृत्यू: १५ एप्रिल १७०४).
 • १७९१: जेम्स बुकॅनन (अमेरिकेचे १५वे राष्ट्राध्यक्ष, मृत्यू: १ जून १८६८).
 • १८५८: मॅक्स प्लॅंक (जर्मन भौतिकशास्त्रज्ञ, मृत्यू: ४ ऑक्टोबर १९४७).
 • १८५८: पंडिता रमाबाई सरस्वती (समाजसुधारक, मृत्यू: ५ एप्रिल १९२२).
 • १८७३: महर्षी विठ्ठल रामजी शिंदे (अस्पृश्यता निवारणचे काम करणारे समाजसुधारक, मृत्यू: २ जानेवारी १९४४).
 • १८९७: लेस्टर बी. पियरसन (नोबेल पारितोषिकविजेते कॅनडाचे १४वे पंतप्रधान, मृत्यू: २७ डिसेंबर १९७२).
 • १९३८: एस. जानकी (शास्त्रीय गायिका, हयात).
 • १९४१: पाव्हो लिप्पोनेन (फिनलंडचा पंतप्रधान, हयात).
 • १९८३: डॅनियेला हंतुखोवा (टेनिस खेळाडू, हयात.).

मृत्यू (पुण्यतिथी, स्मृती दिवस, बलिदान दिवस, शहीद दिवस)

२३ एप्रिल रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
 • १६१६: विल्यम शेक्सपियर, इंग्लिश साहित्यिक. (जन्म: २६ एप्रिल १५६४).
 • १८५०: विल्यम वर्डस्वर्थ (इंग्लिश कवी, जन्म: ७ एप्रिल १७७०).
 • १९२६: हेन्री बी. गप्पी (ब्रिटिश वनस्पतिशास्त्रज्ञ, जन्म: २३ डिसेंबर १८५४).
 • १९६८: बडे गुलाम अली खाँ ऊर्फ सबरंग (पतियाळा घराण्याचे गायक व वीणावादक, जन्म: २ एप्रिल १९०२).
 • १९८६: जिम लेकर (इंग्लिश क्रिकेट खेळाडू, जन्म: ९ फेब्रुवारी १९२२).
 • १९९२: सत्यजित रे (चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक, जन्म: २ मे १९२१).
 • १९९७: डेनिस कॉम्पटन (इंग्लिश क्रिकेटपटू, जन्म: २३ मे १९१८).
 • २००१: जयंत श्रीधर तथा जयंतराव टिळक (संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे एक नेते, गोवा मुक्ती संग्रामातील एक सेनापती, लोकमान्य टिळकांचे नातू, पत्रकार, महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष व केसरीचे संपादक, जन्म: १२ ऑक्टोबर १९२१).
 • २००७: बोरिस येल्त्सिन (रशियन राष्ट्राध्यक्ष, जन्म: १ फेब्रुवारी १९३१).


संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा

एप्रिल महिन्यातील दिनविशेष

नवी नोंद सुचवादुरूस्ती कळवासंदर्भ सूचीअस्वीकरण


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.