३ एप्रिल दिनविशेष

३ एप्रिल दिनविशेष - इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक ३ एप्रिल चे दिनविशेष.
३ एप्रिल दिनविशेष | April 3 in History
छत्रपती शिवाजी महाराज यांची पुण्यतिथी (३ एप्रिल दिनविशेष), चित्र: मराठीमाती अर्काईव्ह.
छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी - (३ एप्रिल १६८०) ४ फेब्रुवारी १६८० रोजी छत्रपती शिवाजी महाराज सज्जनगडावरून रायगडास परतले. ७ मार्च १६८० रायगडावर राजाराम महाराजांचे मौंजीबंधन झाले. १५ मार्च १६८० रोजी राजाराम महाराजांचा विवाह झाला. विवाह समारंभानंतर काही दिवसांनी छत्रपती शिवाजी महाराज हे आजारी पडले. नवज्वराचा ताप असावा. रक्ताच्या उलट्या होऊन महाराजांचा रायगडावर मृत्यू झाला (असे फार्सी कागदपत्रांत म्हटले आहे). इंग्रज वखारींच्या कागदपत्रांत रक्ताचा अतिसार झाला असे लिहिले आहे (महाराजांच्या मृत्यूविषयी विश्वासार्ह पुरावा अद्याप ज्ञात झालेला नाही).

जागतिक दिवस

३ एप्रिल रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
 • -

ठळक घटना (घडामोडी)

३ एप्रिल रोजी घडलेल्या ठळक ऐतिहासिक घटना आणि घडामोडी
 • १८८५: वेगवान पेट्रोल इंजिन बनवणाऱ्या गोटिलीप डाईमला यांना इंजिन रचनेचे पेटंट मिळाले.
 • १८९५: ऑस्कर वाईल्डची अपकीर्ती करणारा खटला सुरू. वाईल्ड समलैंगिक असल्याने त्याची रवानगी तुरुंगात झाली.
 • १९२७: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत भारत हे पाक्षिक सुरू केले.
 • १९३३: एव्हरेस्ट शिखरावरून पहिले विमान गेले.
 • १९४८: जेजू, द. कोरिया इथे नागरी युद्धातून सामूहिक हत्याकांड.
 • १९४८: ओरिसा उच्च न्यायालयाची स्थापना झाली.
 • १९७३: मोटोरोला कंपनीच्या मार्टीन कूपर यांनी पहिल्या मोबाईल फोनमधून बेल लॅब्जमधे पहिला कॉल केला.
 • १९७५: अनातोली कारपॉव्हविरोधात बॉबी फिशरने लढत नाकारल्यामुळे कारपॉव्ह विश्वविजेता बनला.
 • १९८१: पहिला सहज हलवता येण्यासारखा संगणक सॅन फ्रान्सिस्कोमधे प्रदर्शित.
 • १९८४: भारताचा पहिला अवकाश यात्री राकेश वर्मा याची अंतराळ प्रवासास सुरूवात.
 • १९९८: प्रवासी बॅगा बनवणाऱ्या 'सॅमसोनाईट'च्या पहिल्या भारतीय प्रकल्पाचे उद्घाटन.
 • २०००: आयएनएस आदित्य हे इंधन पुरवणारे संपूर्ण भारतीय बनावटीचे वेगवान जहाज नौदलाच्या ताफ्यात दाखल झाले.
 • २०१०: ऍपल कंपनी ने आयपॅड या टॅब्लेट संगणकाची पहिली आवृत्ती जाहीर केली.

जन्म (वाढदिवस, जयंती)

३ एप्रिल रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
 • १३६७: हेन्री चौथा (इंग्लंडचा राजा, मृत्यू: २० मार्च १४१३).
 • १५२९: मायकेल नियांडर (जर्मन गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ, मृत्यू: २३ ऑक्टोबर १५८१).
 • १५९३: जॉर्ज हर्बर्ट (इंग्लिश कवी, मृत्यू: १ मार्च १६३३).
 • १८८१: ऍल्सिदे दि गॅस्पेरी (इटलीचा पंतप्रधान, मृत्यू: १९ ऑगस्ट १९५४).
 • १८८२: द्वारकानाथ माधव पितळे उर्फ नाथमाधव (सामाजिक व ऐतिहासिक कादंबरीकार. त्यांच्या ’वीरधवल’, ’रायक्लब’ अथवा सोनेरी टोळी’ या कादंबर्‍यांनी वाचकांना अक्षरश: वेड लावले होते, मृत्यू: २१ जून १९२८).
 • १९०३: कमलादेवी चट्टोपाध्याय (मॅगसेसे पुरस्कार विजेत्या स्वातंत्र्यसैनिक, मृत्यू: २९ ऑक्टोबर १९८८).
 • १९१३: पेर बॉर्टेन (नॉर्वेचा पंतप्रधान, मृत्यू: २० जानेवारी २००५).
 • १९१४: सॅम माणेकशा (फील्ड मार्शल, मृत्यू: २७ जून २००८).
 • १९२६: गस ग्रिसम (अमेरिकन अंतराळयात्री, मृत्यू: २७ जानेवारी १९६७).
 • १९३०: हेलमुट कोल (जर्मनीचा चान्सेलर, मृत्यू: १६ जून २०१७).
 • १९४२: वेन न्यूटन (अमेरिकन संगीतकार, हयात).
 • १९४६: हॅना सुचोका (पोलंडची पहिली स्त्री पंतप्रधान, हयात).
 • १९४८: कार्लोस सलिनास (मेक्सिकोचा राष्ट्राध्यक्ष, हयात).
 • १९५५: हरिहरन (भारतीय सुप्रसिद्ध गायक, मृत्यू: हयात).
 • १९६२: जयाप्रदा (प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेत्री व संसद सदस्य, हयात).
 • १९६५: नाझिया हसन (हिंदी पॉप गायिका, मृत्यू: १३ ऑगस्ट २०००).
 • १९७३: निलेश कुलकर्णी (भारतीय क्रिकेट खेळाडू, हयात).
 • १९७३: प्रभु देवा (भारतीय नर्तक, नृत्यदिग्दर्शक, हयात).

मृत्यू (पुण्यतिथी, स्मृती दिवस, बलिदान दिवस, शहीद दिवस)

३ एप्रिल रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
 • १२८७: ऑनरियस चौथा (पोप, जन्म: १२१०).
 • १६८०: छत्रपती शिवाजीराजे भोसले (मराठा साम्राज्याचे संस्थापक, जन्म: १९ फेब्रुवारी १६३०).
 • १९८५: डॉ. वासुदेव विष्णू मिराशी (महामहोपाध्याय, संस्कृत विद्वान, प्राच्यविद्यासंशोधक, जन्म: १३ मार्च १८९३).
 • १८९७: योहान्स ब्राह्म्स (जर्मन संगीतकार, जन्म: ७ मे १८३३ ).
 • १९४१: पाल तेलेकी (हंगेरीचा पंतप्रधान, जन्म: १ नोव्हेंबर १८७९).
 • १९९१: ग्रॅहाम ग्रीन (इंग्लिश लेखक, जन्म: २ ऑक्टोबर १९०४).
 • १९९८: हरकिसन मेहता (प्रसिद्ध गुजराती कादंबरीकार, जन्म: २५ मे १९२८).
 • २०१७: अजेय माधव झणकर (ज्येष्ठ लेखक, गीतकार, दिग्दर्शक तसेच जाहिरातींपासून हॉलिवूडपटापर्यंत निर्मिती करणारे व बहुआयामी ओळख असलेले, जन्म: १ सप्टेंबर १९५९).
 • २०१७: किशोरीताई आमोणकर (ज्येष्ठ शास्त्रीय गायिका, जन्म: १० एप्रिल १९३१).


संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा

एप्रिल महिन्यातील दिनविशेष

नवी नोंद सुचवादुरूस्ती कळवासंदर्भ सूचीअस्वीकरण


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.