२१ जून दिनविशेष - इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक २१ जून चे दिनविशेष.

रीमा लागू - (२१ जून १९५८ - १८ मे २०१७) रीमा लागु यांचे ‘ती फुलराणी’ या मराठी नाटकाच्या माध्यमातून रीमा लागु यांचा अभिनय क्षेत्रातील प्रवास सुरू झाला. पुढे त्यांनी मराठी, हिंदी आणि भोजपुरी चित्रपटातून देखील भुमीका केल्या. भारतीय चित्रपटसृष्टी सोबतच मराठी आणि गुजराथी नाटकांतही त्यांनी अभिनय केला आहे. मराठी भाषेतील ‘सिंहासन’, हिंदी भाषेतील ‘मैने प्यार किया’ या चित्रपटांतील त्यांच्या भुमीका लक्षवेधी ठरल्या.
जागतिक दिवस
२१ जून रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस- उत्तर गोलार्धातील वर्षातला सर्वात मोठा दिवस.
- दक्षिण गोलार्धातील वर्षातला सर्वात छोटा दिवस.
- या दिवसाला summer solstice दिवस म्हणतात.
- आंतरराष्ट्रीय योग दिवस.
- स्थानिक रहिवासी दिन: कॅनडा.
- राष्ट्र दिन: ग्रीनलॅंड.
ठळक घटना (घडामोडी)
२१ जून रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी- १७४९: कॅनडाच्या नोव्हा स्कॉशिया प्रांतात हॅलिफॅक्स शहराची स्थापना.
- १७८८: न्यू हॅम्पशायर अमेरिकेचे नववे राज्य झाले.
- १८७७: पेनसिल्व्हेनियात १० कामगार नेत्यांना फाशी देण्यात आली.
- १८९८: गुआम अमेरिकेचा प्रांत झाला.
- १९४०: दुसरे महायुद्ध - फ्रांसने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.
- १९४२: दुसरे महायुद्ध - जर्मन सैन्याने टोब्रुक जिंकले.
- १९४५: दुसरे महायुद्ध - ओकिनावाची लढाई संपली.
- १९४८: स्मॉल स्केल एक्सपरिमेंटल मशीन या जगातील पहिल्या संचयित आज्ञावली संगणकाने आपली पहिली आज्ञावली पार पाडली.
- १९४८: चक्रवर्ती राजगोपालाचारी पहिले भारतीय गव्हर्नर जनरल झाले.
- १९४९: राजस्थान उच्च न्यायालयाची स्थापना.
- १९५७: एलेन फेअरक्लो यांनी कॅनडाच्या पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.
- १९६१: अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी समुद्राच्या खाऱ्या पाण्याचे गोड्या पाण्यात रूपांतर करणारे यंत्र विकसित केले.
- १९६४: अमेरिकेत मिसिसिपी राज्यात समान हक्कांसाठी आंदोलन करणार्या ३ व्यक्तींना कु क्लुक्स क्लॅनने ठार मारले.
- १९७५: वेस्ट इंडीजने पहिला क्रिकेट विश्वचषक जिंकला.
- १९८९: अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने देशाचा ध्वज जाळण्याची कृती ही वाचास्वातंत्र्याची अभिव्यक्ती असल्यामुळे वैध ठरवली.
- १९९१: पी.व्ही.नरसिंह राव भारताच्या पंतप्रधानपदी.
- १९९२: डॉ. रघुनाथ माशेलकर यांना मध्य प्रदेश सरकारतर्फे जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय पारितोषिक जाहीर.
- १९९५: पर्यावरणक्षेत्रात विशेष कार्य केल्याबद्दल पर्यावरणतज्ञ रश्मी मयूर यांना अमेरिकेतील द युनिटी इन योग इंटरनॅशनल या संस्थेने विशेष सन्मान जाहीर केला.
- १९९८: फ्रँकफर्ट बुद्धिबळ महोत्सवात विश्वनाथन आनंदने फ्रिट्झ-५ या संगणकाचा पराभव केला.
- १९९९: विश्वकरंडक स्पर्धेत १००० धावा पूर्ण करणारा मार्क वॉ हा चौथा खेळाडू ठरला.
- २००४: स्पेसशिपवन या पहिल्या खाजगी अंतराळयानाचे पहिले उड्डाण.
- २००६: नवीनच शोध लागलेल्या प्लूटोच्या उपग्रहांचे निक्स व हायड्रा असे नामकरण करण्यात आले.
- २०१५: जागतिक योग दिनाची पराक्रमी सुरवात.
जन्म (वाढदिवस, जयंती)
२१ जून रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे- १७८: सिमिओन-डेनिस पॉइसॉन (फ्रेंच गणितज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ, मृत्यु: २५ एप्रिल १८४०).
- १९१२: विष्णू प्रभाकर (भारतीय लेखक व नाटककार, मृत्यू: ११ एप्रिल २००९).
- १९२३: सदानंद रेगे (मराठी कवी, कथाकार आणि अनुवादक, मृत्यू: २१ सप्टेंबर १९८२).
- १९५२: जेरमी कोनी (न्यूझीलंडचा क्रिकेटपटू).
- १९५३: बेनझीर भुट्टो (पाकिस्तानच्या पंतप्रधान, मृत्यू: २७ डिसेंबर २००७).
- १९५८: रीमा लागू (भारतीय अभिनेत्री, मृत्यू: १८ मे २०१७).
- १९६७: पियरे ओमिदार (ईबे (eBay) चे स्थापक).
मृत्यू (पुण्यतिथी, स्मृती दिवस, बलिदान दिवस, शहीद दिवस)
२१ जून रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे- १८७४: अँडर्स योनास अँग्स्ट्रॉम (स्वीडीश भौतिकशास्त्रज्ञ, जन्म: १३ ऑगस्ट १८१४).
- १८९३: लिलॅंड स्टॅनफोर्ड (अमेरिकन उद्योगपती; स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीचे संस्थापक, जन्म: ९ मार्च १८२४).
- १९२८: नाथमाधव तथा द्वारकानाथ माधव पितळे (मराठी कादंबरीकार, जन्म: ३ एप्रिल १८८२).
- १९४०: केशव बळीराम हेडगेवार (भारतीय हिंदुराष्ट्रवादी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक व पहिले सरसंघचालक, जन्म: १ एप्रिल १८८९).
- १९५७: योहानेस श्टार्क, नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ, जन्म: १५ एप्रिल १८७४).
- १९७०: सुकर्णो (इंडोनेशियाचा राष्ट्राध्यक्ष, जन्म: ६ जून १९०१).
- १९८४: अरुण सरनाईक (मराठी चित्रपट अभिनेता, जन्म: ६ जून १९०१).
- २००३: लिऑन युरिस (अमेरिकन कादंबरीकार, जन्म: ३ ऑगस्ट १९२४).
- २०१२: भालचंद्र दत्तात्रय खेर (लेखक पत्रकार, जन्म: १२ जून १९१७).
- २०१२: सुनील जना (भारतीय छायाचित्रकार आणि पत्रकार, जन्म: १७ एप्रिल १९१८).
- २०२०: जीत सिंग नेगी (आधुनिक घरवल लोकसंगीताचे जनक, जन्म: २ फेब्रुवारी १९२५).
- २०२०: राजिंदर गोयल (रणजी ट्रॉफीमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम करणारे भारतीय क्रिकेटपटू, जन्म: २० सप्टेंबर १९४२).
२१ जून दिनविशेष संबंधी महत्त्वाचे दुवे:
जून महिन्यातील दिनविशेष | ||||||
---|---|---|---|---|---|---|
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ |
८ | ९ | १० | ११ | १२ | १३ | १४ |
१५ | १६ | १७ | १८ | १९ | २० | २१ |
२२ | २३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ |
२९ | ३० | |||||
तारखेप्रमाणे जून महिन्यातील सर्व दिनविशेष पहा. |
आज
सर्व विभाग / सेवा सुविधा / मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / जून महिन्यातील दिनविशेष
विभाग -
जानेवारी दिनविशेष · फेब्रुवारी दिनविशेष · मार्च दिनविशेष · एप्रिल दिनविशेष · मे दिनविशेष · जून दिनविशेष · जुलै दिनविशेष · ऑगस्ट दिनविशेष · सप्टेंबर दिनविशेष · ऑक्टोबर दिनविशेष · नोव्हेंबर दिनविशेष · डिसेंबर दिनविशेष
विषय -
जानेवारी · फेब्रुवारी · मार्च · एप्रिल · मे · जून · जुलै · ऑगस्ट · सप्टेंबर · ऑक्टोबर · नोव्हेंबर · डिसेंबर
अभिप्राय