Loading ...
/* Dont copy */ body{user-select:none;-moz-user-select:none;-ms-user-select:none;-khtml-user-select:none;-webkit-user-select:none;-webkit-touch-callout:none} pre, code, kbd, .cmC i[rel=pre]{user-select:text;-moz-user-select:text;-ms-user-select:text;-khtml-user-select:text;-webkit-user-select:text;-webkit-touch-callout:text}

रघुनाथ अनंत माशेलकर (मातीतले कोहिनूर)

रघुनाथ अनंत माशेलकर (मातीतले कोहिनूर) - जिथे न्यूटनने सही केली आहे, त्या पुस्तकात स्वाक्षरी करण्याचा सन्मान मिळवणारे पहिले महाराष्ट्रीय.

रघुनाथ अनंत माशेलकर (मातीतले कोहिनूर)

जिथे न्यूटनने सही केली आहे, त्या पुस्तकात स्वाक्षरी करण्याचा सन्मान मिळवणारे पहिले महाराष्ट्रीय


रघुनाथ अनंत माशेलकर (मातीतले कोहिनूर)

आयुष्यातली कमीतकमी १२ वर्षं तरी अनवाणी पायांनी चालणारे, सार्वजनिक दिव्याखाली अभ्यास करणारे पुढे इंग्लंडमध्ये, जिथे न्यूटनने सही केली आहे, त्या पुस्तकात स्वाक्षरी करण्याचा सन्मान मिळवणारा पहिला महाराष्ट्रीय म्हणजे रघुनाथ अनंत माशेलकर.


रघुनाथ अनंत माशेलकर (बालगंधर्व रंगमंदिर, पुणे). छायाचित्र: हर्षद खंदारे


साधारणपणे १९५० ते १९६० या दशकातली घटना! मुंबईच्या युनियन हायस्कूल या शाळेत घडलेली. शाळा तशी गरीब परिस्थितीतली, पण तिथले शिक्षक मात्र श्रीमंत! धनाने नव्हे बरं ज्ञानाने. तिथेच भावे सर पदार्थविज्ञान शिकवायचे. प्रयोग करुन, विद्यार्थ्यांना अनुभव देऊन शिकवण्यावर त्यांचा विश्र्वास होता. साबण कसा करायचा, हे पाठ करुन परीक्षेत लिहिलं तर पूर्ण गुण मिळतात हे माहिती असून त्यांनी मुलांना, शिवडीला हिंदुस्तान लिव्हरचा साबणाचा कारखाना बघायला नेलं होतं. एकदा बहिर्गोल भिंगाविषयी शिकवताना, त्यांनी सर्व मुलांना शाळेबाहेर उन्हात नेलं. भिंग खालीवर करुन, कागदावर एक प्रखर बिंदू मिळवला. त्यावर सूर्यकिरण एकवटले गेले होते. कागद जळू लागला. त्या क्षणी भावे सरांनी, आपल्या एका बुद्धिमान विद्यार्थ्याला हाक मारली, ‘माशेलकर, तूही जर या भिंगाप्रमाणे, तुझ्यातल्या सर्व शक्ती एकवटल्यास तर जगात काहीही मिळवू शकशील.’ या घटनेने, जीवनात यशस्वी होण्याची गुरुकिल्ली माशेलकरांच्या ओंजळीत पडली आणि माशेलकरांसारखा एक प्रतिभावंत वैज्ञानिक भारताच्या ओंजळीत! सूर्यकिरण समांतर जाऊ दिली तर त्यांच्यात प्रचंड शक्ती असूनही त्याचा वापर होत नाही.

ही शक्ती एकवटली तर मात्र किमया घडवू शकते, हे तत्वज्ञान छोटया रघुनाथच्या मनात खोलवर रुजलं. पुढे हेच रघुनाथ माशेलकर, सी. एस. आय. आर. चे प्रमुख झाले. प्रमुखपदाची सूत्रं हातात घेतली, तेव्हाही त्यांच्या मनात हीच भिंगाची घटना घुटमळत होती. त्या वेळी सी. एस. आय. आर. मध्ये २८,००० लोक कार्यरत होते. देशभर जागोजागी प्रयोगशाळा वसवल्या होत्या. परंतु त्या अपेक्षितपणे काम करत नव्हत्या. माशेलकरांनी व्हिजन नावाची योजना आखली. चाळीस प्रयोगशाळांचं समांतर चालणं थांबवून, त्यांना एका ध्येयाने आणि काम करण्याच्या एका विशिष्ट पद्धतीने बांधलं आणि मग त्यातून निर्माण झालं, भारतीय वैज्ञानिक संशोधनाचं एक अचाट पर्व! एका सृजनशील शिक्षकाने, एका विध्यार्थ्याला दिलेल्या गुरुमंत्राने, भारताच्या प्रगतीच्या इतिहासात मोलाची कामगिरी घडवली.


मुंबईतल्या पालिकेच्या शाळेतल्या शिक्षकांनी माशेलकरांचं आयुष्य घडवलं. त्यांच्या आई, हे रघुनाथ अनंत माशेलकर यांचं प्रमुख प्रेरणास्थान!


रघुनाथ माशेलकरांचा जन्म कोकणातल्या माशेल गावाचा. बालपण मुंबईत गेलं. मुंबईतल्या पालिकेच्या शाळेतल्या शिक्षकांनी माशेलकरांचं आयुष्य घडवलं. त्यांच्या आई, हे त्यांचं प्रमुख प्रेरणास्थान! शिवणकाम किंवा मिळेल ते काम करुन माशेलकरांच्या आई काही कमाई करत असत. एकदा त्या गिरगावातल्या काँग्रेस भवनात काम मागण्यासाठी गेल्या. संबंध दिवस तिथे उभं राहूनदेखील त्यांना काम दिलं गेलं नाही. त्या कामासाठी तिसरी उतीर्ण असणं आवश्यक होतं आणि माशेलकरांच्या आईंचं तेवढं शिक्षण नव्हतं. खोटं बोलून त्यांना कदाचित ते काम मिळवता आलं असतंही. पण तसं न करता, त्यांनी स्वतःच्याच मनाशी निर्धार केला, आज माझं शिक्षण नाही म्हणून मला काम मिळालं नाही, पण माझ्या मुलाला मात्र मी जगातलं सर्वोच्च शिक्षण देईन. हा निर्धार पुरा करण्यासाठी त्यांनी प्रचंड कष्ट घेतले.

अकरावीच्या परीक्षेत रघुनाथ माशेलकर बोर्डाच्या मेरिटमध्ये आले. पण परिस्थितीमुळे त्यांनी पुढे न शिकण्याचं ठरवलं. इथेही आईच्या आग्रहामुळे त्यांनी बी. केम. ला प्रवेश घेतला आणि १९६९ साली मुंबई विद्यापीठाच्या रसायन अभियांत्रिकी विभागाच्या तत्कालीन संचालक प्रा. एम्‌. एम्‌. शर्मा या अत्यंत सृजनशील संचालकाच्या मार्गदर्शनाखाली, माशेलकरांनी आपली पी.एच.डी. ची पदवी प्राप्त केली. युरोपमधील सल्फोर्ड विद्यापीठात जाऊन पोस्ट डॉक्टरल संशोधनही केलं.

आयुष्यातली कमीतकमी १२ वर्ष तरी अनवाणी पायांनी चालणारे, सार्वजनिक दिव्याखाली अभ्यास करणाही ही व्यक्ती पुढे इंग्लंडमध्ये, जिथे न्यूटनने सही केली आहे, त्या पुस्तकात स्वाक्षरी करण्याचा सन्मान मिळवणारे पहिले महाराष्ट्रीय ठरले. डॉ. रघुनाथ अनंत माशेलकर यांचा उल्लेख आला की त्याबरोबर लगेचच आठवते ती त्यांनी जिंकलेली आगळीवेगळी हळदीघाटची लढाई! आपल्या सर्वांनाच हळदीचे औषधी गणुधर्म माहिती आहेत. जखम झाल्यावर त्यावर हळद लावण्याचा रामबाण उपाय, आपल्या देशात पूर्वापार वापरला जातोय. असं असताना एक दिवस सकाळी पेपर वाचत असताना एका विचित्र बातमीनं डॉक्टरांचं लक्ष वेधलं. अमेरिकेने हळदीच्या औषधी वापरावर आपले हक्क असल्याचं त्या बातमीत म्हटलं होतं. थोडक्यात अमेरिकेने हळदीचं पेटंट घेतलं होतं. बातमी वाचताच माशेलकर बैचेन झाले.

आपल्याकडे अनेक पिढया चालत आलेलं हे ज्ञान, कोणीतरी स्वतःचं असल्याचा राजरोस दावा करतोय, हे योग्य नव्हे. यावर अमेरिकेशी न्यायालयीन लढाई करुन आपले हक्क आपण राखले पाहिजेत, असा पक्का विचार करुन डॉक्टर कामाला लागले. जोरदार न्यायालयीन लढाई झाली. हळदीचे गुणधर्म सांगणारे अनेक संस्कृत श्लोक, पाली भाषेत हळदीबद्दल लिहिले गेलेले संदर्भ, अनेक कागदपत्रं जमा करुन, त्या सर्वांचा अभ्यास करुन, डॉक्टर आणि त्यांच्या सहकार्‍यांनी ही अमेरिकेविरुद्धची हळदीघाटची लढाई जिंकली. यातून दोन चांगले परिणाम झाले. एक तर आपल्या ज्ञानाचे हक्क आपल्याकडे राहिले आणि दुसरा दूरगामी फायदा झाला. तो असा की, आपल्या पारंपरिक ज्ञानाची किंमत आपल्याला आणि सार्‍या जगाला कळली.

अमेरिकेसारख्या बलाढय राष्ट्राला भारतीय ज्ञानाचं महत्त्व कळलं आणि आपण दुसर्‍यांच्या ज्ञानावर आपला हक्क सांगायचा नाही हा धडाही मिळाला. हाच प्रकार बासमती तांदळाच्या बाबतीतही घडला. त्याचेही पेटंट माशेलकरांनी परत मिळवले. सर जगदीशचंद्र बोस यांनी बिनतारी संदेश यंत्रणेचा म्हणजे वायरलेसचा शोध लावला, पण त्या शोधाचं श्रेय मात्र मार्कोनीला मिळालं. कारण बोस यांनी पेटंट घेतलं नाही, ते सर्व करुन मार्कोनीने सर्व अधिकार स्वतःकडे घेतले. १८९८ मध्ये बोस यांनी वायरलेस शोधलं होतं.

त्यानंतर १९९८ साली म्हणजे बरोबर १०० वर्षांनी बासमतीची लढाई जिंकून त्याचंही पेटंट डॉ. माशेलकरांनी मिळवले. बोस ते बासमती अशा या ज्ञानाचा हक्क मिळवण्याच्या प्रवासात डॉ. माशेलकरांनी महत्त्वाची भूमिका बजावली. औषधांपासून ते खतांपर्यंत, जीवनोपयोगी रसायनांपासून ते गृहिणींसाठी छोटे उद्योग वसवून देण्यापर्यंत, अनेक लहान मोठया व्यवसायात डॉ. रघुनाथ माशेलकरांनी मार्गदर्शन केलं. व्यवस्थापनापासून ते स्वतः प्रयोगशाळेत संशोधन करण्यापर्यंत जातीने काम केलं आणि आजही ते तितक्याच जोमाने कार्यरत आहेत. सकारात्मक विचारांचा प्रचंड उस्फूर्त असा प्रवाह अनुभवायचा असेल तर डॉ. रघुनाथ माशेलकरांच्या सहवासात आयुष्यातले काही क्षण तरी घालवावेत; ते शक्य नसेल तर त्यांचे भाषण जिथे कुठे असेल तिथे ऐकायला जावं. तेही शक्य नसेल तर त्यांनी लिहिलेले भारताच्या प्रगतीच्या कल्पनांविषयीचे लेख वाचावेत आणि मग आपल्या लक्षात येईल की, जगद्विख्यात रसायनशास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर हे जबरदस्त सकारात्मक विचारांच्या मुशीतून घडलेलं, काही एक वेगळंच रसायन आहे.

भारताच्या अतिप्रचंड लोकसंख्येबद्दल आपण सर्वच जण चिंता व्यक्त करत असतो. पण त्याहीकडे पाहाण्याचा माशेलकरांचा दृष्टीकोन आपल्याला त्यांच्या सकारात्मकतेचं दर्शन घडवतो. ते म्हणतात, 'भारताची भव्य लोकसंख्या हाच एक मोठा खजिना आहे. भारतात वैचारिक स्वातंत्र्य असल्यामुळे जेवढी माणसं जास्त, तेवढया नवनवीन कल्पना पुढे येण्याला वाव. त्यातच भारतातली ५५ टक्क्याहून जास्त मंडळी तिशीच्या घरातली आहेत. म्हणजे हा तरुणांचा देश, अनेक नवनवीन धडाडीची कामं करु शकेल आणि भारतातली सांस्कृतिक विविधता देशाला अधिक सृजनशील बनवेल. मराठीवर मनापासून प्रेम करणारे, मायबोलीतून विचार केल्यामुळे मी यशस्वी झालो’ असं सांगणारे डॉ. रघुनाथ अनंत माशेलकर, आपल्या तरुणांसाठी, खास करुन मराठी युवकांसाठी स्फूर्तिस्थान ठरावेत! पण हा आहे फक्त ट्रेलर, संपूर्ण चित्रपट ज्याला ज्याला शक्य होईल त्याने जरुर पहावा!ग्रेट भेट: डॉ. रघुनाथ अनंत माशेलकर (भाग १) (व्हिडिओ)- डॉ. मानसी राजाध्यक्ष

नाव

अंधश्रद्धेच्या कविता,5,अकोला,1,अजय दिवटे,1,अजित पाटणकर,18,अनंत दळवी,1,अनिकेत शिंदे,1,अनिल गोसावी,2,अनुभव कथन,14,अनुराधा फाटक,39,अनुवादित कविता,1,अपर्णा तांबे,7,अब्राहम लिंकन,2,अभंग,3,अभिव्यक्ती,1066,अमन मुंजेकर,7,अमरश्री वाघ,2,अमरावती,1,अमित पडळकर,4,अमित पवार,1,अमित पापळ,31,अमित बाविस्कर,3,अमुक-धमुक,1,अमोल देशमुख,1,अमोल वाघमारे,1,अमोल सराफ,2,अरविंद थगनारे,1,अर्थनीति,3,अश्विनी तातेकर-देशपांडे,1,अहमदनगर,1,अक्षय वाटवे,1,अक्षरमंच,827,आईच्या कविता,21,आईस्क्रीम,3,आकाश पवार,2,आकाश भुरसे,8,आज,4,आजीच्या कविता,1,आठवणींच्या कविता,17,आतले-बाहेरचे,3,आतिश कविता लक्ष्मण,1,आत्मविश्वासाच्या कविता,11,आदित्य कदम,1,आनंद दांदळे,8,आनंद प्रभु,1,आनंदाच्या कविता,23,आभिजीत टिळक,2,आमट्या सार कढी,18,आर समीर,1,आरती गांगन,2,आरती शिंदे,4,आरत्या,82,आरोग्य,20,आशिष खरात-पाटील,1,इंदिरा संत,3,इंद्रजित नाझरे,26,इंद्रजीत भालेराव,1,इतिहास,7,इसापनीती कथा,46,उदय दुदवडकर,1,उन्मेष इनामदार,1,उपवासाचे पदार्थ,15,उमेश कानतोडे,1,उमेश कुंभार,12,उस्मानाबाद,1,ऋग्वेदा विश्वासराव,5,ऋचा पिंपळसकर,10,ऋचा मुळे,18,ऋषिकेश शिरनाथ,2,एच एन फडणीस,1,एप्रिल,30,एहतेशाम देशमुख,2,ऑक्टोबर,31,ऑगस्ट,31,ऑडिओ कविता,12,ओंकार चिटणीस,1,ओम ढाके,8,औरंगाबाद,1,कपिल घोलप,11,करमणूक,60,कर्क मुलांची नावे,1,कविता शिंगोटे,1,कवितासंग्रह,40,कवी बी,1,कार्यक्रम,9,कालिंदी कवी,2,कि का चौधरी,1,किल्ले,97,किल्ल्यांचे फोटो,5,किशोर चलाख,6,कुठेतरी-काहीतरी,2,कुणाल खाडे,2,कुसुमाग्रज,7,कृष्णाच्या आरत्या,5,के के दाते,1,के तुषार,8,केदार कुबडे,40,केदार नामदास,1,केदार मेहेंदळे,1,केशवकुमार,1,केशवसुत,2,कोल्हापूर,1,कोशिंबीर सलाड रायते,14,कौशल इनामदार,1,खंडोबाची स्थाने,1,खंडोबाच्या आरत्या,2,खरगपूर,1,ग दि माडगूळकर,1,ग ह पाटील,1,गडचिरोली,1,गणपतीच्या आरत्या,5,गणपतीच्या गोष्टी,24,गणेश तरतरे,16,गणेश पाटील,1,गण्याचे विनोद,1,गाडगे बाबा,1,गावाकडच्या कविता,12,गुरूच्या आरत्या,2,गुलझार काझी,1,गोकुळ कुंभार,8,गोड पदार्थ,58,ग्रेस,1,घरचा वैद्य,2,घाट,1,चंद्रकांत जगावकर,1,चंद्रपूर,1,चटण्या,3,चातुर्य कथा,6,चित्रपट समीक्षा,1,चैतन्य म्हस्के,1,जयश्री मोहिते,1,जळगाव,1,जाई नाईक,1,जानेवारी,31,जालना,1,जितेश दळवी,1,जिल्हे,31,जीवनशैली,424,जुलै,31,जून,30,ज्योती मालुसरे,1,टीझर्स,1,ट्रेलर्स,3,ठाणे,1,डिसेंबर,31,डॉ मानसी राजाध्यक्ष,1,डॉ. दिलीप धैसास,1,तनवीर सिद्दिकी,1,तरुणाईच्या कविता,6,तिच्या कविता,52,तुकाराम गाथा,4,तेजस्विनी देसाई,1,दत्ताच्या आरत्या,5,दर्शन जोशी,2,दादासाहेब गवते,1,दिनदर्शिका,366,दिनविशेष,366,दिनेश बोकडे,1,दिनेश लव्हाळे,1,दिनेश हंचाटे,1,दिपक शिंदे,2,दिवाळी फराळ,26,दीप्तीदेवेंद्र,1,दुःखाच्या कविता,70,देवीच्या आरत्या,3,देशभक्तीपर कविता,2,धनराज बाविस्कर,51,धार्मिक स्थळे,1,धुळे,1,धोंडोपंत मानवतकर,11,ना धों महानोर,1,ना वा टिळक,1,नांदेड,1,नागपूर,1,नाशिक,1,निखिल पवार,3,निमित्त,3,निराकाराच्या कविता,10,निवडक,2,निसर्ग कविता,23,नोव्हेंबर,30,न्याहारी,49,पथ्यकर पदार्थ,2,परभणी,1,पराग काळुखे,1,पल्लवी माने,1,पांडुरंग वाघमोडे,3,पाककला,319,पाककृती व्हिडिओ,2,पालकत्व,7,पावसाच्या कविता,31,पी के देवी,1,पुडिंग,10,पुणे,12,पूनम राखेचा,1,पोस्टर्स,5,पोळी भाकरी,26,पौष्टिक पदार्थ,20,प्र श्री जाधव,12,प्रजोत कुलकर्णी,1,प्रतिक बळी,1,प्रतिभा जोजारे,1,प्रतिक्षा जोशी,1,प्रफुल्ल चिकेरूर,10,प्रभाकर लोंढे,3,प्रवास वर्णन,1,प्रवासाच्या कविता,11,प्रविण पावडे,13,प्रवीण राणे,1,प्रसन्न घैसास,2,प्रज्ञा वझे-घारपुरे,13,प्राजक्ता गव्हाणे,1,प्रिती चव्हाण,15,प्रिया जोशी,1,प्रियांका न्यायाधीश,3,प्रेम कविता,88,प्रेरणादायी कविता,15,फेब्रुवारी,29,फोटो गॅलरी,9,बहीणाबाई चौधरी,2,बा भ बोरकर,2,बा सी मर्ढेकर,4,बातम्या,8,बाबा आमटे,1,बाबाच्या कविता,2,बायकोच्या कविता,4,बालकविता,14,बालकवी,3,बाळाची मराठी नावे,1,बाळासाहेब गवाणी-पाटील,1,बिपीनचंद्र नेवे,1,बीड,1,बुलढाणा,1,बेकिंग,9,भंडारा,1,भक्ती कविता,14,भरत माळी,1,भा रा तांबे,2,भाज्या,29,भाताचे प्रकार,16,भूमी जोशी,1,मंगळागौरीच्या आरत्या,2,मंजुषा कुलकर्णी,2,मंदिरांचे फोटो,2,मंदिरे,1,मधल्या वेळेचे पदार्थ,40,मनाचे श्लोक,205,मनिषा दिवेकर,3,मराठी उखाणे,2,मराठी कथा,100,मराठी कविता,707,मराठी गझल,19,मराठी गाणी,2,मराठी गोष्टी,67,मराठी चारोळी,1,मराठी चित्रपट,14,मराठी टिव्ही,41,मराठी नाटक,1,मराठी पुस्तके,5,मराठी प्रेम कथा,23,मराठी भयकथा,41,मराठी मालिका,14,मराठी रहस्य कथा,2,मराठी लेख,36,मराठी विनोद,1,मराठी साहित्य,49,मराठी साहित्यिक,1,मराठी सुविचार,2,मराठीमाती,181,मसाले,12,महात्मा फुले,1,महाराष्ट्र,307,महाराष्ट्र फोटो,9,महाराष्ट्राचा इतिहास,32,महाराष्ट्रीय पदार्थ,22,महालक्ष्मीच्या आरत्या,2,महेश बिऱ्हाडे,3,मांसाहारी पदार्थ,17,माझं मत,3,माझा बालमित्र,87,मातीतले कोहिनूर,16,मारुतीच्या आरत्या,2,मार्च,31,मीना तालीम,1,मुंबई,9,मुंबई उपनगर,1,मुकुंद शिंत्रे,35,मुक्ता चैतन्य,1,मुलांची नावे,1,मुलाखती,1,मे,31,मैत्रीच्या कविता,5,मोहिनी उत्तर्डे,1,यवतमाळ,1,यशपाल कांबळे,2,यशवंत दंडगव्हाळ,21,यादव सिंगनजुडे,2,योगा,1,योगेश कर्डिले,5,योगेश सोनवणे,2,रंजना बाजी,1,रजनी जोगळेकर,5,रत्नागिरी,1,रागिनी पवार,1,राजकीय कविता,7,राजकुमार शिंगे,1,राजेंद्र भोईर,1,राजेश पोफारे,1,राजेश्वर टोणे,3,रामचंद्राच्या आरत्या,5,रायगड,1,राहुल अहिरे,3,रेश्मा जोशी,2,रेश्मा विशे,1,रोहित काळे,7,रोहित साठे,14,लघुपट,3,लता मंगेशकर,2,लक्ष्मण अहिरे,2,लातूर,1,लिलेश्वर खैरनार,2,लोकमान्य टिळक,3,लोणची,9,वर्धा,1,वा भा पाठक,1,वात्रटिका,2,वासुदेव कामथ,1,वाळवणाचे पदार्थ,6,वि सावरकर,1,विंदा करंदीकर,2,विचारधन,211,विठ्ठलाच्या आरत्या,5,विद्या कुडवे,4,विद्या जगताप,2,विनायक मुळम,1,विरह कविता,55,विराज काटदरे,1,विलास डोईफोडे,4,विवेक जोशी,3,विशेष,4,विष्णूच्या आरत्या,4,विज्ञान तंत्रज्ञान,2,वृषाली काकडे,2,वृषाली सुनगार-करपे,1,वेदांत कोकड,1,वैभव सकुंडे,1,वैशाली झोपे,1,व्यंगचित्रे,48,व्रत-वैकल्ये,1,व्हिडिओ,23,शंकराच्या आरत्या,4,शशांक रांगणेकर,1,शांततेच्या कविता,6,शांता शेळके,3,शारदा सावंत,4,शाळेचा डबा,13,शाळेच्या कविता,10,शितल सरोदे,1,शिक्षकांवर कविता,3,शुभम बंबाळ,2,शुभम सुपने,2,शेतकर्‍याच्या कविता,11,शेती,1,शैलेश सोनार,1,श्याम खांबेकर,1,श्रद्धा नामजोशी,9,श्रावणातल्या कहाण्या,27,श्रीधर रानडे,1,श्रीनिवास खळे,1,श्रीरंग गोरे,1,संघर्षाच्या कविता,28,संजय पाटील,1,संजय बनसोडे,2,संजय शिंदे,1,संजय शिवरकर,5,संजय सावंत,1,संत एकनाथ,1,संत तुकडोजी महाराज,1,संत तुकाराम,8,संत नामदेव,2,संत ज्ञानेश्वर,4,संतोष झोंड,1,संतोष सेलुकर,30,संदिप खुरुद,5,संदेश ढगे,39,संपादक मंडळ,1,संपादकीय,9,संपादकीय व्यंगचित्रे,2,संस्कार,2,संस्कृती,131,सचिन पोटे,12,सचिन माळी,1,सण-उत्सव,20,सणासुदीचे पदार्थ,32,सतिश चौधरी,1,सदाशिव गायकवाड,2,सनी आडेकर,10,सप्टेंबर,30,समर्थ रामदास,206,समर्पण,9,सरबते शीतपेये,8,सलिम रंगरेज,1,सांगली,1,सागर बनगर,1,सागर बाबानगर,1,सातारा,1,सामाजिक कविता,113,सामान्य ज्ञान,7,सायली कुलकर्णी,7,साहित्य सेतू,1,साक्षी खडकीकर,9,सिंधुदुर्ग,1,सिद्धी भालेराव,1,सिमा लिंगायत-कुलकर्णी,1,सीमा लिंगायत-कुलकर्णी,1,सुदेश इंगळे,4,सुनिल नागवे,1,सुनिल नेटके,2,सुनील गाडगीळ,1,सुभाष कटकदौंड,2,सुमती इनामदार,1,सुमित्र माडगूळकर,1,सुरेश भट,2,सुशील दळवी,1,सुशीला मराठे,1,सुहास बोकरे,1,सैनिकांच्या कविता,3,सैरसपाटा,127,सोपानदेव चौधरी,1,सोमकांत दडमल,1,सोलापूर,1,स्तोत्रे,1,स्फूर्ती गीत,1,स्वप्नाली अभंग,5,स्वाती खंदारे,318,स्वाती गच्चे,1,स्वाती दळवी,9,स्वाती नामजोशी,31,स्वाती पाटील,1,स्वाती वक्ते,2,ह मुलांची नावे,1,हमार्टिक समा,1,हरितालिकेच्या आरत्या,1,हर्षद खंदारे,41,हर्षदा जोशी,3,हर्षवर्धन घाटे,1,हर्षाली कर्वे,2,हसनैन आकिब,3,हेमंत जोगळेकर,1,हेमंत सावळे,1,हेमा चिटगोपकर,8,होळी,5,
ltr
item
मराठीमाती । माझ्या मातीचे गायन: रघुनाथ अनंत माशेलकर (मातीतले कोहिनूर)
रघुनाथ अनंत माशेलकर (मातीतले कोहिनूर)
रघुनाथ अनंत माशेलकर (मातीतले कोहिनूर) - जिथे न्यूटनने सही केली आहे, त्या पुस्तकात स्वाक्षरी करण्याचा सन्मान मिळवणारे पहिले महाराष्ट्रीय.
https://3.bp.blogspot.com/-ZogyGQq1Wbg/XIVETfqtHKI/AAAAAAAACVM/ZKsHBJdlfOQUAi_1sjxksx5A38lem1KAgCLcBGAs/s1600-rw/raghunath-anant-mashelkar.webp
https://3.bp.blogspot.com/-ZogyGQq1Wbg/XIVETfqtHKI/AAAAAAAACVM/ZKsHBJdlfOQUAi_1sjxksx5A38lem1KAgCLcBGAs/s72-c-rw/raghunath-anant-mashelkar.webp
मराठीमाती । माझ्या मातीचे गायन
https://www.marathimati.com/2022/11/raghunath-anant-mashelkar.html
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/2022/11/raghunath-anant-mashelkar.html
true
2079427118266147504
UTF-8
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची