Loading ...
/* Dont copy */

स्वातंत्र्य कशाशी खातात? (माझं मत)

स्वातंत्र्य कशाशी खातात? (माझं मत) - स्वातंत्र्य आणि संविधानावर काम करणारा माझा एक मित्र जेव्हा स्वाती पाटील यांचं स्वातंत्र्याविषयी माझं मत.

स्वातंत्र्य कशाशी खातात? (माझं मत)

स्वातंत्र्य कशाशी खातात? स्वाती पाटील यांचं माझं मत


स्वातंत्र्य कशाशी खातात? (माझं मत)

स्वातंत्र्य आणि संविधानावर काम करणारा माझा एक मित्र जेव्हा त्याची आत्या त्याला आम्हा दोघांच्या लग्नाबद्दल विचारते तेव्हा... स्वातंत्र्य कशाशी खातात?



दरग्यात गेले... एका रेषेपुढे बाईला जायची परवानगी नाही...
एका मंदिरात... गाभाऱ्यात बाई जाऊ शकत नाही...
गुरुद्वारामध्ये डोक्यावर ओढणी किंवा कापड नसेल तर प्रसाद दिला जात नाही...

काश्मिरी लग्नात एक मुलगी शिटी वाजवू शकत नाही. का? असं विचारल्यावर ती समोर उभ्या असलेल्या पाच सात पुरुषांकडे पाहून हळू आवाजात म्हणते...
“मार डालेंगे...”

मी तिला लांब घेऊन जाते... झाडाखाली बसून ती मनसोक्त शिट्ट्या वाजवते... आम्ही पोट दुखेस्तोवर हसत राहतो.

स्वातंत्र्य आणि संविधानावर काम करणारा माझा एक मित्र...
जेव्हा त्याची आत्या त्याला आम्हा दोघांच्या लग्नाबद्दल विचारते तेव्हा तो सोयीने म्हणतो... “...अगं तीचं लग्न झालंय!”

...आणि हेच अर्धसत्य तो येऊन मलाही सांगतो.
त्याच्या जाणीवेत ही गोष्टच नाही की, बाईची सामाजिक ओळख तिच्या परवानगी शिवाय आपण बदलू शकत नाही!

मी एकटी असूनही... त्याने स्वतःचं लग्न न करण्याचा निर्णय माझ्या खोट्या सामाजिक ओळखीवर निभावून नेला...
कारण बाईच्या मागे लपणं सोपं असतं!
स्वातंत्र्य, संविधानावर काम करणाऱ्या लोकांची ही स्थिती आहे तर सरकार तर फ्लेक्स लावणारच. “आपले सरकार आले हिंदू सणांवरील विघ्न टळले.”

माझं नाव स्वाती पाटील, मुलीचं नाव स्वरा स्वाती.
प्रत्येक वेळेस नावात त्रास दिला जातो, कधी शाळेतून मिळणारा निधी मिळत नाही; कधी घटस्फोटाची कागदपत्रे जमा करायला सांगितली जातात.

बाईला संविधानाने खूप हक्क दिलेत; पण समाज... बाईसकट ते गिळायला बघतो.

कुणी तिला टिकली लावायला सांगतं, कुणी पदर घ्यायला सांगतं, कुणी सांगतं, योनी जपा, कुणी सांगतं, आता नको जपू; आता मुल होऊदे.
मुल झालं नाही तरी म्हणतात; अजून मुल नाही?
लग्नाआधी झालेल्या मुलाला अनौरस हिणवतात; मुल तेच, वीर्य आणि बिजाचे मिलन तेच आणि आपला दांभिकपणाही तोच.

दरग्यात रेषेपूढे जायला लागले की एक हात हक्काने आडवा येतो...
“आप आगे नही जा सकते!”

हा आडवा हात कायम येत राहतो... बाईच्या आयुष्यात!

मात्र, समाज कितीही वाटेत येत राहिला तरी कायदेशीर बाबीत तो फार ढवळाढवळ करू शकत नाही!
दरग्यात, मंदिरात प्रवेशासाठी मला लढा द्यावा वाटत नाही; कारण केवळ तिथंच ईश्वर आहे अशी माझी भावना नाही.

परंतु मुख्याध्यापकांच्या ऑफिसात...
व्यक्तीच्या घटस्फोटाच्या कागदपत्रांची मागणी करणारे शिक्षण विभागाचे लेखी पत्र मी मागते...

आधार कार्डावर wife of लिहिणं बंधनकारक आहे. अशा आशयाचे आदेश असतील तर दाखवा. हे मी सांगते.

‘विवाहित ते सिंगल’ हा माझा प्रवास किती वेदनादायक होता हे मला माहितेय! आणि मला परस्पर विवाहित दाखवण्याचा तुला हक्क नाही... तुझ्या निर्णयांची जबाबदारी तू घे! माझ्या मागे लपू नकोस.
हे संविधानावर काम करणाऱ्या माझ्या मित्राला मी स्पष्ट सांगते.

संविधान हे शस्त्र असेल तर ते चालवू शकणारी मनगटे तितकीच विवेकी आणि जागरूक असावीत!

जेव्हा त्या काश्मिरी मुलीला शिट्टी वाजविण्यासाठी दूर जाण्याची गरज पडणार नाही; तेव्हा आपण निव्वळ तिच्या शिट्टीच्या आवाजातही स्वातंत्र्य अनुभवू शकतो.

विवेक नसेल तर केवळ आपलं तेच स्वातंत्र्य.
हा विचार बोकाळत जाईल.
...आणि अशा स्वार्थी, कुचकामी आणि संकुचित व्याख्येतून भव्य दिव्य असं काहीच घडणार नाही.

संविधान दिनाच्या शुभेच्छा!

- स्वाती पाटील

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची