मुंबई (पूर्वी बॉम्बे म्हणून ओळखले जात असे)

मुंबई | Mumbai | Formerly known as Bombay
मुंबई - Mumbai, Formerly known as Bombay (महाराष्ट्र), छायाचित्र: मराठीमाती अर्काईव्ह.
मुंबई - (Mumbai, Formerly known as Bombay) बॉम्बे हे नाव ‘मुंबई’ ह्या मूळ नावाच्या पोर्तुगीजानी केलेल्या बॉम्बैम् अशा भ्रष्ट रूपावरून आले आहे. जुन्या पोर्तुगीज दप्तरात ह्या बंदराच उल्लेख ‘मौम्बैम्’ व बॉम्बेम्’ अशा दोन्ही नांवानी केलेला आढळतो. ‘मुंबई’ हा शब्द ह्या बेटांच्या आद्य रहिवाश्यांच्या - कोळी जमातीच्या ‘मुम्बाआई’ ह्या कुलदेवतेच्या नावावरून आलेला आहे. हल्ली ज्या ठिकाणी व्हिक्टोरिया टर्मिनस आहे त्याच्या जवळपास ह्या देवीचे मूळ देवालय होते. अधिक वाचा

मुंबई (काही प्रसिद्ध स्थळांची निवडक छायाचित्रे)

शिवाजी महाराजांचा पुतळा गेटवे ऑफ इंडिया मुंबई | Shivaji Statue Gateway of India Mumbai गेटवे ऑफ इंडिया मुंबई | Gateway of India Mumbai नेहरू तारांगण मुंबई | Nehru Planetarium Mumbai

मुंबईचे वर्णन

कायहो मुंबई बंदर उमदा कोट्यावधि फिरतात जहाजे ॥ अजब कंपनी शहर त्याला लंकेची उपमा साजे ॥ गव्हर्नराचे तक्त मजेचे दिसते उमदा खूब शिरा ॥ तऱ्हेतऱ्हेचे रंगित बंगले ऐन इंग्रजी पहा तऱ्हा ॥ भर रस्त्यामध्ये उभे शिपाई लोक म्हणती सरा सरा ॥ रथगाड्यांची गर्दी होती व्हा बाजूला मागें फिरा ॥ मोठे मोठे सावकारसाहेब रथ फिरवीती झरा झरा ॥ नव खंडीचे माणुस पाहुन रथ म्हणती हा बरा बरा ॥ जिकडे तिकडे अशीच गर्दी रथ जाता घडघड वाजे ॥ अज कंपनी शहर त्याजला लंकेची उपमा साजे ॥

- श्री. गोविंद माडगावकर यांच्या ‘मुंबईचे वर्णन’ ह्या पुस्तकातून.