कलाक्षेत्रातील परंपरा
हातो घेऊनी चिपळ्या टाळा ब्रह्म वीणा ॥
सारजाचा ताल ईना ॥ हे जी ॥
कंगरेशी की माचपट्टा । चाल झटापटा
सारजा नार । जसा डुलू लागला मोर ॥ हे जी ॥
डोळ्याला भरुन काजळ । कुंकवाचे चिरी
गळ्यामध्ये सोन्याची सरी । हे जी ॥
शोभला गळा दोरल । ठुशीचा जोड
पायात शिंदेशाही तोडे ॥ हे जी ॥
कानात करंड फूल । झुब्याला मोती
नाकाला नथ सरजाची शोभा देती ॥ हे जी ॥
हातात हिरे कंकण । पाटल्या चार
अंगावरती लेली डागिन । सारजा नार ॥ हे जी ॥
अगात जरीची चोळी । फेराची लुगडी
कानाला शोभती बुगडी ॥ हे जी ॥
- लोकगीत
कलाक्षेत्रातील परंपरा
महाराष्ट्राचा इतिहास विभागातील सर्व पोस्ट्स
महाराष्ट्र