Loading ...
/* Dont copy */

एस.एन.डी.टी. पुणे येथे उद्योजकतेवरील प्रेरणादायी कार्यशाळा

एस.एन.डी.टी. कला व वाणिज्य महिला महाविद्यालयात उद्योजकतेवरील प्रेरणादायी कार्यशाळा (Understanding the Entrepreneurship Journey).

एस.एन.डी.टी. महाविद्यालयात उद्योजकतेवरील प्रेरणादायी कार्यशाळा

एस.एन.डी.टी. कला व वाणिज्य महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनींसाठी प्रेरणादायी कार्यशाळा...

उद्योजकतेवरील प्रेरणादायी कार्यशाळा

मराठीमाती (मराठीमाती डॉट कॉम, संपादक मंडळ)

आजच्या युगात पारंपरिक रोजगाराच्या संधी कमी होत चालल्या आहेत. अशा परिस्थितीत तरुणांनी स्वतःचा व्यवसाय उभा करणे, म्हणजेच उद्योजकतेकडे वळणे ही काळाची गरज ठरते. हाच संदेश आणि आवश्यक मार्गदर्शन देण्यासाठी एस.एन.डी.टी. कला व वाणिज्य महाविद्यालय, पुणे येथे “Understanding the Entrepreneurship Journey” या विषयावर प्रेरणादायी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

एस.एन.डी.टी. कला व वाणिज्य महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनी
एस.एन.डी.टी. कला व वाणिज्य महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनी

ही कार्यशाळा महाविद्यालयात नुकत्याच सुरू झालेल्या Entrepreneurship Development Program (EDP) अंतर्गत घेण्यात आली. या उपक्रमाची संकल्पना आणि अंमलबजावणीचे श्रेय महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. भरत व्हनकटे यांना जाते. त्यांच्या दूरदृष्टीमुळेच विद्यार्थ्यांना उद्योजकतेसाठी स्वतंत्र मंच उपलब्ध होत असून स्टार्टअप संस्कृतीला चालना मिळत आहे. कार्यशाळेत दोन नामवंत उद्योजकांनी मार्गदर्शन केले.

प्रसाद मिरसदार, हाऊस ऑफ सक्सेस चे संस्थापक, स्टोरीटेलर उद्योजक व माध्यम तज्ञ यांनी कथा सांगण्याच्या अभिनव शैलीतून विद्यार्थ्यांना उद्योजकतेचा प्रवास सखोलपणे समजावला.

प्रसाद मिरसदार
प्रसाद मिरसदार

अनिल वळसंगकर, स्वानिल ट्रेनिंग फाऊंडेशन चे संस्थापक व बिझनेस इन्क्युबेशन मॅनेजमेंटचे जाणकार यांनी स्टार्टअप्स उभारणी व व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन केले.

अनिल वळसंगकर
अनिल वळसंगकर

विद्यार्थिनींनी सत्रात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून अनेक प्रश्न विचारले. संवादात्मक आणि अनुभवाधारित या कार्यशाळेमुळे विद्यार्थिनींना केवळ ज्ञानच नव्हे तर प्रत्यक्षात नवनवीन स्टार्टअप कल्पना विकसित करण्यासाठी आवश्यक आत्मविश्वासही मिळाला.

ही कार्यशाळा महाविद्यालयातील विद्यार्थिनींसाठी एक नवे दालन उघडणारी ठरली.

यासंबंधी इतर बातम्या वाचा:

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची