Loading ...
/* Dont copy */

प्राचीन धातुमूर्ती - महाराष्ट्र

प्राचीन धातुमूर्ती, महाराष्ट्र - [Prachin Dhatumurti - Maharashtra] धातू शिल्प कलेच्या विकासास महाराष्ट्राने उल्लेखनीय हातभार लावला आहे.

धातू शिल्प कलेच्या विकासास महाराष्ट्राने उल्लेखनीय हातभार लावला आहे

सर्व भारताच्या दृष्टीने विचार केला तर त्यात धातू शिल्पांच्या बाबतीत महाराष्ट्राचा वाटा अगदीच नगण्य वाटतो, पण तरही या कलेच्या विकासास महाराष्ट्राने उल्लेखनीय हातभार लावला आहे.

शिल्पकलेने भारतात मुख्यत्वेकरून धर्माचीच सेवा केलेली दिसते आणि म्हणून भारतीय शिल्पकलेला मूर्तिकला असेच बऱ्याचदा संबोधिले जाते. परंतु या नांवास हरकत घेणाऱ्या टीकाकारांनी, भारतीय शिल्पकारांनी हाताळलेल्या निधर्मी विषयांकडे वारंवार बोट दाखवले आहे. तरीही धातुशिल्पाच्या बाबतीत मात्र "मूर्तिकला" किंवा "मूर्तिशिल्प" हेच नांव योग्य ठरते; कारण मूर्तींखेरीज इतर विषयांवरील धातू-शिल्पे सापडत नाहीत. अशा परिस्थितीत धातू-शिल्पाचे नक्की स्थान काय समजायचे? प्रत्येक शिल्पाला दोन अंगे असतात : एक आकृतीचे आणि दुसरे प्रतिमात्मक. शिल्पाला कलाकाराने दिलेला, घडवलेला आकार हे शिल्पाचे आकृति-अंग. सर्व छोट्या-मोठ्या मूर्ती-आकृती या त्या त्या काळात व ठिकाणी प्रचलित असलेल्या कलाविषयाचे धातु-माध्यमातील एक रूप असणार. कलात्मक अभिव्यक्तीच्या ज्या शैली निरनिराळ्या काळात - उदा: कुशाण, गुप्त, पाल, चोल इ. - इतर शिल्पातून आढळतात त्याच शैली धातूच्या मूर्तीतही आकारलेल्या दिसतात; आणि त्याच पुन्हा मोठ्या अश्मशिल्पातही सापडतात. परंतु अश्मशिल्पे ही बहुधा एका संपूर्ण वास्तुशिल्पाचा अथव इमारतीचा अथवा प्रासाद-प्रांगणाचा एक भाग असतात, तर धातुशिल्पे केवळ एकेक मूर्ती म्हणुनच अस्तित्वात येतात.

त्यांच्या या वैयक्तिकतेतच त्यांचे प्रतीकत्वही समावलेले आहे. भारतातील अनेक धर्म सार्वजनिक, तसेच स्वतंत्र वैयक्तिक पूजा-अर्चाही मानतात. प्रत्येक व्यक्तीला ह्या धर्मांनी स्वतःच्या घरात, स्वतः दैवत मानलेल्या मूर्तीची पूजा करण्याचे स्वातंत्र्य दिलेले आहे. अशा मूर्तिपूजेचा हेतू पूजकाला देवतासन्निध पोचवण्याचा असल्याने त्या त्या मूर्तीला एअक पकारच्या वैयक्तिक उप-धर्माच्या दैवताचे स्थान प्राप्त होते. परंतु मूर्तीच्या या धार्मिक लक्ष्यामुळे त्यांच्या आकृती अथवा बाह्यरूपाच्या कलाकुसरीकडे पूजकाचे लक्ष नसून मूर्तीच्या दैवी अथवा आध्यात्मिक शक्तीकडे असते. धातूच्या मूर्ती अशा पूजा-कर्मासाठी विशेषकरून वापरल्या जाण्याचे मुख्य कारण त्या लहान व सुटसुटीत असून सहजगत्या इकडून तिकडे नेता येतात हेच आहे.

[next] आराधनेचे स्वरूप जसे साधनेकडून मंत्राकडे व मंत्राकडून तंत्राकडे वळले तसतसे मूर्तीचे स्वरूपही साधासुध्या वा ओबडधोबड आकृतींकडून अतिशय बारकाव्याच्या व वास्तवदृश्य पुतळ्यांकडे व तिथून पुढे अनाकलनीय शिल्पाकृतींकडे वळले. या प्रक्रियेमुळे मूर्तीची योग, भोग, वीर अभिचारक अशी वर्गवारी करण्यात आली आहे. आपल्याला हवे ते लक्ष्य साधण्यासाठी पूजक यापैकी कुढल्या तरी वर्गातील मूर्ती पूजास्थान म्हणुन निवडू शकतो, तसेच मूर्ती शांत किंवा उग्र ही असतात. पण मूर्ती कशाच्याही, कुणाच्याही असोत; भारतीय शिल्पकारांनी आपल्या अभिजात सौंदर्यसृष्टीला अनुसरऊन तऱ्हेतऱ्हेच्या अगदी अनाकलनीय आकृत्यांमध्येसुद्धा जी सुबक आकर्षकता व प्रतिष्ठा निर्मिली आहे तशी जगात इतर कुठे सापडणार नाही.

भारतीय शिल्पकलेच्या सुरवातीस [बौद्ध किंवा जैन काळी] मूर्त स्वरूप दिले गेले ते कुणा एका व्यक्तीच्या अथवा देवतेच्या आकृतीस नव्हे, तर कुठल्या तरी तात्त्विक वा आध्यात्मिक सकल्पनेला. त्यामुळे कुरू, प्रेषित, द्र्ष्टा वगैरे मूर्ती तयार केल्या जाणे ओघानेच आले. परंतु त्या केल्या गेल्या त्या ध्यानमग्न योग्याच्या उभ्या किंवा कायोत्सर्ग रूपात किंवा बसलेल्या ध्यानमुद्रा या स्वरूपात होत्या. सर्व बारकाव्यांसहितचा परिकर मागाहून अस्तिवात आला. काही काळानंतर मूर्तिशिल्पाच्य संहितेत नेमून दिलेल्या नियमांचा प्रभाव मूर्तिकारांवर पडू लागला. अशा नियमावलींच्या जंत्र्या, बृहत्संहिता, विष्णूधर्मोत्तरपुराण, साधनमाला वगैरे ग्रंथातून आढळतात. वराहमिहिर म्हणतो की मूर्तीचे कपडे, दागिने, रूप वगैरे त्या त्या प्रदेशात मान्य असणाऱ्या चालीरीतींना धरून असावेत. या तत्वाला अनुसरूनमूर्तिकलेमध्ये भारतात अनेक प्रादेशिक फरक पडलेले दिसतात. या सर्वांना एकत्र बांधणारा धागा म्हणजे सर्व देशभर पूजिल्या जाणाऱ्या मुख्य देवतांच्य मूर्ती व त्यांचे आपसातील पारंपारिक व पौराणिक लागेबांधे.

[next] बदलत्या धार्मिक कल्पनांना अनुसरून मूर्तिकलेत निरनिराळ्या शैली उगम व अस्त पावताना दिसतात. सर्व भारतीय दैवते अमर असल्याने त्यांच्यातील बदल विशेषतः वार्धक्य वा विकलांगता दाखवण्याचा प्रश्नच येत नाही. देवतांच्या मुर्ती नेहमीच तारुण्याचे प्रतीक असून कित्येकदा हे तारुण्य उघड-उघड उत्तान म्हणता येईल इतक्या भोगवादी दृष्टीकोनातून दाखवलेले आहे.

एकीकडे ही कामुक आकृती व एकीकडे अनाकलनीय गूढ शिल्प या दोन तोकांमध्ये सामावालेला हेतू मात्र पूर्ण आध्यात्मिकच आहे. भारतीय कलेतील ही बाह्य संदिग्धता प्रा. गॉम्ब्रिन यांनी नेमकी टिपली आहे ते म्हणतात: ‘सामान्य अधार्मिक माणसाला या ल्गूढ आकृतीत अलौकिक वा दैवी शक्तीचे रहस्य सामावलेले दिसते: तर धार्मिक आयुष्यात नुकताच प्रवेश करणारा त्यांना आपल्या दैवी साध्याकडे जाणाऱ्या जिन्याची पहिली पायरी समजतो. महाराष्ट्रातील धातुशिल्पात निरनिराळ्या शैली व संस्कृतीचे सरमिसळ झालेली आहे. १९७४ साली अहमदनगर जिल्ह्यात, श्रीरामपूर तालुक्यात दैमाबाद येथे ज्या चार मूर्ती सापडल्या त्यांच्यामुळे या कलेच्या इतिहासात एक क्रांती घडून आली. या चार मूर्ती अशा: एक बैलाचा रथ, एक म्हैस,एक हत्ती व एक गेंडा. ही चार जनावरे अशा तऱ्हेने एका संचात फक्त हडाप्पा संस्कृतीतच आढळतात. याच दैमाबाद उत्खननात हडाप्पानंतरच्या चाल्कोलिथिक संस्कृतीचे इतरही अवशेष सापडले. आणि तरीही या मूर्तीच्या निर्मितीचा काल, त्याइथे कशा व कुठून आल्या, त्याकुणी निर्मिल्या असाव्या याबद्दल तज्ज्ञात संपूर्ण अज्ञान आहे. फार तर त्या ख्रिस्तपूर्व १६०० वर्षे इतक्या जुन्या असाव्या एवढेच सांगता येणे आज शक्य आहे.

[next] या चार मूर्तीनंतर ते ख्रिस्तोत्तर काळातील दुसऱ्या शतकापर्यंत महाराष्ट्रात कुठलेही धातुशिल्प नाही. इ,स. २००-३०० मधील मूर्ती कोल्हापूर येथे सापडल्या आहेत, तसेच एक निधि-शॄंग ठाणे येथे. इ, सनाच्या चौथ्या शतकातील बौद्ध मूर्ती रामटेक येथे सापडल्या आहेत; तसेच नवव्या शतकातील मूर्ती सोपारा येथील बौद्ध स्तूपामध्ये आढळल्या. इ,सनाच्या नवव्या व दहाव्या श्तकातील २७ जैन मूर्ती अकोला जिल्ह्यातील राजनापूर किंकिणी येथे एका भिंतीत पुरलेल्या मडक्यात सापडल्या. तसेच ऋषभनाथाची नवव्या शत्कातील चौविसी व बाहुबलीची मोठी मूर्ती जळगाव जिल्ह्यात चाहर्डी येथे सापडल्या . या सर्व धातुमूर्तीच्या अभ्यासाचा महाराष्ट्रातील सांस्कृतिक आयुष्याच्या अभ्यासास मोठा हातभार लागतो.

नवव्या शतकातील या सर्व मूर्तींना राष्ट्रकूटा कालातील मूर्ती म्हणता येईल. परंतु ठामपणे राष्ट्रकूट अम्हणता येईल अशा मूर्ती महाराष्ट्रात फारच थोड्या आहेत. याचे कारण सोमदेवाच्या यशोश्तिलकात सापडते. तेथे त्याने मूर्ती वितळवून सोने करणाऱ्या प्र्धानांना बोललावला आहे. ह्या कारणांमुळे म्हणा की आणखी कुठल्या कारणाने म्हणा, पण पुढे पुढे धातुमूर्ती ओतण्याचे काम महाराष्ट्रात थंडावलेच. ज्या ज्य मूर्ती ओतल्या गेल्या त्यांची शैली हिणकस होती व त्यांच्यातुन पूर्वीच्य मूर्तीची मोहक गतिमानता जाऊन एअक टठर, दगडीपणा आलेला दिसतो. किंबहुना धातुमूर्तींनाही या काळातील इतर शिल्पांप्रमाणेच अवकळा आली असे म्हणावे लागेल.

कदाचित दक्षिण भारतातून मोथ्या ओतीव मूर्ती आणणे सहज शक्य होते म्हणूनही महाराष्ट्रात या कलेला ओहोटी लागली असेल. महाराष्ट्रातील अनेक देवळातून सापडणाऱ्या धातुमूर्ती या दक्षिणी आयातीच्या साक्षी आहेत. या आयातीचा दोन कारणे असावीत. एक तर दाक्षिणात्य स्थपती मूर्ती घडवण्याच्या कलेत अधिक निपुण असेल आणि दुसरे म्हणजे महाराष्ट्रात लोप पावलेली धातू ओतण्याची कला दक्षिणेकडे अधिक जोमाने तग धरून असेल.

[next]

अहमदनगर जिल्ह्यात दैमाबाद येथे सापडलेल्या चार मूर्ती

  • बैलाचा रथ (उंची १५.४ से.मी.)
  • हत्ती (उंची ३६.५ से,मी.)
  • म्हैस (उंची २७.५ से. मी.)
  • गेंडा (उंची २८.५ से.मी.) ख्रि.पू. १६०० च्या आसपास
(मुंबई येथील प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालयात आहेत)

या चार मुर्तीच्या उत्खननापासून भारतातील धातू ओतण्याच्य कामाच्या इतिहासात क्रांती झाली आहे. चाल्कोलिथिक संस्कृतीच्या घरातून या मूर्ती अपघातानेच सापडल्या. उत्खननात या थरानंतर व मनुष्यवस्तीच्या इतर आणखी खुणा सापडल्या नाहीत.

बैलांचा रथ, हत्ती, म्हैस आणि गेंडा या त्या चार मूर्ती असून त्या अशा एका संचात एकमेकांबरोबर फक्त सिंधू नदीच्याकाठच्या संस्कृतीतचह आढळतात; परंतु संपूर्ण हडाप्पा उत्खननातही अशा धर्तीच्या, चकीत करून सोडणाऱ्या मूर्ती सापडल्या नव्हत्या.

विशेषाः बैलांचा रथ हे एक कोडेच आहे. जे दोन बैल रथ ओढताहेत त्यांच्या शरिराची घडाण फारच विचित्र आहे. त्यांचे पार्श्वभाग घोड्यांसारखे असून शिंगे त्या काळातल्या एकाद्या "युनिकॉर्न" सारखी सरळ पुढे आलेली आहेत. या रथासारखा रथ तर संपूर्ण उपखंडात कुठेच बघायला मिळत नाही. दोन उभ्या व एका आडव्या दांड्यावर बसवलेला एक उघडा पाट आहे. त्याच्या चाकांचा आस त्यातील दोन भोकांतून ओवला आहे आणि तो चाकांबरोबर फिरतो. जोखडाचा दांडा एकुण रथाच्या आकाराच्या मानाने फारच लांब आहे आणि तो गुरांच्या मानेवर नुसता ठेवला आहे, बांधलेला नाही. त्यावर एक कुत्रा उभा आहे. पाटावर सारथी उभा असून त्याच्या हातात एक चाबूक आहे. त्याचे कमरेवरील शरीर वास्तव असएल तरी कमरेखालील भाग फारच ओबडघोबड आहे. अशी मनुष्यकृती आजवर तरी सापडलेली नाही.

गेंड्याची आकृती वास्तव नसून नुसती भासली तशी, केवल गेंड्याच्या आकृतीची आठवन करून देणारी आहे. त्याचे कवच जवळजवळ खोगिरासारखे दिसते. फक्त हत्ती व म्हैस मात्र अगदी वास्तवावर आधारित आहेत. सर्व मूर्तींना चाके आहेत (हत्तीची गळालेली दिसतात). परंतु त्यांचे वजन बघता त्या खेळणी म्हणून बनवल्या असतील असे वाटत नाही. सर्वांचे मिळून ६० किलो वजन आहे. तेव्हा त्या मिरवत नेण्यासाठी घडवल्या असाव्यात असे वाटते. अशा लाकडाच्या मूर्ती अजूनही मिरवणुकीत वाजत गाजत नेताना महाराष्ट्रात आढळतात.

[next]

निधिशृंग, कॉर्नुकोपिआ (उंची ४०.७ से.मी.)

इ.सनाचे दुसरे शतक, ठाणे
(मुंबई येथील प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालयात आहे)

विष्णुधर्मोत्तर या महत्त्वाच्या धार्मिक ग्रंथात पुढील ओळी सापडतात: "हे राजा, घरामध्ये नेहमी दोन बैलांची निधिशृंगे, हस्तिदंताचे निधिहास्तिन, निधि विद्याधर, ऋषी व सर्व जगभर आढळणारी इतर शुभचिन्हे रंगवलेली असावी. निधिशृंग हे भरभराटीचे द्योतक असून त्याच्या जादूवर व दैवी शक्तीवर सर्व आदिसंस्कृतींचा विश्वास असलेला आढळतो. कारण अशा संस्कृतींचा प्राणिजगताशी जवळचा संबंध असे. असा विश्वास फक्त वैदिक भारतीयातच नाही तर इजिप्शिअन, बॅबिलोनियन, हिटाइट, क्रतन, फिनिशियन, ग्रीक व हडाप्पाचे लोक अशा सर्वांमध्ये अस्तित्त्वात असलेला आढळतो.

इंद्राच्या हिरण्यशृंगाचा ऋग्वेदात उल्लेख आहे. ऋग्वेद आणि नंतरच्या इतर संहितातून शृंग हा शब्द कुठल्याही प्राण्याच्या शिंगास उद्देशून वापरला असला तरी आधीचे वेद, ब्राह्मणे व श्रौत-सूत्रांत धार्मिक विधींच्या बाबतीत जेव्हा श्रृंग हा शब्द येतो तेव्हा तेथे फक्त ठायी असलेल्या अलौकिक शक्तीवरील विश्वास ऋष्यशृगांच्या कथेत व काही जातककथाक सोदाहरण सापडतो. भारतात हिंदू व बौद्ध दोघांचाही या शक्तीवर विश्वास दिसतो.

ग्रीसमधे निधिशृगाचा फॉर्म्युला व कोपिया अशा देवतांशी संबंध होता. हे श्रृंग ग्रीसमधून विभागातील बौद्धधर्मात शिरले. तेथे त्याचा संबंध पंचिकाची पत्नी हरिती हिच्याशी जोडला गेला. निधिशृंग हातात घेतलेल्या हरितीची आकृती पुष्कळदा सापडते. तिथून निधिशृंग गुप्तकालात येथून ठेपते आणि समुद्रगुप्ताच्या रोजच्या व्यवहारातल्या नाण्यांवर ते आढळते. ही सर्व कल्पना आजगातयत जिवंत आहे. महाराष्ट्रात कित्येक ठिकाणी साखरपुड्याच्या वेळी श्रृंगाकृती पुढ्यातून अथवा पेटीतून गोडधोड वाटले जाते.

हे निधिश्रूंग एकटेच ठाण्यात कुठून, कसे,केव्हा व का आले हे सांगता येणे कठिण आहे. त्याच्यावरील नक्षीकाम व आकृत्या यावरून त्याचा काळ आदमासे सांगता येतो. धातूची अशीच निधिश्रृंगे नालंदा येथील उत्खननात बौद्ध धर्मयि अवशेषात सापडली असून ती सुमार ८-९ व्या शतकातील असावीत असे वाटते.

[next]

पोसायडन-ग्रीक सागरदेवता (उंची १४.३ से.मी.)

कोल्हापूर इ सनाचे पहिले शतक
(कोल्हापूर संग्रहालयात आहे )

ही मूर्ती भारतीय असण्याची काहीच शक्यता नाही. हिच्या बरोबर पर्सियस आणि अ‍ॅंड्रोमीडाचे चित्र असलेली एक पाटी, दारूचे/पाण्याचे ब्रॉंझचे खुजे ( त्रिफुल्याचे तोंड व उंच कान असलेले ), आणि काही रोमन दिवे सापडले. या परदेशी वस्तू व काही भारतीय ब्रॉंझ मूर्ती कोल्हापूरजवळील ब्रहागिरी उत्खननात सापडल्या.

पोसायडनच्या या मूर्तीचे मूळ स्फूर्तीस्थान अलेक्झांडरच्या काळातील लायसिपसने निर्मिलेली सुप्रसिद्ध मूर्ती हेच आहे. अलेक्झांडर नाण्यांच्या उलट बाजूवरही पोसायडनचेच चित्र आहे.

आपल्याकडच्या या मूर्तीच्या उजव्या हतातील त्रिशूळ गायब झालेला आहे, परंतु पोसायडनच्या चेहऱ्यावरील भाव इतर कित्येक मूर्तीहून अधिक वास्तव व सफाईदार आहेत. मूर्तीच्या आकारावरून व आविर्भावावरून ती हेलेनिस्टिक काळातील मूर्तीइतकी जोमदार व पैलवानी वाटत नाही व म्हणूनच ती जरा अलिकडची असावी. अलेक्झांडरचा मृतदेह पहिल्य टॉलेमीने अलेक्झांड्रियाला नेऊन एका सोन्याच्या शवपेटीत ठेवला होता. या ग्रीक वसाहती शेजारीच सोकोत्रा बेटावर (सुखतरद्वीप ) बरेच भारतीय रहात असत. त्यांच्यापैकी कुणा व्यापाऱ्याने ग्रीक पुराणातल्या देवतेची ही मूर्ती मजा म्हणून विकत घेऊन घरी कोल्हापूरला आणली असणार.

[next]

हत्तूस्वार (उंची ५.१ से.मी.)

सातवाहन कालै. सनाचे पहिले शतक, कोल्हापूर.
(कोल्हापूर संग्रहालयात आहे)

सातवाहन काळातील हत्तीस्वारांची एकुलती मूर्ती बघून कार्ल्याच्या लेण्यातील हत्तीस्वार जोडप्यांची आठवण येते. या मूर्तीत उच्च शिल्पाचे सर्व गुण आढळतात आणि हत्तीच्या आविर्भावावरून तो नुकताच जमिनीवर उतरतोय किंवा उड्डाणाच्या तयारीत आहे असे वाटते. ही मूर्ती काय उद्देशाने बनविली असावी ते समजत अनाही. पण पुढील तर्क काढता येतो १८७७ मध्ये कोल्हापूर जवळील उत्खननात धातूच्या वस्तूंचा एक मोठा साठा सापडला त्यातील बहुतांश बौद्ध होत्या आणि त्यांच्यात एक स्तूप व एक तोरण्ही सापडले. हत्तीवर स्वार झालेल्या या व्यक्ती म्हनजे स्तूप पूजेला आलेल्या कुणा राजवंशातील मंडळी तर नाहीत? या स्वारीचे बौद्ध स्वरूप त्यांच्या आसपास सापडल्या काही इतर वस्तूंवरूनही ताडता येते. उदा. चार दिशांना चार मुखे असलेली एक अंगठी. हिच्या एका पृष्ठ्भागावर स्फिंक्सचे चित्र आहे. भरहट आणि अमरावती येथे सापडलेल्या बौद्ध चक्रस्तंभावर अशीच मुखे सापडतात.

मनुष्याकृतीचे कपडे आणि आविर्भावांवरून या मूर्तीचा काल अजमावता येतो. तेर येथील मातीच्या, रोमन बनावटींच्या टेराकोटाच्या मूर्तीमध्ये आढळणाऱ्या केशरचनेशी, या मूर्तीतील एका स्त्रीच्या आकृतीत तिने पाठीवर केस मोकळे सोडलेले दाखविण्यात आले आहे त्याच्याशी, साम्य आढळते व त्यावरून ह्या मूर्तीचा काळ इसवी सनाचे पहिले शतक ठरविता येते.

[next]

बुद्ध (उंची ५७ से.मी.)

इ. सनाचे ४ थे शतक, हमलापुरी, तेह, रामटेक, नागपूर.
(नागपूरच्या मध्यवर्ती संग्रहालयात आहे)

बुद्धाने दोन्ही खांड्यावर संघाती पेहरली असून त्याची टोके आकर्षक निऱ्यात खाली आली आहेत. उजवा हात अभयमुद्रा दाखवितो आणि डाव्या हाताने संघातीचे टोक धरले आहे. गोल चेहरा, उंच गालफडे, धारदार नाक, संघाती गुंडाळण्याची पद्धत व तिची गळेपट्टी, तसेच अंतरीय व उत्तरीय बांधण्याची धर्ती या सर्वांवर गांधार शैलीची छाप आहे. तर शंखाकृती कुरळे केस, कानाच्या लांब पाळ्य़ा, गळ्यावरील तीन वळ्या आणि ठळक उर्णा यांवरून गुप्त शेलीची आठवण होते. कपड्यांच्या आतील तथागताचे सडपातळ शरीर सुरेख-नीटस आकाराचे आहे. मूर्तीला प्रभावली असून वलयाची कड आता मोडली आहे.

ही मूर्ती मूळ वायव्य परंपरेतील असून कुणा यातेकरऊने या प्रांतात आणली असावेई हे उघड दिसते. तिच्याबरोबरच संपूर्ण गांधार कारागिरीचे एक धातूचे उदबत्ती घर सापडले आहे. त्यावरून तर या विधानास पृष्टीच मिळते. १९६९ मध्ये विदर्भामध्ये पवनी येथे एका स्तूपाचे काही अवशेष सापडले त्यावरूनही एके काळी येथे एक महत्त्वाचे बौद्ध यात्रास्थान होते असे शाबीत होणारा पुरावा मिळतो.

बऱ्याच दशकांपूर्वी उत्तर प्रदेशात धनेसर खेरा येथे बुद्धाची आणखी एक धातुमूत्री सापडली होती. ती आता अमेरिकेत कॅन्सस सिटी येथे रॉकहिल नेल्सन गॅलरी व अ‍ॅटाकिन्स म्यूझियम ऑफ आर्ट येथे ठेवलेली आहे. ही मूर्ती व वरील नागपूरची मूर्ती या दोन्ही एका हाताने नाही तरी मूर्तिकारांच्या एका गटाने बनविल्या यात शंकाच नाही. दोन्हीही भारताच्या वायवेकडील प्रांतात एकाच वेळी ओतण्यात आल्या असाव्यात असे दिसते. त्या इतक्या एकसारख्या आहेत की निरनिराळ्या ठिकाणच्या निरनिराळ्या काळच्या, वेगवेगळ्या मूर्तिकारांनी त्या बनविल्या असे मानणे चुकीचे ठरेल.

[next]

बुद्धाच्या मूर्ती

इ. सनाचे चौथे शतक

ही वरील मूर्ती जरी वायव्येकडील असल्या तरी या दोन मात्र संपूर्णपणे दक्षिण महाराष्ट्राच्या परंपरेत बसणाऱ्या आहेत. दोन्हीही "संपदास्थानक" आसनात असून उजवा हात उभय दाखवतो आहे तर डाव्याने संघाती धरलेली आहे. संघाती संपूर्ण गुंडालेली नाही व उजवा खांदा उघडा असून वस्त्राला निऱ्याही नाहीत. मूर्तीच्या कानाच्या पाळ्या लांब आणि गळ्यावर तीन वळ्या असल्या तरी उर्णी दिसत नाही.

या सर्व मूर्ती बरोबरच सापडल्या त्यावरून तर त्या सर्वच कुणा भटक्या यात्रेकरूने जमवून आणल्या असाव्यात या आमच्या तर्काला पुष्टीच मिळते.

[next]

ऋषाभनाथाची चोविसी (उंची ५९ सें. मी.)

इ. स. चे ९वे शतक. चहर्डी, चोपडा तालुका, पूर्व जळगांव जिल्हा.
(मुंबई येथील प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालयात आहे)

जैन कलेचे पुरातन व सर्वोत्तम उदाहरन. चोविसी म्हणजे एका तीर्थकराभोवती इतर त्तेवीस तीर्थकारांच्या आकृत्या असलेले देवघर. या मध्यवर्ती तीर्थकरास मूलनायक असे म्हणतात. या चोविसीतील मूलनायक ऋषभनाथ कायोत्सर्ग आसनात उभा आहे. व त्याचे लांब केस रूंद खांद्यावर रूळत आहेत. ( ही ऋषभनाथाची एक खूण मानतात. ) तेथील सोनेरी श्रीवत्सावरून ही मूर्ती आगमाने नेमून दिलेल्याप्रमाणे शाश्वत प्रतिमा आहे हे समजून येते. पुतळ्याच्या बैठकीत मधोमध एक चक्र असून दोन्ही बाजूस हरणे आहेत. ही हरणे मृगवनातील प्रवचनाची द्योतक असून ती जैनांनी बौद्धांकडून उचलली. चौथऱ्याच्या खालच्या किनारीवर नवग्रह आहेत.

बैठकीतूनच वर आलेल्या कमळात जिनाच्या दोन्ही बाजूस यक्ष-यक्षिणी बसविलेल्या आहेत. या आकृत्या सर्वच जिनांच्या आसपास सरसकट सापडत असल्याने हा नेमका कुठला जिन आहे ते समजण्यास त्यांचा उपयोग नाही. बैकठीच्या मागच्या बाजूस कोरलेले शब्द असे: श्री जलवृध चंद्रकुले श्री प्रद्युम्नचार्य पार्श्वश्रावक्स्य. खरतरगच्छच्या पट्टावलीच्या १७ व्या कडव्यानुसार चंद्रकुल हे चंद्राने स्थापले. चंद्र हा श्रेष्ठी जिनदत्त व ईश्वरी यांच्या तीन पुत्रांपैकी एक. ह्या जोडप्याने सोपारक (सोपारा) येथे उल्कौशिक गोत्राच्या वज्रसेनाकडून दीक्षा घेतली.

या मूर्तीची नीट चिकित्सा करता असे आढळते की धोतराची शैली निश्चितपणे शरिरे, मुकुट, उदरबंध यांच्या पद्धतेवरून _ राष्ट्रकूत शैलीचे आहेत. एका बाजूच्या यक्षीची मस्तकावरणे उत्तर भारतातील प्रतिहार शैलीची आठवण करून देतात, तर दुसरी यक्षी व राजनापूर किंकिणी येथे सापडलेल्याइतर स्त्री-आकृती दक्षिण भारताच्या नोलांबा शैलीत आहेत. वरील छत्रही दक्षिण भारतीय दिगंबर परंपरेतील असून श्वेतांबर मूर्तीमध्ये ते क्वचित आढळते. पश्चिम भारतात दिगंबर जैनांचे प्रस्थ होते हे वेरूळ, अंकाई-तंकाई, खानदेश व दक्षिण महाराष्ट्रातील गुंफांवरून उघड होते. या धर्माला ही लोकप्रियता राष्ट्रकूटांच्या राजाश्रयामुळेच लाभली. विशेषतः राजा अमोघवर्षाच्या ( इ, स. सुमारे ८१४ ते ८७८) उत्तेजनामुळे. म्हणूनच कदाचित ही वरील श्वेतांबर मूर्ती दिगंबर परंपरेचे इतके अनुकरण करून ओतली असावी . तिचा काल हा जैनांच्या भरभरटीचा काल-इ. सनाचे ९ वे शतक- असणार यात शंका नाही.

[next]

बाहुबली (उंची ४९.५सें. मी.)

इ. सनाचे ९ वे शतक राष्ट्रकूट काल.
(मुंबई येथील प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालयात आहे)

प्रथम तीर्थंकर ऋषभ याचा पुत्र बाहुबली याची ही मूर्ती त्याचा प्रायश्चित्तकालाचे चित्रण करते. त्यामुळे त्याच्या अंगावर वेली व वारूळे दाखवली आहेत. निरनिराळ्या चित्रांत व संहितात तो याच स्वरूपात दाखवतात. हा दिगंबर जैनांचा विशेष आवडता आहे. त्याची शरीर यष्टी पैलवानी असून भारदस्त पण बांधेसूद आहे. चेहरा काहीसा बालिश, परंतु भाव अतिशय शांत, समाधानी व ध्यानमग्न योग्याचा आहे. या मूर्तीच्या जाड लांब खांद्यापर्यन्त कापून टाकलेल्या जटा वेरूळच्या गुंफामधील चित्रांसारख्याच आहेत. पण कर्नाटकात दाखवतात तशा छोट्या छोट्या कुरळ्या बटांशी मात्र मुळीच जुळल्या नाहीत.

शिल्पासारखी वेधक आणि मोहक रेषांनी बनवलेली ही ओतीव मूर्ती बाहुबलीच्या इतर कुठल्याही धातुमूर्तीपेक्षा कितीतरी पट सरस आहे.

[next]

यक्षदम्पती (उंची २३.५ सें. मी. )

इ. सनाचे १० वे शतक. राजनापूर किंकिणी
(नागपूरच्या मध्यवर्ती संग्रहालयात आहे.)

हे जोडपे एका साध्या चौथाऱ्यावर त्रिभंग पद्धतीने उभे असून त्याच्या दोन्ही बाजूस चवऱ्या ढाळणारे आहेत. चौथऱ्यावर अष्टग्रह आहेत. या उत्खननात सापडलेल्या मूर्तीतील दोन उत्कृष्ट मूर्तीत या एकीची गणना होते. जोडप्याच्या मागील मखर दोन उभ्या खांबाचे असून प्रत्यकावर एकेक चैत्यगवाक्ष आहे. आडव्या दांड्याच्या मधोमध, बोधिवृक्षसूच्क पानांनी मढलेल्या तिहेरी छत्रीखाली असलेला जिन आहे. वरच्या बाजूची फुला-वेलांची वेलबुट्टी दख्खनी शैलीत आहे. सरस्वतीप्रमाणे यक्षीची केशभूषाही मोठी मेहनतीने व बारकाव्यांनी केलेली आहे. या दोन्ही स्री-आकृती, त्यांचे चेहरे-मोहरे, केस, वगैरे बाबतीत हेमावतीच्या नोलांबा कालातील शिल्पाशी मिळत्याजुळत्या आहेत.

[next]

सरस्वती (उंची २३ सें. मी.)

इ. सनाचे दहावे शतक. राजनापूर किंकिणी
(नागपूरच्या मध्यवर्ती संग्रहालयात आहे)

ओळखण्याची खूण म्हणून हातात पूस्तक धरलेली सरस्वती ही ज्ञानाची देवता हिदूंकडून जैनानीं उचलली. बौद्धात तिचे स्वरूप प्रज्ञापारमिता आहे. जिनांच्या उपदेशावर वरदहस्त ठेवणारी ती श्रुतदेवता आहे. ही मूर्ती अत्यंत साधीसुधी असून तिच्यात कलाकुसरीचा वा दागदागिन्यांचा संपूर्ण अभाव आहे. मागील मखरही साधीच आहे, पण रचनात्मक दृष्ट्या बघता परिणामकारकही. या आधीची मूर्ती एकाच मूर्तिकाराच्या हातून घडविल्या गेल्या आहेत हे उघड आहे.

[next]

अंबिका

इ. सनाचे दहावे शतक. राजनापूर किंकिणी
(नागपूरच्या मध्यवर्ती संग्रहालयात आहे)

अंबिका ह्या ब्राह्मणपत्नीला तिच्या नवऱ्याने ती मुनींना जेवायला घालते म्हणून चिडून घराबाहेर काढले. घराबाहेर पडल्यावर ती एका आंब्याच्या झाडाखाली आपल्या दोन मुलांसह बसली असताना तिला दुरून नवरा येताना दिसला. तेव्हा त्याच्या कोपाल घाबरून तिने विहिरीत उडी देऊन जीव दिला. तिचा नेमिनाथाच्या शासनातील यक्षी म्हणून कोहंद विमानात पुनर्जन्म झाला. त्या जन्मी तिला कुष्मांडी या नावाने ओळखत. तिच्या मखरावर नेहमी नेमिनाठाची प्रतिमा असते.

ही मूर्ती आंब्याच्या झाडाखाली उभी आहे. तिच्या हातात आंब्याचा घड असून दोन्हीकडे दोन मुलगे आहेत. मखर अगदी साधे आहे. वरील दोन मूर्ती ज्या मूर्तिकार संचाने बनवल्या त्यानेच ही सुद्धा बनवली असण्याची दाट शक्यता आहे.

[next]

जिन

इ. सनाचे सोळावे शतक
(कारंजा येथील काष्ठ संघ मंदिरात आहे)

जिन. इ. सनाचे सोळावे शतक
जिन. इ. सनाचे सोळावे शतक


देवतामूर्ती म्हणून, तसेच रचनेच्या दृष्टीनेही हे शिल्प जैन धातुशिल्पात अगदी आगळे आहे. ही सोळाव्या शतकातील मूर्ती कारंजा येथील काष्ठ संघात आहे. मूलनायक ध्यानासनामध्ये त्रिरथ सिंहासनावर तिहेरी छत्रीखाली बसलेला आहे. त्या छत्रीवर एक कलश असून त्यातून बोधिवृक्षसूचक पाने लोंबताना दाखवली आहेत. त्याच्या उजवीकडे एका स्थपतीस्तंभावर पार्श्वनाथ तर डावीकडे बाहुबली आहे. जिनाच्या दोन्ही बाजूस अवतीभवती शासनदेवता, यक्ष-यक्षी वगैरे देठाच्या कमळात बसल्या आहेत. चौथऱ्यावर धर्मचक्रसूचक चक्र आहे. मखराला प्रभावती व बाह्य परिकर आहे.

प्रभावलीत आसनाची पाठ, प्रकाशवलय आणि तिहेरी छत्र यांचा समावेश होतो. आसनाच्य पाठीला दोन गोल खांब आहेत. त्यांच्या दोन्ही बाजूस व्याल आहे. वरचा आडवा दांडा मकरावृत्ती आहे. याच्यावर दोन चर्मधारी यक्ष आहेत. बाह्य परिकराच्या शेवटास एक गोल स्तंभ असून दोन्ही बाजूस दोन-दोन स्थपतीस्तंभ आहेत. प्रत्येकावर शिखर आणि कलश आहेत. बाह्य स्तंभावर बसलेल्या दोन गुबगुबीत व्यक्ती या दिक्‌पाल असाव्यात, परंतु सर्व शिल्प देखाव्यात फक्त दोघांनीच जागा उरलीसे दिसते. सर्व देखाव्यावर तिहेरी फुलांची वेलबुट्टी आहे. परिकराच्या शाखात बसलेले चार वादक दिव्यध्वनिसूचक आहेत. या देखाव्यातील बाहुबली हे एक गूढ आहे आणि अशा प्रकारे तो फक्त आणखी एकाच धातुशिल्पात सापडतो. ते शिल्प पॅरिस येथील म्युझे खिमे येथे आहे.

[next]

लक्ष्मी व गरूडासहित विष्णू (उंची २८ सें. मी.)

इ. सनाचे दहावे शतक.
(मुंबई येथील प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालयात आहे)

चार हाताचा विष्णू संपदा-स्थानकातम त्रिरथ चौथऱ्यावर कमळात उभा असून त्याचे खालचे दोनहात तुटलेले दिसतात. तरीही शंख, चक्र, गदा, पद्‌म त्याने चार हातात धरली असणार हे उघड आहे. रूपमंडण आणि अहिरबुज्ञ संहितेस अनुसरून हा विष्णूच्या चोवीस अवतारांपैकी केशव आहे. असे उदरबंध चाहर्ढी चोविसीतल्या चामरधर यक्षांवर दिसतात. तसेच सोपारा मैत्रेयावरी मूर्तीच्या उजव्या बाजूस अंजलीमुद्रेतील गरूड व डाव्या बाजूस हातात गोंडा घेतलेली लक्ष्मी आहे. मागील मखराची शैली नेहमीचॆ दक्षिणी असून तिथे स्थपती-स्तंभ आणि चैत्य-गवाक्ष दिसतात. त्या सर्वावर फुलां-वेलबुट्टांची नक्षी आहे.

[next]

सप्तबुद्ध आणि मैत्रेय (उंची १२.५ सें.मी.)

(सोपारा येथील स्तूपाच्या सापडले मुंबईच्या एशियाटिक सोसायटीत आहेत)

अशोक मौर्याच्या कारकीर्दीत, मोग्गलीपुत्र तिस्पाने भरविलेल्या तिसऱ्या बौद्ध सभेनंतर बौद्ध धर्मप्रसाराला जो वेग आला त्याचा परिणाम तो धर्म सर्व पश्चिम भारतभर पसरण्यात आला. त्याचा केंद्रबिंदू शूपार्रक (सोपारा) येथे होता. त्याकाळी हे एक मोठे बंदर असून त्याचा उल्लेख तत्कालीन लिखाणतून (उदा. पेरिप्लूस मारिस एरिथ्रेई आणि टॉलमीचा भूगोल) आढळतो. महावंशातील माहितीवरून कळते की धरमरक्षित नावाच्या एका यवन भिक्षूला धरम प्रचारासाठी सोपाऱ्याला पाठवण्यात आले होते.

घारापुरीप्रमाणेच य्थेही थेरवादींच्या दोन उपशाखांनी- धर्मोत्तरीय व भद्रयानीय-स्तूप बांधले आणि अशोकाने ८वे व ९वे शिलालेख येथून जाणाऱ्या-येणाऱ्या स्किथिसन, पर्शियन, रोमन वगैरे परकीयांच्या मार्गदर्शनासाठी बांधले. जवळच कान्हेरी येथे स्थापन केलेल्या बौद्ध विद्यापीठामध्ये ८-९ व्या शतकात अवलोकितेश्वराच्या भक्तगणांचे स्तोम फारच माजले आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून घारापुरीच्या थेरवादींनी आपल्या स्तूपांचे पुनरुत्थान व जीर्णोद्धार वगैरे करून आपल्या शाखांना परत जोम आणण्याचे ठरवले. यासाठी त्यांनी स्तूपांमध्ये एका भिक्षापात्राचे काही तुकडे पवित्र अवशेष म्हणून पुरले व त्यांच्याभोवती सप्तबुंद्धांच्या धातुमूर्ती व मैत्रेय असे शिल्प उभारले. या विश्वभू, शिखी, कुच्छंद, कनकमुनी, कश्यप आणि शाक्यमुनी या सात तथागतांच्या व मैत्रेय हा भावी बुद्ध अशा आठ मूर्ती आहेत. या सर्व घटना घडल्या तो काळ वेरूळ येथील बौद्धधर्मीय धर्मप्रसारकार्यातील उत्तर काळाच्या आसपासच असणार; परंतु त्यानंतर लवकरच सोपारा येथील बौद्ध केंद्राला उताती कळा लागली व ते विस्मृतीत गडप झाले. याउलट, कान्हेरी विद्यापीठ मात्र १५व्या शतकापर्यन्त जोमाने टिकून होते आणि त्यांचा पोर्तुगीच लिखाणात उल्लेख सापडतो.

इ. स. १८८२ मध्ये भगवानालाल इंद्रजी यांना सापडलेल्या गोल दगडी संदुकीत तांब्याची एक लहान पेटी असून तिच्यात एकाहून एक लहान अशा आणखी ४ कुप्या एकमेकीत बसवलेल्या आहेत. त्या अनुक्रमे दगड, चांदी, स्फटिक व सोन्याच्या आहेत. प्रत्येक कुपीत सोन्याची फुले आहेत आणि सर्वात आतल्या सोन्याच्या कुपीत खापराचे काही तुकडे आहेत. ते बुद्धाच्या वा इतर कुणा थोर भिक्षूच्या भिक्षापात्राचे असणार. त्या काळी अशा तऱ्हेने शरीरिका किंवा त्या सहंताच्या रोजच्या वापरातील काही वस्तूंचे अवशेष पुरून त्यांची पूजा करण्याचा प्रघात सर्वत्र होता.

सोपारा येथील अवशेष ज्या अवशेष पेटीत आहेत तिच्या सभोवार वर वर्णन केलेल्या आठ ताम्रमूर्ती आहेत. त्या सर्व आपापल्या बोधिवृक्षाखाली बसलेल्या आहेत आणि त्यातील प्रत्येक सप्तबुद्धांपैकी अमूक एक आहे असे सांगता येत नसले तरी त्या सर्व एकत्र आहेत त्यावरून ते सप्तबुद्ध आहेत असे म्हणायला प्रत्यवाय नसावा. त्यांच्यात विशेष कुठली नांव सांगण्यासारखी शैलीही आढळत नाही, त्यामुळे त्या अमूक काळी किंवा अमूक ठिकाणी घडविल्या असेही ठाम सांगता येत नाही. मैत्रेयानी आकृती व चेहरा मात्र राजनापूर संचातील पुरुषाकृतीशी, दख्खनी विष्णूशी आणि चहार्डी चामरधारांशी मिळताजुळता आहे. यावरून हा सोपारा संच राष्ट्रकूट धर्तीचे ९व्या-१०व्या शतकातील धातुशिल्पच असावा असे वाटते.

[next]

सर्वतोभद्रिका

इ. सनाच्या१४व्या शतकाच्या आसपास
(कारंजा येथील काष्ठसंघ मंदिरात आहे)

आधी म्हटल्याप्रमाणे पूजा-अर्चनावर जसजसा वाढता भर देण्यात येऊ लागला तसतशा मूर्ती अधिक मोठ्या, शृंगारित व बारकावे दर्शविणाऱ्या बनू लागल्या. पण आधीच्या काळातील बांधेसूद मोहकपणा मात्र त्यांच्यातून नाहीसा झाला. या व नंतरच्या मूर्तीवरून हे स्पष्ट दिसते. सर्वतोभद्रिका अथवा चौमुख हे चार मुख्य दिशांस चार दरवाजे असणारे देऊळ असते. शिल्पामध्ये ही कल्पना इ. सनाच्या दुसऱ्या-तिसऱ्या शतकापासूनच मथुरेला आढळते. जैनांमध्ये मूर्तिशिल्पात ही कल्पना दोन तऱ्हांनी मुर्त झालेली दुसरी समावसरण- यात जिन एका दिशेकडे तोंड करून बसलेला असतो आणि त्याच्या लहान सुवर्ण मूर्ती इतर तीन दिशास ठेवलेल्या असतात. या शिल्पात सर्व जिन एका छत्रीखाली उभे असून छत्रीची धारणी पश्चिम भारतीय आहे. तसे पाहता दिगंबर जिन सोडून इतर सर्वच शिल्प-परिकरा पश्चिम शैलीचीच आहे. शिल्पाच्या शिखरावर मध्यवर्ती चैत्य तसेच लहान चार दिशांसही आहेत.

[next]

समावसरण

इ. स. १५व्या शतकाच्या आसपास
(काष्ठसंघ मंदिरात कारंजा येथे आहे)

समावसरणाची कल्पना दिगंबर व श्वेतांबर दोघांसही प्रिय आहे. तीर्थकराला ज्ञान प्राप्त झाल्यावर त्याने केलेल्या प्रवचनाच्या वेळी नेमलेल्या मनुष्य व प्राण्यांच्या मेळाव्याला समावसरण म्हणतात. ही बौद्धांच्या धर्मचक्र प्रवर्तनाशी मिळती जुळती कल्पना असून वसुदेवहिदीत जो जिनाच्या पायाशी असलेल्या धर्मचक्राचा उल्लेख आहे तो याचे द्योतक आहे. या कल्पनेचा अधिक विस्तार अव्यस्थकनिर्युक्ती. त्रिशष्ठी-शलाकरुषचरित आदि जिनसेनाचे महापुराणांमध्ये आढळेल.

समावसरणात विमानवासी, योतिष्क आणि भवनपती देवतांनी उभारलेले तीन तट असतात आणि प्रत्येक तटाला चाअ सुशोभित दरवाजेही. दिगंबर परंपरेनुसार हे बांधकाम मनस्तंभ, अष्टमंगल, पायऱ्यांच्या भिंती, तोरणे, गोपुरे वगैरेंनी सुशोभित केले असून बांधकामाच्या सर्व बाजूंस स्वर्गीय अप्सरांच्या नाचगाण्याच्या कार्यक्रमासाठी बांधलेली रंगमंदिरे असतात. काष्ठसंघतील या शिल्पात या सर्व बारकाव्यांचे उत्तम उदाहरण सापडते. जिन पूर्वेकडच्या दरवाजाने आंत येऊन चैत्र्यवृक्षाला प्रदक्षिणा घालून त्याच्या सिंहासनावर बसतो. मग व्यंतर देवता त्याच्या सुवर्णमूर्ती इतर तीन दिशांस बसवतात.

श्वेतांबर परंपरेत समावसरणाचे उदाहरण बहुतेक करून चित्रात अथवा हस्तलिखितातच सापडते; पण दिगंबरात मात्र १४-१५ व्या शतकात या सर्व कलाकुसरीच्या डौलाऱ्याचि बारकाव्यांसहित प्रतिकृती धातुशिल्पात बनवलेली आढळते.

[next]

खंडोबाच्या मूर्ती

इ. स. १६वे शतक
(हेरास इन्स्टिट्यूट म्युझियम, मुंबई येथे आहे)

शिवाचा अवतार समजल्या जाणाऱ्या खंडोबाचे मुख्य स्थान जेजुरी येथे असून हे महाराष्ट्रातील एक लोकप्रिय दैवत आहे. खंडोबाची मुर्ती नेहमी अश्वारूढ असून त्याच्या हातात खंड असतो. त्याच्याबरोबर त्याची पत्नी बनाई असते. कित्येकदा मूर्तीशेजारी कुत्रेही असतात. येथील दोन मूर्तीपैकी एक पारंपारिक असून दुसरी अधिक लोकशिल्पाकडे झुकणारी आहे. असे धातूचे पत्रे पुष्कळदा वाघ्या गळ्यात घालतात.

[next]

महालक्ष्मी

इ. स. १९-२० वे शतक
(कोल्हापूर संग्रहालयात आहे)

- सदाशिव गोरक्षकर


संपादक मंडळ | Editors
संपादक मंडळ, मराठीमाती डॉट कॉम
मराठीमाती डॉट कॉम वरिल विविध विभागांत लेखन आणि संपादन.

अभिप्राय

अभिप्राय
नाव

अ रा कुलकर्णी,1,अ ल खाडे,2,अ ज्ञा पुराणिक,1,अंकित भास्कर,1,अंजली भाबट-जाधव,1,अंधश्रद्धेच्या कविता,5,अकोला,1,अजय दिवटे,1,अजित पाटणकर,18,अनंत दळवी,1,अनंत फंदी,1,अनंत भावे,1,अनिकेत येमेकर,2,अनिकेत शिंदे,1,अनिल गोसावी,2,अनिल भारती,1,अनिल वल्टे,2,अनुभव कथन,19,अनुरथ गोरे,1,अनुराधा पाटील,1,अनुराधा फाटक,39,अनुवादित कविता,1,अपर्णा तांबे,7,अब्राहम लिंकन,2,अभंग,6,अभिजित गायकवाड,1,अभिजीत टिळक,2,अभिव्यक्ती,1347,अभिषेक कातकडे,4,अमन मुंजेकर,7,अमरश्री वाघ,2,अमरावती,1,अमित पडळकर,4,अमित पवार,1,अमित बाविस्कर,3,अमित सुतार,1,अमुक-धमुक,1,अमृत जोशी,1,अमृता शेठ,1,अमोल कोल्हे,1,अमोल तांबे,1,अमोल देशमुख,1,अमोल बारई,3,अमोल वाघमारे,1,अमोल सराफ,2,अरविंद जामखेडकर,1,अरविंद थगनारे,5,अरुण कोलटकर,1,अर्चना कुळकर्णी,1,अर्चना डुबल,2,अर्जुन फड,3,अर्थनीति,3,अल्केश जाधव,1,अविनाश धर्माधिकारी,2,अशोक थोरात,1,अशोक रानडे,1,अश्विनी तातेकर-देशपांडे,1,अश्विनी तासगांवकर,2,अस्मिता मेश्राम-काणेकर,7,अहमदनगर,1,अक्षय वाटवे,1,अक्षरमंच,1087,आईच्या कविता,29,आईस्क्रीम,3,आकाश पवार,2,आकाश भुरसे,8,आज,5,आजीच्या कविता,1,आठवणींच्या कविता,18,आतले-बाहेरचे,3,आतिश कविता लक्ष्मण,1,आत्मविश्वासाच्या कविता,14,आदित्य कदम,1,आदेश ताजणे,8,आनं कविता,1,आनंद दांदळे,8,आनंद प्रभु,1,आनंदाच्या कविता,25,आमट्या सार कढी,18,आर समीर,1,आरती गांगण,2,आरती शिंदे,4,आरत्या,82,आरोग्य,21,आशा गवाणकर,1,आशिष खरात-पाटील,1,आशिष चोले,1,इंदिरा गांधी,1,इंदिरा संत,6,इंद्रजित नाझरे,26,इंद्रजीत भालेराव,1,इतिहास,220,इसापनीती कथा,48,उत्तम कोळगावकर,2,उदय दुदवडकर,1,उन्मेष इनामदार,1,उपवासाचे पदार्थ,15,उमेश कानतोडे,1,उमेश कुंभार,14,उमेश चौधरी,1,उस्मानाबाद,1,ऋग्वेदा विश्वासराव,5,ऋचा पिंपळसकर,10,ऋचा मुळे,18,ऋषिकेश शिरनाथ,2,ऋषीकेश कालोकार,2,ए श्री मोरवंचीकर,1,एच एन फडणीस,1,एप्रिल,30,एम व्ही नामजोशी,1,एहतेशाम देशमुख,2,ऐतिहासिक स्थळे,1,ऑक्टोबर,31,ऑगस्ट,31,ऑडिओ कविता,15,ऑडिओ बुक,1,ओंकार चिटणीस,1,ओम ढाके,8,ओमकार खापे,1,ओशो,1,औरंगाबाद,1,कपिल घोलप,13,करण विधाते,1,करमणूक,71,कर्क मुलांची नावे,1,कल्याण इनामदार,1,कविता शिंगोटे,1,कवितासंग्रह,279,कवी अनिल,1,कवी ग्रेस,4,कवी बी,1,काजल पवार,1,कार्यक्रम,12,कार्ल खंडाळावाला,1,कालिंदी कवी,2,काशिराम खरडे,1,कि का चौधरी,1,किरण कामंत,1,किल्ले,97,किल्ल्यांचे फोटो,5,किशोर चलाख,6,किशोर पवार,1,कुठेतरी-काहीतरी,3,कुणाल खाडे,3,कुणाल लोंढे,1,कुसुमाग्रज,10,कृष्णकेशव,1,कृष्णाच्या आरत्या,5,के के दाते,1,के तुषार,8,के नारखेडे,2,केदार कुबडे,40,केदार नामदास,1,केदार मेहेंदळे,1,केशव मेश्राम,1,केशवकुमार,2,केशवसुत,5,कोल्हापूर,1,कोशिंबीर सलाड रायते,14,कौशल इनामदार,1,खंडोबाची स्थाने,2,खंडोबाच्या आरत्या,2,खरगपूर,1,ग दि माडगूळकर,6,ग ल ठोकळ,3,ग ह पाटील,4,गंगाधर गाडगीळ,1,गडचिरोली,1,गणपतीच्या आरत्या,5,गणपतीच्या गोष्टी,24,गणेश कुडे,2,गणेश तरतरे,19,गणेश निदानकर,1,गणेश पाटील,1,गणेश भुसारी,1,गण्याचे विनोद,1,गाडगे बाबा,1,गायत्री सोनजे,5,गावाकडच्या कविता,13,गुरुदत्त पोतदार,2,गुरूच्या आरत्या,2,गुलझार काझी,1,गो कृ कान्हेरे,1,गो गं लिमये,1,गोकुळ कुंभार,13,गोड पदार्थ,56,गोपीनाथ,2,गोविंद,1,गोविंदाग्रज,1,गौतम जगताप,1,गौरांग पुणतांबेकर,1,घरचा वैद्य,2,घाट,1,चंद्रकांत जगावकर,1,चंद्रपूर,1,चटण्या,3,चातुर्य कथा,6,चित्रपट समीक्षा,1,चैतन्य म्हस्के,1,चैत्राली इंगळे,2,जयश्री चुरी,1,जयश्री मोहिते,1,जवाहरलाल नेहरू,1,जळगाव,1,जाई नाईक,1,जानेवारी,31,जालना,1,जितेश दळवी,1,जिल्हे,31,जीवनशैली,431,जुलै,31,जून,30,ज्योती किरतकुडवे,1,ज्योती मालुसरे,1,टीझर्स,1,ट्रेलर्स,3,ठाणे,2,डिसेंबर,31,डॉ मानसी राजाध्यक्ष,1,डॉ. दिलीप धैसास,1,तनवीर सिद्दिकी,1,तन्मय धसकट,1,तरुणाईच्या कविता,7,तिच्या कविता,63,तुकाराम गाथा,4,तुकाराम धांडे,1,तुतेश रिंगे,1,तेजस्विनी देसाई,1,दत्ता हलसगीकर,2,दत्ताच्या आरत्या,5,दत्तात्रय भोसले,1,दत्तो तुळजापूरकर,1,दया पवार,1,दर्शन जोशी,2,दर्शन शेळके,1,दशरथ मांझी,1,दादासाहेब गवते,1,दामोदर कारे,1,दिनदर्शिका,366,दिनविशेष,366,दिनेश बोकडे,1,दिनेश लव्हाळे,1,दिनेश हंचाटे,1,दिपक शिंदे,2,दिपाली गणोरे,1,दिवाळी फराळ,26,दीपा दामले,1,दीप्तीदेवेंद्र,1,दुःखाच्या कविता,75,दुर्गेश साठवणे,1,देवीच्या आरत्या,3,देशभक्तीपर कविता,2,धनराज बाविस्कर,69,धनश्री घाणेकर,1,धार्मिक स्थळे,1,धुळे,1,धोंडोपंत मानवतकर,12,नमिता प्रशांत,1,नलिनी तळपदे,1,ना के बेहेरे,1,ना घ देशपांडे,4,ना धों महानोर,3,ना वा टिळक,1,नांदेड,1,नागपूर,1,नारायण शुक्ल,1,नारायण सुर्वे,2,नाशिक,1,नासीर संदे,1,निखिल पवार,3,नितीन चंद्रकांत देसाई,1,निमित्त,4,निराकाराच्या कविता,11,निवडक,7,निसर्ग कविता,33,निळू फुले,1,नृसिंहाच्या आरत्या,1,नोव्हेंबर,30,न्याहारी,50,पथ्यकर पदार्थ,2,पद्मा गोळे,4,परभणी,1,पराग काळुखे,1,पर्यटन स्थळे,1,पल्लवी माने,1,पवन कुसुंदल,2,पांडुरंग वाघमोडे,3,पाककला,322,पाककृती व्हिडिओ,15,पालकत्व,7,पावसाच्या कविता,36,पी के देवी,1,पु ल देशपांडे,9,पु शि रेगे,1,पुंडलिक आंबटकर,3,पुडिंग,10,पुणे,13,पुरुषोत्तम जोशी,1,पुरुषोत्तम पाटील,1,पुर्वा देसाई,2,पूजा काशिद,1,पूजा चव्हाण,1,पूनम राखेचा,1,पोस्टर्स,5,पोळी भाकरी,27,पौष्टिक पदार्थ,20,प्र श्री जाधव,12,प्रकाश पाटील,1,प्रजोत कुलकर्णी,1,प्रतिक बळी,1,प्रतिभा जोजारे,1,प्रतिमा इंगोले,1,प्रतिक्षा जोशी,1,प्रदिप कासुर्डे,1,प्रफुल्ल चिकेरूर,10,प्रभाकर महाजन,1,प्रभाकर लोंढे,3,प्रवास वर्णन,1,प्रवासाच्या कविता,11,प्रविण पावडे,15,प्रवीण दवणे,1,प्रवीण राणे,1,प्रसन्न घैसास,2,प्रज्ञा वझे,2,प्रज्ञा वझे-घारपुरे,10,प्राजक्ता गव्हाणे,1,प्रितफुल प्रित,1,प्रिती चव्हाण,27,प्रिया जोशी,1,प्रियांका न्यायाधीश,3,प्रेम कविता,97,प्रेरणादायी कविता,17,फ मुं शिंदे,3,फादर स्टीफन्स,1,फेब्रुवारी,29,फोटो गॅलरी,10,फ्रॉय निस्सेन,1,बहिणाबाई चौधरी,6,बा भ बोरकर,8,बा सी मर्ढेकर,6,बातम्या,11,बाबा आमटे,1,बाबाच्या कविता,8,बाबासाहेब आंबेड,1,बायकोच्या कविता,5,बालकविता,14,बालकवी,8,बाळाची मराठी नावे,1,बाळासाहेब गवाणी-पाटील,21,बिपीनचंद्र नेवे,1,बी अरुणाचलाम्‌,1,बी रघुनाथ,1,बीड,1,बुलढाणा,1,बेकिंग,9,बेहराम कॉन्ट्रॅक्टर,1,भंडारा,1,भक्ती कविता,18,भक्ती रावनंग,1,भरत माळी,2,भा दा पाळंदे,1,भा रा तांबे,7,भा वें शेट्टी,1,भाज्या,29,भाताचे प्रकार,16,भानुदास,1,भानुदास धोत्रे,1,भुषण राऊत,1,भूगोल,1,भूमी जोशी,1,म म देशपांडे,1,मं वि राजाध्यक्ष,1,मंगला गोखले,1,मंगळागौरीच्या आरत्या,2,मंगेश कळसे,9,मंगेश पाडगांवकर,5,मंजुषा कुलकर्णी,2,मंदिरांचे फोटो,3,मंदिरे,4,मधल्या वेळेचे पदार्थ,41,मधुकर आरकडे,1,मधुकर जोशी,1,मधुसूदन कालेलकर,2,मनमोहन नातू,3,मनाचे श्लोक,205,मनिषा दिवेकर,3,मनिषा फलके,1,मराठी,1,मराठी उखाणे,2,मराठी कथा,107,मराठी कविता,1130,मराठी कवी,3,मराठी कोट्स,4,मराठी गझल,27,मराठी गाणी,2,मराठी गोष्टी,67,मराठी चारोळी,42,मराठी चित्रपट,18,मराठी टिव्ही,52,मराठी नाटक,1,मराठी पुस्तके,5,मराठी प्रेम कथा,23,मराठी भयकथा,44,मराठी मालिका,19,मराठी रहस्य कथा,2,मराठी लेख,47,मराठी विनोद,1,मराठी साहित्य,286,मराठी साहित्यिक,2,मराठी सुविचार,2,मराठीप्रेमी पालक महासंमेलन,5,मराठीमाती,147,मसाले,12,महात्मा गांधी,8,महात्मा फुले,1,महाराष्ट्र,304,महाराष्ट्र फोटो,10,महाराष्ट्राचा इतिहास,32,महाराष्ट्रीय पदार्थ,22,महालक्ष्मीच्या आरत्या,2,महेंद्र म्हस्के,1,महेश जाधव,3,महेश बिऱ्हाडे,9,मांसाहारी पदार्थ,17,माझं मत,4,माझा बालमित्र,90,मातीतले कोहिनूर,19,माधव ज्यूलियन,6,माधव मनोहर,1,माधवानुज,3,मानसी सुरज,1,मारुतीच्या आरत्या,2,मार्च,31,मीना तालीम,1,मुंबई,12,मुंबई उपनगर,1,मुकुंद भालेराव,1,मुकुंद शिंत्रे,35,मुक्ता चैतन्य,1,मुलांची नावे,1,मुलाखती,1,मे,31,मैत्रीच्या कविता,7,मोहिनी उत्तर्डे,2,यवतमाळ,1,यशपाल कांबळे,4,यशवंत दंडगव्हाळ,24,यादव सिंगनजुडे,2,योगा,1,योगेश कर्डिले,6,योगेश सोनवणे,2,रंगपंचमी,1,रंजना बाजी,1,रजनी जोगळेकर,5,रत्नागिरी,1,रविंद्र गाडबैल,1,रविकिरण पराडकर,1,रवींद्र भट,1,रा अ काळेले,1,रा देव,1,रागिनी पवार,1,राजकीय कविता,12,राजकुमार शिंगे,1,राजेंद्र भोईर,1,राजेश पोफारे,1,राजेश्वर टोणे,3,राम मोरे,1,रामकृष्ण जोशी,2,रामचंद्राच्या आरत्या,5,रायगड,1,राहुल अहिरे,3,रुपेश सावंत,1,रेश्मा जोशी,2,रेश्मा विशे,1,रोहित काळे,7,रोहित साठे,14,लघुपट,3,लता मंगेशकर,2,लहुजी साळवे,1,लक्ष्मण अहिरे,2,लक्ष्मीकांत तांबोळी,2,लातूर,1,लिलेश्वर खैरनार,2,लीना पांढरे,1,लीलावती भागवत,1,लोकमान्य टिळक,3,लोणची,9,वंदना विटणकर,2,वर्धा,1,वसंत बापट,12,वसंत साठे,1,वसंत सावंत,1,वा गो मायदेव,1,वा ना आंधळे,1,वा भा पाठक,2,वा रा कांत,3,वात्रटिका,2,वामन निंबाळकर,1,वासुदेव कामथ,1,वाळवणाचे पदार्थ,6,वि दा सावरकर,3,वि भि कोलते,1,वि म कुलकर्णी,5,वि स खांडेकर,1,विंदा करंदीकर,8,विक्रम खराडे,1,विचारधन,215,विजय पाटील,1,विजया जहागीरदार,1,विजया वाड,2,विजया संगवई,1,विठ्ठल वाघ,3,विठ्ठलाच्या आरत्या,5,विद्या कुडवे,4,विद्या जगताप,2,विद्याधर करंदीकर,1,विनायक मुळम,1,विरह कविता,58,विराज काटदरे,1,विलास डोईफोडे,4,विवेक जोशी,3,विशाल शिंदे,1,विशेष,12,विष्णूच्या आरत्या,4,विज्ञान तंत्रज्ञान,2,वृषाली काकडे,2,वृषाली सुनगार-करपे,1,वेदांत कोकड,1,वैभव गव्हाळे,1,वैभव सकुंडे,1,वैशाली झोपे,1,वैशाली नलावडे,1,व्यंगचित्रे,55,व्रत-वैकल्ये,1,व्हिडिओ,13,शंकर रामाणी,1,शंकर विटणकर,1,शंकर वैद्य,1,शंकराच्या आरत्या,4,शरणकुमार लिंबाळे,1,शशांक रांगणेकर,1,शशिकांत शिंदे,1,शां शं रेगे,1,शांततेच्या कविता,7,शांता शेळके,11,शांताराम आठवले,1,शाम जोशी,1,शारदा सावंत,4,शाळेचा डबा,15,शाळेच्या कविता,10,शितल सरोदे,1,शिरीष पै,1,शिरीष महाशब्दे,8,शिल्पा इनामदार-आर्ते,1,शिवाजी महाराज,7,शिक्षकांवर कविता,4,शुभम बंबाळ,2,शुभम सुपने,2,शेतकर्‍याच्या कविता,13,शेती,1,शेषाद्री नाईक,1,शैलेश सोनार,1,श्याम खांबेकर,1,श्रद्धा नामजोशी,9,श्रावणातल्या कहाण्या,27,श्री दि इनामदार,1,श्री बा रानडे,1,श्रीकृष्ण पोवळे,1,श्रीधर रानडे,2,श्रीधर शनवारे,1,श्रीनिवास खळे,1,श्रीपाद कोल्हटकर,1,श्रीरंग गोरे,1,श्रुती चव्हाण,1,संघर्षाच्या कविता,32,संजय उपाध्ये,1,संजय डोंगरे,1,संजय पाटील,1,संजय बनसोडे,2,संजय शिंदे,1,संजय शिवरकर,5,संजय सावंत,1,संजीवनी मराठे,3,संत एकनाथ,1,संत चोखामेळा,1,संत जनाबाई,1,संत तुकडोजी महाराज,2,संत तुकाराम,8,संत नामदेव,3,संत ज्ञानेश्वर,6,संतोष जळूकर,1,संतोष झोंड,1,संतोष सेलुकर,30,संदिप खुरुद,5,संदीपकुमार खुरुद,1,संदेश ढगे,39,संध्या भगत,1,संपादक मंडळ,1,संपादकीय,11,संपादकीय व्यंगचित्रे,2,संस्कार,2,संस्कृती,133,सई कौस्तुभ,1,सचिन पोटे,12,सचिन माळी,1,सण-उत्सव,22,सणासुदीचे पदार्थ,32,सतिश चौधरी,1,सतीश काळसेकर,1,सदानंद रेगे,2,सदाशिव गायकवाड,2,सदाशिव माळी,1,सनी आडेकर,10,सप्टेंबर,30,समर्थ रामदास,206,समर्पण,9,सरबते शीतपेये,8,सरयु दोशी,1,सरला देवधर,1,सरिता पदकी,3,सरोजिनी बाबर,1,सलीम रंगरेज,8,सविता कुंजिर,1,सांगली,1,सागर बनगर,1,सागर बाबानगर,1,सातारा,1,साने गुरुजी,5,सामाजिक कविता,112,सामान्य ज्ञान,8,सायली कुलकर्णी,7,साहित्य सेतू,1,साक्षी खडकीकर,9,साक्षी यादव,1,सिंधुदुर्ग,1,सिद्धी भालेराव,1,सिमा लिंगायत-कुलकर्णी,3,सुदेश इंगळे,20,सुधाकर राठोड,1,सुनिल नागवे,1,सुनिल नेटके,2,सुनील गाडगीळ,1,सुभाष कटकदौंड,2,सुमती इनामदार,1,सुमित्र माडगूळकर,1,सुरज दळवी,1,सुरज दुतोंडे,1,सुरज पवार,1,सुरेश भट,2,सुरेश सावंत,2,सुशील दळवी,1,सुशीला मराठे,1,सुहास बोकरे,6,सैनिकांच्या कविता,4,सैरसपाटा,127,सोपानदेव चौधरी,1,सोमकांत दडमल,1,सोलापूर,1,सौरभ सावंत,1,स्तोत्रे,2,स्नेहा कुंभार,1,स्फुटलेखन,2,स्फूर्ती गीत,1,स्माईल गेडाम,4,स्वप्नाली अभंग,5,स्वप्नील जांभळे,1,स्वाती काळे,1,स्वाती खंदारे,320,स्वाती गच्चे,1,स्वाती दळवी,9,स्वाती नामजोशी,31,स्वाती पाटील,1,स्वाती वक्ते,2,ह मुलांची नावे,1,हमार्टिक समा,1,हरितालिकेच्या आरत्या,1,हर्षद खंदारे,42,हर्षद माने,1,हर्षदा जोशी,3,हर्षवर्धन घाटे,2,हर्षाली कर्वे,2,हसनैन आकिब,3,हेमंत जोगळेकर,1,हेमंत देसाई,1,हेमंत सावळे,1,हेमा चिटगोपकर,8,होळी,5,ज्ञानदा आसोलकर,1,ज्ञानदेवाच्या आरत्या,2,
ltr
item
मराठीमाती । माझ्या मातीचे गायन: प्राचीन धातुमूर्ती - महाराष्ट्र
प्राचीन धातुमूर्ती - महाराष्ट्र
प्राचीन धातुमूर्ती, महाराष्ट्र - [Prachin Dhatumurti - Maharashtra] धातू शिल्प कलेच्या विकासास महाराष्ट्राने उल्लेखनीय हातभार लावला आहे.
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhKo-v0C9_BYxJ6Cl3E-Cx7zrBk5hwWRg-q4RjvJmyDdskK_3Fjogyz0-WXeQ67x4CDArBEWx0wRgSeWkzT616CwnABETeNLb72yVljzJNOeh832mTFPk7ixt8382iFCEzgChuLAQHMk_Ch/s1600/jin-dhatu-murti.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhKo-v0C9_BYxJ6Cl3E-Cx7zrBk5hwWRg-q4RjvJmyDdskK_3Fjogyz0-WXeQ67x4CDArBEWx0wRgSeWkzT616CwnABETeNLb72yVljzJNOeh832mTFPk7ixt8382iFCEzgChuLAQHMk_Ch/s72-c/jin-dhatu-murti.jpg
मराठीमाती । माझ्या मातीचे गायन
https://www.marathimati.com/2008/04/prachin-dhatumurti-maharashtra.html
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/2008/04/prachin-dhatumurti-maharashtra.html
true
2079427118266147504
UTF-8
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची