कारागिरी - महाराष्ट्र

कारागिरी, महाराष्ट्र - [Karagiri, Maharashtra] हस्तकलापरंपरा झपाट्याने नाहीशा होत चालल्यामुळे, देशाचा समृद्ध सांस्कृतिक वारसाही उणावत चालला आहे

हस्तकलापरंपरा झपाट्याने नाहीशा होत चालल्यामुळे, देशाचा समृद्ध सांस्कृतिक वारसाही उणावत चालला आहे

जगातील अनेक देशांमध्ये झपाट्याने होत चाललेल्या औद्योगीकरनामुळे हस्तकलांपरंपराना उतरती कळा येत चालली आहे. केवळ औदोगिरकरणामुळे हस्तकलांन हा धोका निर्माण झाला असे नाही; परंतु भक्कम आर्थिक पाठबळ; मोढ्या प्रमाणावर उत्पादन आणि कार्यक्षम विपणन यामुळे उद्योगधंदा ही अशी एक संय्क्त शक्ती झालेली आहे की, एखादे दृढ भक्कम हस्तकला व्यवसायकेंद्रही तिला तोंड देऊ शकत नाही. त्यामुळे अपरिहार्यपणेच हस्तकला व्यवसायाला मरगळ आली आहे आणि, हस्तकलापरंपरा झपाट्याने नाहीशा होत चालल्यामुळे, देशाचा समृद्ध सांस्कृतिक वारसाही उणावत चालला आहे.

हातांनी वस्तू तयार करणाऱ्या सगळ्यांचा हस्तकला व्यावसायिकात समावेश करता येत नाही हे स्पष्ट केले पाहिजे. वस्तू निर्माण करणारा आणि ती घडवणारा यांत सूक्ष्म फरक. औधोगिक कामगारही आपल्या हातांनी वस्तू तयार करतो; परंतु त्या वस्तूंची निर्मिती त्याने कल्पिलेली नसते. हस्तकलाव्यावसायिकांची कलाकृती हाच त्यांचा वस्तू तयार असतो. त्यामध्ये त्यांचे मन, भावना आणि आत्मा गुंतलेले असतात. ती वस्तू निर्माण करताना वर्षानुवर्षे मेहनत घेऊन कमावलेले शिस्तबद्ध शिक्षण तो वापरतो. त्याच्या आधीच्या पिढ्यांप्रमाणेच त्यानेही साधने न्याहळलेली असतात आणि वस्तूंना आकार आणि घाट देताना तो वंशपरंपरागत कौशल्यच वापरतो. तरी सुद्धा हे करीत असताना भारतात हस्तकलाव्यावसायिक कारागीर आणि कलावंत यांच्यामध्ये फरक केला जात नाही. मुळात या दोन्हींसाठी शिल्पकार हा एकच शब्द वापरला जातो. हीच संज्ञा वास्तुशास्त्रज्ञालाही वापरली जाते हे लक्षणीय आहे.

[next]

विश्रामकालीन हस्तकला व्यावसायिक


कौटुंबिक समारंभम सार्वजनिक मेळे आणि उत्सव अशा विविध ठिकाणी अनेक हस्तकला व्यावसायिकांना आपली गुणवत्ता दाखविण्याची संधी मिळते. खेड्यांमध्ये आणि छोट्या शहरांमध्ये ठराविक मनोरंजनाचा अभाव असल्यामुळे चित्रकला, भरतकाम, विण्काम कोरीव काम यासारख्या फावल्या वेळातील उद्योगांना चालना मिळते. शहरात मात्र असा रिकामा वेळ ही एक दुर्मिळ गोष्ट असल्यामुळे हस्तकला व्यवसाय हळूहळू नष्टा होत आहे. बहुधा आपल्या उत्पन्नामध्ये भर घालण्याच्या उद्देशाने जोपासले जाणारे हस्तकलांचे विविध छंद सोडता महानगरामध्ये समर्पित कारागिरी क्वचितच आढळते. ग्रामीण आणि आदिवासी मनुष्य निरित द्रव्याकडे त्यांचा सृजनात्मक उपयोग कसा करता येईल या दृष्टीने पाहातो. आपल्या भोवतीच्या सगळ्या गोष्टींना सजवणे, शोभिवंत करणे याकडे त्याचा स्वभावतःच कल असतो. उदा. महाराष्ट्रातील वारली कुटुंबात बारशाच्या वा विवाहाच्या समारंभाच्या निमित्ताने आपल्या घराच्या भिंतीवर चित्रे काढतात. सामान्यतः स्त्रियाच हे काम करीत असतात, परंतु जिव्या सोमा मसे नावाच्या अत्यंत कुश्ल हस्तकला व्यावसायिकाने या कलेला पूर्णत्व दिले आहे आणि त्याला अनेक उत्सव आणि यात्रांमध्ये भाग घेण्यासाठी आमंत्रणे येतात. तेथे त्याच्या सवयीच्या वातावरणापासून दूर असा तो तासन्‌ तास काम करीत बसलेला असतो. त्याने असे यांत्रिकपणे कागदावर चित्रे काढीत बसावे आणि जिज्ञासूना त्याच्या कलेचे प्रदर्शन घडवावे अशी अपेक्षा असते. या परक्या वातावरणात कामकरीत असताना त्याची स्फूर्ती त्याला सोडून गेलेली दिसते आणि परिणामतः त्याच्या कलाकृती निर्जीव आणि निस्तेज वाटतात . जिव्या सोमा मसेला खरी गरज आहे ती त्याच्या स्वतःच्या खेड्यामध्ये स्वतःसाठी ऐक सुसज्ज स्टुडिओ बांधण्यासाठी लागणाऱ्या आर्थिक मदतीची. तिथे तो त्याच्या आत्म्यातून जिवंत झऱ्यासारखी आलेली आणि आपणा सर्वाना समृद्ध करणारी त्याची कला चिरस्थायी करण्यासाठी व तिचा विकास घडविण्यासाठी अनेक तरुण मुलांना हाताशी धरुन अपल्या कलेचे शिक्षण देवू शकेल.

आदिवासी चित्रकलेप्रमाणेच बंजारा या महाराष्ट्रातील भटक्या जमातीची भरकामकला ही देखील ऐक विश्रामकालीन कला म्हणून विकसित झालेलॊ असून बऱ्यापैकी उत्पन्नाचे साधन बनली आहे. या हस्तकला व्यवसायाचे रहस्य हे आहे की या कारागीरांनी गोपीबाई संग्राम जाधव या निपुणकारागीर बाईंच्या अध्यक्षतेखाली ऐक संघटना स्थापन केली आहे. आपले पारंपारिक रंग आणि रचना टिकवून ठेवण्यासाठी या संस्थेला प्रयत्न करावे लागतात. संस्थेचे सभासदच एकत्रिपणे वस्तूंच्या किमती निश्चित करीत असल्यामुळे किमती खाली आणण्यासाठी त्यांच्यात परपस्परांच्या विरूध ग्राहकांनेई स्पर्धा निर्माण करण्यात धोका कमी होतो. महत्त्वाचा गोष्ट म्हणजे ते आपल्या वस्तूंच्या दर्जाच्या बाबतीत तडजोड करीत नाहीत आणि त्यामुळेच त्यांच्या कलेचे मूल्य जाणकारांत नेहमीच अधिक मानले जाईल.

[next]

हंगामी कारागीर


शेती करणारी किंवा कृषिव्यसायशी संबंधित असणारी अनेक कुटुंबे किंवा ग्रामीण भागात राहणार्या लोकांना वर्षातून त्यांच्या नेहमीच्या क्मातून फुरसतीचा वेळ मिळतो. त्यावेळी ते एखादा हस्तकला व्यवसाय करू शकतात. पावसाची वाट पाहाण्याच्या किंव पीक तयार होण्याच्या काळात ते आपल्या जमिनीतून मिळणाऱ्या गोष्टींपासून काहेई वस्तू तयार करण्याकडे वळतात. अशा हंगामी आदिवासी कारागीरांमध्ये सर्वात उल्लेखनीय कारागीर म्हणजे वेताच्या व बांबूच्या टोपल्या आणि चट्या विणणारे लोक. एके काळी महाराष्ट्रात ते घोळक्याघ्ळक्याने एका आंबराईतून दुसऱ्या आंबराईत हंगांमाच्या इद्वसात हिंडत असत. बाजारात फळे पाठवण्यासाठी लागणाऱ्या टोपल्या विणण्यासाठी त्यांना पैसे दिले जात दुर्दैवाने आज त्यांचे आंबईत जाणे थांबले आहे आणि त्यामुळे आंबे पाठविण्यासाठी टोपल्यांऐवजी किमती लाकडाची खोकी वापरली जातात. इतर बऱ्याच राज्यांमध्ये वेत आणि बांबू यांचे पुरेसे उत्पादा होत असल्यामुळे अनेक लोकांना वर्षभर पुरेल ऐवढे विणण्याचे काम मिळू शकते. महाराष्ट्राच्या बहुतेक भागामध्ये टोपल्या विणणाऱ्याला सुकलेली पाने, तंतू, साली आणि थोडासा बांबू (उत्तम प्रकारचा बहुतेक बांबू कागद कारखान्यांनी हस्तगत केलेला) यांवर विसंबून राहावे लागते. अखेरीस, अवर्षण काळात कामही नाही आणि पाणीही नाही अशा स्थितीत खेडूत स्थलांतर करतात. त्यातले कित्येक खेड्यांकडे पुन्हा फिरकतही नाहीत.

या हंगांमी वस्तू विकण्याचे आणि तयार करण्याचे किंवा कारागीराच्या स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी विनिमयाखातर वापरता येण्याचे ठिकाण म्हणजे जत्रा किंवा मेळे. स्वस्तातले कृत्रिम धाग्याचे कापड आणि अशाच काही वस्तू विकणारे शहरी दुकानदारही या ठिकाणी येतात आणि कारागीरांना स्थानभ्रष्ट करतात. मेळा किंवा यत्रा हे युवक-येवुतींना एकत्र आणणरे, रात्र नाचगाण्यात घालवण्याचे आणि आपापले जीवनसाथी शोधण्याचे ठिकाण. पण ते देखील आता हौशी पर्यटकांनी घेरून टाकल्यामुळे, एरवी खेडुतांना भावपूर्ण वाटणरी ही घटना आता "टूरिझम" च्या नावाखाली बीभत्स बनली आहे.

लोकांना एकमेकांशी भेटण्याची, विचारविमर्श करण्याची, तसेच प्रसिद्ध कलावंतांना पाहण्याची मेळ्यात संधी मिळते. परंतु तेही आता राजकीय पक्षांच्या केंद्रातून ध्वनिक्षेपकातून वाहाणाऱ्या कर्कश, कानठळ्या बसवणाऱ्या आवाजाने किंवा अधूनमधून वाजवल्य जाणऱ्या फिल्मी गीतांनी वा राजकीय घोषणांनी मूक झाले आहेत. आपल्या खेडुतांची मुळातली सहज आणि प्रेमळ संस्कृती बाजूला फेकली जाते आहे आणि कारागीराने केलेल्या वस्तूंच्या विक्रीची एकमेव संधी खरोखर नष्ट होत आहे.

[next]

पारंपारिक अथवा आनुवंशिक हस्तला व्यावसायिक


केवळ जन्मामुळे भारतातील मुले अगणित पिढ्यांनी सोपवलेल्या समृद्ध परंपरेची वारस ठरतात. छोट्या खेड्यात किंवा वाडवडिलांनी बांधलेल्या देवळांच्या, राजवाड्यांच्या , स्मारकांच्या परिसरात राहणारी ही मुले जीवनाच्या आनि शिक्षणाच्या कडक नियमांचे पालन करीत वाढतात व हस्तकला व्यावसायिकांची एक नवी पिढी उदयास येते. हे परंपरा दीक्षित हस्तकला व्यावसायिक देशातल्या सर्वोत्तम वस्तू निर्माण करतात.

औद्योगिक संस्था हस्तकला व्यावसायिक प्राधान्याने निवडतात ते त्यांच्या शिस्त. एकाग्रता आणि हातांच वापर करण्याची क्षमता या गुणांमुळे. जादा मजुरी, शहरी संस्कृतीचे आकर्षण यांमुळे हळूहळू हस्तकलाव्यासियक ग्रामीण प्रदेश सोडूननिघून जात आहेत. शहरातील झोपडपट्टीत रह्त असलेले हे माजी हस्तकला व्यावसायिक आपल्या मुलांना कलेचा वारासा देऊ शकत नसल्यामुळे ही मुले यापुढे अकुशल कामगार म्हणून वाढतील. पारंपरिक शिक्षणाचे मूल्यमापन करण्यात आपण अयशस्वी ठरलो आहोतआणि ते आपल्या शिक्षण पद्धतीतून वगळून तरूण पिढीवर अन्याय करीत आहोत ही एक शोकात्मिका आहे.

[next]

हस्तकला


महाराष्ट्राच्या अजून दृढ टिकून असलेल्या पारंपारिक हस्तकला म्हणजे विणकाम आणि धातूकाम. या आणि इता हस्तकला, कोल्हापूरी चप्पल वगळूनम लहान प्रमाणात छोट्या, दुर्लक्षित विभागात कार्यरत दिसतात.

[next]

विणकाम


या शतकाच्या आरंभापर्यन्त वस्त्र ही या राज्यातील एक उल्लेखनीय निर्मिती होती. पुढे या उद्योगावर नियंत्रणे आली. परंतु १९४७ मध्ये मिळालेल्य राजकीय स्वातंत्र्यामुळे आपल्या क्षीण झालेल्या हस्तकला परंपरेविषयीच्या कुतूहलाचे पुनरुज्जीवन झाले. महाराष्ट्रात विणलेल्या सतरंज्या बिचायतीसाठी प्रसिद्ध आहेत आणि महाराष्ट्रीय साड्या व खण यांना स्वतःचे असे वेगळे व्यक्तिमत्व आहे.

[next]

कुंभकला


वाढत्या शहरीकरणामुळे हस्तकला व्यावसायिकांना टिकून राहता यावे म्हणून शहरी मागण्यांशी जुळवून घेणे व तसा पुरवठा करणे भाग पडले आहे. आपल्या राज्यात, खेड्यात आणि शहरातल्या कुंभारवाड्यात, अतिशय सामान्य प्रतीची मातीची भांडी तयार करणारे थोडे कुंभार आहेत. ‘नव्या’ कुंभाराचे काम अधिक उत्साहवर्धक आहे. त्यातले बहुतेक स्वतःला कलावंत समजतात. शासनाने या हस्तकलेचे संरक्षण आणि विकास व्हावा यासाठी भद्रावती येथे एक योजनाबद्ध उपक्रम सुरू केला आहे आणि हे इतर केंद्रासाठी एक उदाहरण ठरू शकेल अशी आशा आहे.

[next]

धातुकाम


सोने आणि चांदी यांचे अलंकार बनवण्याचे काम वाढलेले आहे. परंतु अलीकडच्या सर्जनशील दिसत नाही. चांदीचे अलंकार भागशः तयार केले जातात. एकच कारागीर एखादा अलंकार सुरूवातीपासून शेवटपर्यन्त घडवत नाही. मुख्य कारागीर- तो त्या केंद्राचा मालकही असतो- कनिष्ठ कारागीरांना भाग घडवण्यासाठी कामावर ठेवतो. ते भाग नंतर जुळवले जातात. त्यामुळे शिकाऊ उमेदवार ही कारागिरी संपूर्णतेने शिकू शकत नाही आणि स्वतंत्रपणे काम करू शकत नाही. कोल्हापूर आणि हूपरी येथील केंद्रामध्ये जुने आणि उत्तम घडणीचे घाट तयार होतात. परंतु कुशलता हळूहळू कमी होते आहे आणि धंदेवाइकांच्या हातांमध्ये ही घडवणूक जाते आहे. तांबे, जस्त कथिल, पितळ, कासे, तसेच इतर मिश्र धातूंपासून बनवलेल्या भांड्यामध्ये उत्तम कसब प्रत्ययाला येते. धातूच्या जबर किमतीचा खपावर, परिणाम झालेला असल्यामुळे नाशिकसारख्या धातुकामाच्या संदर्भात महत्त्वाच्या केंद्रात पुष्कळ कारागीरांना रिकामे बसून राहावे लागते. बेकारे असूनही बरेच मूर्ती आणि भांडी बनवणारे कारागीर पांढऱ्या धातूच्या ‘कलात्मक कामच्या’ व्यापाऱ्यांकडून येणाऱ्या मागण्या स्वीकारणार नाहीत. पिढ्यान पिढ्या कारागीर ‘उपयोग’च्या वस्तू बनवीत आले आहेत. कोणत्याही प्रकारचा संकोच न बाळगता एक साधे भांडे किंवा चमचा घडवण्यात ते तासन तास वेळ घालवू शकतात; परंतु ‘निरूपयोगी’ शोभेच्या वस्तू बनवण्याची कल्पना त्यांना देवाने निर्माण केलेल्या साधनांचा दुरूपयोग आहे असे वाटते.

[next]

छोटे हस्तकलाव्यवसाय

चर्मकला

छोटा हस्तकला व्यवसाय म्हणून उल्लेखिल्या जाणाऱ्या चर्मकलेने नगरात स्थित्यंतर केलेले असून अधिक काळ हा व्यवसाय छोटा राहणार नाही. कौशल्याने बनवल्या जाणाऱ्या कोल्हापुरी चपलांच्या मोठ्या प्रमाणातील निर्यातीने या गोष्टीला सुरूवात झालीच आहे. परंतु ज्यांचे उत्पादन नेहमीच सदोष असते अशा बनावट विक्रेत्यांमुळे या उद्योगाला विक्रीत झालेल्या घसरणीच्या तोंड द्यावे लागते आहे. तथापि, चर्मकलाकेद्रात कामाला असणारे कारागीर पोषाख आणि विविध प्रकारचे जोडे व बॅगा निर्माण करतात आणि त्यांना आंतरराष्ट्रीय मागणी असते.

[next]

छापलेले कापड


कापडावर छपाईकाम करणे ही महाराष्ट्राची पारंपरिक कला नव्हे. अलीकडच्या काळात काही छपाईकाम करणारी केंद्रे स्थापन झालेली आहेत आणि त्यांच्या उच्च दर्जाच्या निर्मितीमुळे वाखाणली गेली आहेत.

[next]

दगड आणि लाकडावरील कोरीव काम


‘लाकूड किंवा दगडाच्या ‘आतली’ प्रतिमा तिच्याभोवते अवकाश कोरीत प्रकट करणे’ हे सूत्र मानणारे जुने जाणते कलावंत आता राहिलेले नाहीत. कलेविषयीची ही श्रद्धा आता उरलेली नाही. जुन्या काळातल्या सर्वोत्कृष्ट कृती निर्माण करणारी, वातावरणाला प्रतिसाद देणारी संवेदनशीलताही. लाकडावर लाखेचे काम करणे ही एक कारागिरी आहे. अलीकडचे कारागीर लाखेचे ‘पट्‍टे’ तयार करतात. ही एक जुनी हस्तकल आहे. परंतु विक्री चांगली होईल अशा वस्तु बनवणारे कारागीर थोडेच आहेत.

[next]

औरंगाबादच्या हस्तकला


औरंगाबादच्या हस्तकलांचा एक वेगळा गट तयार होतो. आज ४ किंवा ५ कुटुंबे हिमरू विणतात आणि बिदरीकाम करतात. या हस्तकला दुसऱ्या केंद्राकडून औरंगाबादला आल्या त्या मुस्लिम संस्कृतीचा भाग म्हणून. रेशमी वस्त्र वापरण्याला बंदी घालणाऱ्या इस्लामी धर्माच्या आज्ञेनुसार हिमरू कापडा खास शोधून काढले गेले. तिथले राजे-शह-याच्यांसाठी हिमरू आणि बिदरीकाम निर्माण करण्यात आले.

आज निर्माण होणारे हिमरू ‘सैल’ विणलेले असते आणि त्यात पक्क्या रंगाचा धागा वापरला जात नाही. बिदरीकाम करणारादेखील चांदी हलक्या दर्जाची आणि कमी प्रमाणात वापरतो. हे किमती खाली आणण्यासाठी केले जाते हे उघड आहे. खपास योग्य अशी बाजारपेठ असेल तरच सुंदर आणि भारी किमतीच्या वस्तू बनवण्याचे धाडस कारागीर करील.

औरंगाबादेत पैलू पाडणाऱ्यां कडून मणी तयार करून घेणारा व्यापाऱ्यांचा एक गट आहे याचा उल्लेख इथे केला पाहिजे. ही हस्तकला बदलत्या अभिरूचीनुसार लवकरच नष्ट होईल असे वाटते.

‘महाराष्ट्रात हस्तकला उरलेल्या नाहीत’ हे वारंवार गिरवले जाणारे विधान खरे नाही. मात्र या हस्तकलांची आजक्या तांत्रिक प्रगतीच्या काळात, जाणीवपूर्वक जोपासना झाली नाही तर ते विधान वस्तुस्थितीत उतरेल यात शंका नाही.

- रोशन कालापेसी


संपादक मंडळ | Editors
संपादक मंडळ, मराठीमाती डॉट कॉम
मराठीमाती डॉट कॉम वरिल विविध विभागांत लेखन आणि संपादन.

अभिप्राय

ब्लॉगर


  सामायिक करा


तुमच्यासाठी सुचवलेले संबंधित लेखन

नाव

अंधश्रद्धेच्या कविता,5,अजय दिवटे,1,अजित पाटणकर,18,अनिकेत शिंदे,1,अनिल गोसावी,2,अनुभव कथन,9,अनुराधा फाटक,39,अपर्णा तांबे,7,अब्राहम लिंकन,2,अभंग,2,अभिव्यक्ती,845,अमन मुंजेकर,6,अमित पडळकर,4,अमित पवार,1,अमित बाविस्कर,3,अमुक-धमुक,1,अमोल देशमुख,1,अमोल वाघमारे,1,अमोल सराफ,2,अर्थनीति,2,अलका खोले,1,अश्विनी तातेकर-देशपांडे,1,अक्षय वाटवे,1,अक्षरमंच,617,आईच्या कविता,17,आईस्क्रीम,3,आकाश पवार,1,आकाश भुरसे,8,आज,8,आजीच्या कविता,1,आठवणींच्या कविता,11,आतले-बाहेरचे,1,आत्मविश्वासाच्या कविता,9,आनंद दांदळे,8,आनंदाच्या कविता,20,आभिजीत टिळक,2,आमट्या सार कढी,14,आरती गांगन,2,आरती शिंदे,4,आरत्या,80,आरोग्य,4,आशिष खरात-पाटील,1,इंद्रजित नाझरे,20,इसापनीती कथा,44,उदय दुदवडकर,1,उन्मेष इनामदार,1,उपवासाचे पदार्थ,13,उमेश कुंभार,12,ऋग्वेदा विश्वासराव,2,ऋचा पिंपळसकर,10,ऋचा मुळे,16,ऋषिकेश शिरनाथ,2,एप्रिल,30,एहतेशाम देशमुख,2,ऑक्टोबर,31,ऑगस्ट,31,ओंकार चिटणीस,1,कपिल घोलप,11,करमणूक,43,कर्क मुलांची नावे,1,कविता शिंगोटे,1,कवितासंग्रह,4,कार्यक्रम,9,कालिंदी कवी,2,किल्ले,92,किल्ल्यांचे फोटो,5,किशोर चलाख,6,कुठेतरी-काहीतरी,2,कुसुमाग्रज,1,कृष्णाच्या आरत्या,5,केदार कुबडे,41,केदार नामदास,1,केदार मेहेंदळे,1,कोशिंबीर सलाड रायते,11,कौशल इनामदार,1,खरगपूर,1,गणपतीच्या आरत्या,5,गणेश तरतरे,10,गणेश पाटील,1,गण्याचे विनोद,1,गावाकडच्या कविता,7,गुरूच्या आरत्या,2,गुलझार काझी,1,गोड पदार्थ,37,घरचा वैद्य,2,घाट,1,चटण्या,1,चातुर्य कथा,6,चित्रपट समीक्षा,1,चैतन्य म्हस्के,1,जानेवारी,31,जिल्हे,1,जीवनशैली,262,जुलै,31,जून,30,ज्योती मालुसरे,1,टीझर्स,1,ट्रेलर्स,3,डिसेंबर,31,तरुणाईच्या कविता,2,तिच्या कविता,32,तुकाराम गाथा,4,तेजस्विनी देसाई,1,दत्ताच्या आरत्या,5,दर्शन जोशी,2,दादासाहेब गवते,1,दिनदर्शिका,372,दिनविशेष,366,दिनेश बोकडे,1,दिनेश हंचाटे,1,दिपक शिंदे,2,दिवाळी फराळ,9,दुःखाच्या कविता,59,देवीच्या आरत्या,3,देशभक्तीपर कविता,2,धोंडोपंत मानवतकर,9,निखिल पवार,1,निमित्त,2,निराकाराच्या कविता,6,निवडक,1,निसर्ग कविता,15,नोव्हेंबर,30,न्याहारी,37,पंचांग,6,पथ्यकर पदार्थ,2,पराग काळुखे,1,पल्लवी माने,1,पांडुरंग वाघमोडे,3,पाककला,204,पालकत्व,2,पावसाच्या कविता,18,पी के देवी,1,पुडिंग,10,पुणे,9,पोस्टर्स,5,पोळी भाकरी,11,पौष्टिक पदार्थ,14,प्रतिक बळी,1,प्रतिभा जोजारे,1,प्रतिक्षा जोशी,1,प्रभाकर लोंढे,3,प्रवास वर्णन,1,प्रवासाच्या कविता,10,प्रविण पावडे,5,प्रसन्न घैसास,2,प्रज्ञा वझे-घारपुरे,5,प्राजक्ता गव्हाणे,1,प्रिया जोशी,1,प्रियांका न्यायाधीश,3,प्रेम कविता,71,प्रेरणादायी कविता,14,फेब्रुवारी,29,फोटो गॅलरी,11,बा भ बोरकर,1,बातम्या,6,बाबाच्या कविता,1,बायकोच्या कविता,3,बालकविता,8,बालकवी,1,बाळाची मराठी नावे,1,बाळासाहेब गवाणी-पाटील,1,बिपीनचंद्र नेवे,1,बेकिंग,9,भक्ती कविता,8,भाज्या,21,भाताचे प्रकार,11,भूमी जोशी,1,मंगळागौरीच्या आरत्या,2,मंजुषा कुलकर्णी,2,मंदिरांचे फोटो,2,मंदिरे,1,मधल्या वेळेचे पदार्थ,33,मनाचे श्लोक,205,मनिषा दिवेकर,3,मराठी कथा,87,मराठी कविता,477,मराठी गझल,17,मराठी गाणी,2,मराठी गोष्टी,1,मराठी चारोळी,1,मराठी चित्रपट,12,मराठी टिव्ही,27,मराठी नाटक,1,मराठी पुस्तके,4,मराठी प्रेम कथा,16,मराठी भयकथा,41,मराठी रहस्य कथा,2,मराठी लेख,25,मराठी विनोद,1,मराठी साहित्य,10,मराठी साहित्यिक,1,मराठी सुविचार,2,मराठीमाती,379,मसाले,12,महाराष्ट्र,270,महाराष्ट्र फोटो,9,महाराष्ट्राचा इतिहास,32,महाराष्ट्रीय पदार्थ,18,महालक्ष्मीच्या आरत्या,2,महेश बिऱ्हाडे,1,मांसाहारी पदार्थ,17,माझं मत,1,माझा बालमित्र,53,मातीतले कोहिनूर,13,मारुतीच्या आरत्या,2,मार्च,31,मुंबई,8,मुकुंद शिंत्रे,35,मुक्ता चैतन्य,1,मुलांची नावे,1,मुलाखती,1,मे,31,मैत्रीच्या कविता,5,यशपाल कांबळे,2,यशवंत दंडगव्हाळ,17,यादव सिंगनजुडे,2,योगा,1,योगेश कर्डिले,3,रजनी जोगळेकर,4,राजकीय कविता,6,राजकुमार शिंगे,1,रामचंद्राच्या आरत्या,5,राहुल अहिरे,3,रेश्मा विशे,1,रोहित काळे,7,रोहित साठे,14,लता मंगेशकर,1,लक्ष्मण अहिरे,2,लिलेश्वर खैरनार,2,लोणची,8,वासुदेव कामथ,1,वाळवणाचे पदार्थ,6,विचारधन,211,विठ्ठलाच्या आरत्या,5,विद्या कुडवे,4,विद्या जगताप,2,विनायक मुळम,1,विरह कविता,44,विराज काटदरे,1,विलास डोईफोडे,3,विवेक जोशी,2,विशेष,4,विष्णूच्या आरत्या,4,विज्ञान तंत्रज्ञान,2,वृषाली काकडे,1,वेदांत कोकड,1,वैभव सकुंडे,1,वैशाली झोपे,1,व्यंगचित्रे,13,व्हिडिओ,20,शंकराच्या आरत्या,4,शशांक रांगणेकर,1,शांततेच्या कविता,5,शारदा सावंत,4,शाळेच्या कविता,10,शितल सरोदे,1,शिक्षकांवर कविता,2,शुभम बंबाळ,2,शुभम सुपने,2,शेतकर्‍याच्या कविता,8,श्याम खांबेकर,1,श्रद्धा नामजोशी,9,श्रावणातल्या कहाण्या,27,श्रीनिवास खळे,1,श्रीरंग गोरे,1,संगीता अहिरे,1,संघर्षाच्या कविता,20,संजय पाटील,1,संजय बनसोडे,2,संजय शिवरकर,5,संजय सावंत,1,संत एकनाथ,1,संत तुकाराम,7,संत नामदेव,2,संत ज्ञानेश्वर,4,संतोष झोंड,1,संतोष सेलुकर,30,संदिप खुरुद,1,संदेश ढगे,37,संपादकीय,18,संपादकीय व्यंगचित्रे,12,संस्कार,1,संस्कृती,125,सचिन पोटे,8,सचिन माळी,1,सण-उत्सव,16,सणासुदीचे पदार्थ,32,सतिश चौधरी,1,सदाशिव गायकवाड,2,सनी आडेकर,10,सप्टेंबर,30,समर्थ रामदास,206,सरबते शीतपेये,8,सागर बनगर,1,सागर बाबानगर,1,सामाजिक कविता,87,सायली कुलकर्णी,3,साहित्य सेतू,1,साक्षी खडकीकर,9,सिमा लिंगायत-कुलकर्णी,1,सुदेश इंगळे,3,सुनील गाडगीळ,1,सुभाष कटकदौंड,2,सुमती इनामदार,1,सुरेश भट,1,सुशीला मराठे,1,सैनिकांच्या कविता,2,सैरसपाटा,97,सोमकांत दडमल,1,स्तोत्रे,1,स्फूर्ती गीत,1,स्वप्नाली अभंग,3,स्वाती खंदारे,204,स्वाती दळवी,6,स्वाती नामजोशी,31,स्वाती वक्ते,2,ह मुलांची नावे,1,हमार्टिक समा,1,हरितालिकेच्या आरत्या,1,हर्षद खंदारे,38,हर्षदा जोशी,3,हर्षाली कर्वे,2,हसनैन आकिब,3,हेमा चिटगोपकर,8,होळी,5,harshad-khandare,1,swati-khandare,1,
ltr
item
मराठीमाती | माझ्या मातीचे गायन: कारागिरी - महाराष्ट्र
कारागिरी - महाराष्ट्र
कारागिरी, महाराष्ट्र - [Karagiri, Maharashtra] हस्तकलापरंपरा झपाट्याने नाहीशा होत चालल्यामुळे, देशाचा समृद्ध सांस्कृतिक वारसाही उणावत चालला आहे
https://4.bp.blogspot.com/-F-T3P6bjblw/XSbOgWHwxSI/AAAAAAAADnE/MhthcfomRa4jFm-8w1UAYKktAq4vkwlZQCLcBGAs/s1600/kashidakari-by-banjara-community.jpg
https://4.bp.blogspot.com/-F-T3P6bjblw/XSbOgWHwxSI/AAAAAAAADnE/MhthcfomRa4jFm-8w1UAYKktAq4vkwlZQCLcBGAs/s72-c/kashidakari-by-banjara-community.jpg
मराठीमाती | माझ्या मातीचे गायन
https://www.marathimati.com/2008/04/karagiri-maharashtra.html
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/2008/04/karagiri-maharashtra.html
true
2079427118266147504
UTF-8
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ minutes ago १ तासापूर्वी $$1$$ hours ago काल $$1$$ days ago $$1$$ weeks ago ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची