१२ जून दिनविशेष

१२ जून दिनविशेष - इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक १२ जून चे दिनविशेष.
१२ जून दिनविशेष | 12 June in History

दिनांक १२ जून च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस


पु. ल. देशपांडे - (८ नोव्हेंबर १९१९ - १२ जून २०००) पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे म्हणजेच पु. ल. देशपांडे उर्फ भाई ऊर्फ पुल हे लोकप्रिय मराठी लेखक, नाटककार, नट, कथाकार व पटकथाकार, दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक होते. त्यांना महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असे म्हटले जाते. त्यांच्या आद्याक्षरांवरून महाराष्ट्रात ते प्रेमाने पु. ल. म्हणून ओळखले जातात.

शेवटचा बदल १२ जून २०२१

जागतिक दिवस
१२ जून रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस

 • -

ठळक घटना / घडामोडी
१२ जून रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी

 • १४१८: पॅरिसमध्ये उठाव, बरगंडीने शहर काबीज केले.
 • १७७५: इंग्लंडने अमेरिकेच्या मॅसेच्युसेट्स राज्यातील बंड मोडून काढण्यासाठी लश्करी कायदा लागू केला.
 • १८६४: अमेरिकन यादवी युद्ध - कोल्ड हार्बरची लढाई.
 • १८८९: उत्तर आयर्लंडच्या आर्माघ गावाजवळ रेल्वे अपघात. ८८ ठार.
 • १८९६: जे. टी. हर्न प्रथम दर्जाच्या क्रिकेट सामन्यात १०० बळी घेणारे पहिले खेळाडू झाले.
 • १८९८: फिलिपाइन्सने स्पेनपासुन स्वतंत्र असल्याचे घोषित केले.
 • १९०५: गोपाळकृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची (Servants of India Society) स्थापना केली.
 • १९१३:जॉन ब्रे’ या अमेरिकन माणसाची जगातील पहिली कार्टून फिल्म.
 • १९३५: बॉलिव्हिया व पेराग्वेमधील चाको युद्ध समाप्त.
 • १९६४: वर्णद्वेषाविरोधात लढणारे नेते ‘नेल्सन मंडेला’ यांना आजन्म जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
 • १९७५: अलाहाबाद न्यायालयाने इंदिरा गांधींची निवडणूक रद्द ठरवली त्यांना ६ वर्षे निवडणूक लढविण्यास बंदी केली.
 • १९९३: पृथ्वीक्षेपणास्त्राची ११ वी चाचणी यशस्वी.
 • १९९६: भारतीय पंतप्रधान एच.डी.देवेगौडा यांच्या संयुक्त आघाडी सरकारने लोकसभेत बहुमत सिद्ध केले.
 • २००१: कोनेरु हंपी ही बुद्धीबळातील वूमन ग्रॅंडमास्टर बनली. हा पराक्रम करणारी ती भारताची सर्वात कमी वयाची व एकुणात दुसरी खेळाडू आहे.

जन्म / वाढदिवस / जयंती
१२ जून रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १८९४: पुरुषोत्तम विश्वनाथ बापट (पाली भाषा कोविद; बौद्ध धर्म ग्रंथांचे भाषांतरकार आणि संपादक, मृत्यू: ४ नोव्हेंबर १९९१).
 • १९१७: भालचंद्र दत्तात्रय खेर (लेखक व पत्रकार, मृत्यू: २१ जून २०१२).
 • १९२२: मार्गेरिटा हॅक (इटालियन खगोलशास्त्रज्ञ आणि लोकप्रिय विज्ञान लेखिका, मृत्यू: २९ जून २०१३).
 • १९२४: जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश (अमेरिकेचे ४१वे राष्ट्राध्यक्ष).
 • १९२९: अ‍ॅन फ्रँक (ज्यूंच्या शिरकाणात बळी गेलेली एक ज्यूधर्मीय मुलगी, मृत्यू: मार्च १९४५).
 • १९५७: जावेद मियाँदाद (पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू प्रशिक्षक)
 • १९८५: ब्लेक रॉस (मोझीला फायरफॉक्स चे सहसंस्थापक).

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
१२ जून रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १९६४: कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी (मराठी भाषेचे गाढे अभ्यासक, जन्म: ५ जानेवारी १८९२).
 • १९७५: दुर्गाप्रसाद धर (स्वातंत्र्योत्तर काळातील एक मुत्सद्दी व उपाध्यक्ष-नियोजन आयोग, जन्म: १४ एप्रिल १९१८).
 • १९७८: गुओ मोरुओ (चिनी भाषेमधील कवी, लेखक, इतिहासकार, जन्म: १६ नोव्हेंबर १८९२).
 • १९८१: प्र. बा. गजेंद्रगडकर (भारताचे ७ वे सरन्यायाधीश, जन्म: १६ मार्च १९०१).
 • १९८३: नॉर्मा शिअरर (कॅनेडियन - अमेरिकन अभिनेत्री, जन्म: १० ऑगस्ट १९०२).
 • २०००: पु. ल. देशपांडे (लेखक, कवी, नाटककार, अभिनेते (चित्रपट, रंगभूमी), दिग्दर्शक, निर्माते, संगीतकार, जन्म: ८ नोव्हेंबर १९१९).
 • २००१: शकुंतला बोरगावकर (विनोदी लेखिका, जन्म: ५ जानेवारी १८९२).
 • २००३: ग्रेगरी पेक (हॉलीवूड अभिनेते, जन्म: ५ एप्रिल १९१६).
 • २०१५: नेकचंद सैनी (भारतीय मूर्तिकार, जन्म: १५ डिसेंबर १९२४).
 • २०२०: पारसनाथ यादव (भारतीय राजकारणी आणि उत्तर प्रदेशच्या विधानसभेत ७ वेळा आमदार, जन्म: १२ जानेवारी १९४९) .
 • २०२०: आनंद मोहन झुत्शी गुलजार देहलावी (उर्दू कवी, अभ्यासक आणि पत्रकार, जन्म: ७ जुलै १९२६).


संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा

जून महिन्यातील दिनविशेष

नवी नोंद सुचवा · चूक कळवा · संदर्भांची यादी · अस्वीकरण

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.