६ जून दिनविशेष - इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक ६ जून चे दिनविशेष.
दिनांक ६ जून च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक - (६ जून १६७४) तीन मण सोन्याचे म्हणजेच ५६ हजार किंमतीचे छत्र देवीला अर्पण करून. रायगडावरील राजसभेत दिनांक ६ जून १६७४ ज्येष्ठ शुद्ध १३ शके १५९६ शनिवार या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक संपन्न झाला..
शेवटचा बदल ५ जून २०२१
जागतिक दिवस
६ जून रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
- राष्ट्र दिन: स्वीडन.
- क्वीन्सलॅंड दिन: ऑस्ट्रेलिया.
ठळक घटना / घडामोडी
६ जून रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी
- १६५४: स्वीडनची प्रोटेस्टंट राणी क्रिस्टीनाने कॅथोलिक पंथ स्वीकारला व राज्य सोडून दिले. तिच्यानंतर तिचा चुलतभाउ चार्ल्स दहावा राजा झाला.
- १६७४: रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला.
- १७५२: मॉस्कोत प्रचंड आग. १८,००० घरे आगीत नष्ट.
- १८०९: स्वीडनने नवीन संविधान अंगिकारले.
- १८१३: १८१२चे युद्ध - स्टोनी क्रीकची लढाई - जॉन व्हिन्सेन्टच्या नेतृत्त्वाखाली ७०० ब्रिटीश सैनिकांनी २,००० अमेरिकन सैनिकांचा पराभव केला.
- १८३३: रेल्वेमधून प्रवास करणारे अँड्र्यू जॅक्सन हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले.
- १८४४: लंडनमध्ये यंग मेन्स क्रिस्चियन असोसिएशन (वाय.एम.सी.ए.)ची स्थापना.
- १८८२: मुंबईत चक्रीवादळ. १,००,०००हून अधिक ठार.
- १९१२: अलास्कातील नोव्हारुप्टा ज्वालामुखीचा उद्रेक.
- १९२५: वॉल्टर पर्सी क्राइस्लरने क्राइस्लर कॉर्पोरेशनची स्थापना केली.
- १९३०: गोखले इन्स्टिट्युट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सची स्थापना.
- १९३३: अमेरिकेत कॅम्डेन, न्यू जर्सी येथे प्रथम ड्राइव्ह इन थियेटर सुरू.
- १९३४: अमेरिकेत रोखे व बाजार समिती(एस.ई.सी.)ची स्थापना.
- १९४४: दुसरे महायुद्ध - डी डे - ऑपरेशन ऑव्हरलॉर्ड या सांकेतिक नावाने ओळखले जाणारी मोहिम सुरू. १,५५,००० दोस्त राष्ट्रांचे सैनिक नॉर्मंडी येथे समुद्रकिनार्यावरून फ्रांसमध्ये घुसले.
- १९६६: श्यामवर्णीय नागरिकांच्या नागरी हक्कांसाठी मिसिसिपीत पदयात्रा करणार्या जेम्स मेरेडिथची हत्या.
- १९६९: वि. स. पागे समितीची शिफारस, रोजगार हमी योजनेस सुरुवात.
- १९७०: सी. हेेंकेल या ब्रिटिश शास्त्रज्ञाने सर्वप्रथम घरगुती वापरासाठीचा डिटर्जंट साबण विक्रीस उपलब्ध केला.
- १९७१: सोवियेत संघाने सोयुझ ११चे प्रक्षेपण केले.
- १९७१: दुआर्ते, कॅलिफोर्निया गावाजवळ ह्यूज एरवेस्टचे डी.सी.९ व अमेरिकच्या सैन्याचे एफ.४ प्रकारच्या विमानांमध्ये हवेत टक्कर. ५० ठार.
- १९७४: स्वीडनने संसदीय राजेशाही स्वीकारली.
- १९८१: भारताच्या बिहार राज्यात सहार्सा शहराजवळ मध्ये बागमती नदीवरील पुलावर रेल्वे गाडी घसरली. अधिकृत २६८ ठार, ३०० गायब. अनधिकृत आकडा - १,००० ठार.
- १९८२: इस्रायेलने लेबेनॉनवर आक्रमण केले.
- १९८४: ऑपरेशन ब्ल्यु स्टार समाप्त. ५७६ ठार, ३३५ जखमी.
- १९९३: मोंगोलियात सर्वप्रथम राष्ट्राध्यक्षीय निवडणुका.
- २००४: भारताच्या राष्ट्रपतींनी तमिळ शास्त्रीय भाषा म्हणून धोषित केली.
जन्म / वाढदिवस / जयंती
६ जून रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- १८५०: कार्ल ब्राऊन (नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ) (मृत्यू: २० एप्रिल १९१८).
- १८९१: मस्ती वेंकटेश अय्यंगार (कन्नड कवी, कथाकार आणि कादंबरीकार) (मृत्यू: ६ जून १९८६).
- १९०१: अचमद सुकर्णो (इंडोनेशियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष) (मृत्यू: २१ जुन १९७०).
- १९०३: बख्त सिंग (भारतीय धर्मगुरू) (मृत्यू: १७ सप्टेंबर २०००).
- १९०९: गणेश रंगो भिडे (अभिनव मराठी ज्ञानकोशकार) (मृत्यू: १७ सप्टेंबर २०००).
- १९१९: राजेंद्र कृष्ण (गीतकार, कवी आणि पटकथालेखक) (मृत्यू: २३ सप्टेंबर १९८७).
- १९२९: सुनील दत्त (भारतीय अभिनेते) (मृत्यू: २५ मे २००५).
- १९३६: डी. रामनाडू (भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते) (मृत्यू: १८ फेब्रुवारी २०१५).
- १९४०: कुमार भट्टाचार्य, बैरन भट्टाचार्य (भारतीय-इंग्लिश अभियंता आणि शिक्षक).
- १९५५: सुरेश भारद्वाज (भारतीय रंगमंच, दिग्दर्शक आणि रंगमंच शिक्षक).
- १९५६: ब्यॉन बोर्ग (स्वीडिश लॉनटेनिस खेळाडू).
- १९७०: सुनील जोशी (भारतीय क्रिकेटपटू).
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
६ जून रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- १८६१: कॅमिलो बेन्सो (इटलीचे पहिले पंतप्रधान) (जन्म: १० ऑगस्ट १८१०).
- १८९१: सर जॉन ए. मॅकडोनाल्ड (कॅनडाचे पंतप्रधान) (जन्म: ११ जानेवारी १८१५).
- १९४१: लुईस शेवरोले (शेवरोलेट आणि फ्रंटनॅक मोटर कॉर्पोरेशनचे स्थापक) (जन्म: २५ डिसेंबर १८७८).
- १९५७: संत रामचंद्र दत्तात्रय तथा गुरूदेव रानडे (आधुनिक विद्याविभूषित तत्त्वज्ञ) (जन्म: ३ जुलै १८८६).
- १९६१: कार्ल गुस्टाफ युंग ( स्वित्झरलॅंडचे मानसशास्त्रज्ञ) (जन्म: २६ जुलै १८७५).
- १९७६: जे. पॉल गेटी (अमेरिकन उद्योगपती) (जन्म: १५ डिसेंबर १८९२).
- २००२: शांता शेळके (मराठी कवयित्री) (जन्म: १२ ऑक्टोबर १९२२).
६ जून दिनविशेष संबंधी महत्त्वाचे दुवे:
जून महिन्यातील दिनविशेष | ||||||
---|---|---|---|---|---|---|
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ |
८ | ९ | १० | ११ | १२ | १३ | १४ |
१५ | १६ | १७ | १८ | १९ | २० | २१ |
२२ | २३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ |
२९ | ३० | |||||
तारखेप्रमाणे जून महिन्यातील सर्व दिनविशेष पहा. |
आज
सर्व विभाग / सेवा सुविधा / मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / जून महिन्यातील दिनविशेष
विभाग -
जानेवारी दिनविशेष · फेब्रुवारी दिनविशेष · मार्च दिनविशेष · एप्रिल दिनविशेष · मे दिनविशेष · जून दिनविशेष · जुलै दिनविशेष · ऑगस्ट दिनविशेष · सप्टेंबर दिनविशेष · ऑक्टोबर दिनविशेष · नोव्हेंबर दिनविशेष · डिसेंबर दिनविशेष
विषय -
जानेवारी · फेब्रुवारी · मार्च · एप्रिल · मे · जून · जुलै · ऑगस्ट · सप्टेंबर · ऑक्टोबर · नोव्हेंबर · डिसेंबर
अभिप्राय