१७ जून दिनविशेष - इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक १७ जून चे दिनविशेष.
दिनांक १७ जून च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस
TEXT - TEXT.
शेवटचा बदल १७ जून २०२१
जागतिक दिवस
१७ जून रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
- -
ठळक घटना / घडामोडी
१७ जून रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी
- १५७९: सर फ्रांसिस ड्रेकने नोव्हा आल्बियोन (सध्याचे कॅलिफोर्निया) इंग्लंडचा भाग असल्याचे जाहीर केले.
- १६३१: आग्रा येथील ‘ताजमहाल’ ही जगविख्यात वास्तू ज्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ बांधण्यात आली त्या मुमताज महल / अर्जुमंद बानू बेगम (मुघल बादशाह शाहजहान यांच्या पत्नी) यांचा १४व्या बाळंतपणादरम्यान मृत्यू झाला.
- १७७५: अमेरिकन क्रांती - बंकर हिलची लढाई.
- १८३९: हवाईचा राजा कामेहामेहा तिसर्याने रोमन कॅथोलिक लोकांना धर्मस्वातंत्र्य दिले.
- १८८५: स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा न्यू यॉर्क येथे पोचला.
- १९३३: कुख्यात दरोडेखोर फ्रॅंक नॅशच्या साथीदारांनी त्याला सोडवण्यासाठी कॅन्सस सिटी, मिसूरीच्या रेल्वे स्थानकावर अंदाधुंद गोळीबार केला. चार एफ.बी.आय. अधिकारी व स्वतः नॅश ठार.
- १९४०: दुसरे महायुद्ध-ऑपरेशन एरियेल - दोस्त सैन्यांनी फ्रांसमधून माघार घेण्यास सुरुवात केली.
- १९४०: दुसरे महायुद्ध-एस्टोनिया, लात्व्हिया व लिथुएनिया सोवियेत संघाच्या आधिपत्याखाली.
- १९४४: आइसलॅंड प्रजासत्ताक झाले.
- १९५३: पूर्व जर्मनीत दंगेखोर कामगारांना दडपण्यासाठी सोवियेत संघाने सैन्य पाठवले.
- १९६३: अमेरिकेचे सर्वोच्च न्यायालयाने सार्वजनिक शाळांतून बायबलचे पठण करणे कायदेबाह्य ठरवले.
- १९७२: वॉटरगेट कुभांड - डेमोक्रॅटिक पक्षाचे कार्यालय फोडून कागदपत्रे पळवल्याबद्दल रिचर्ड निक्सनच्या चार साथीदारांना अटक.
- १९९१: दक्षिण आफ्रिकेत बाळाचा जन्म झाल्यावर त्याचा वंशाची नोंदणी करणे बंद केले.
- १९९१: भारताचे माजी पंतप्रधान ‘राजीव गांधी’ यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर.
- १९९४: आपली पत्नी निकोल ब्राउन सिम्पसन व तिचा मित्र रोनाल्ड गोल्डमनचा खून केल्याबद्दल ओ.जे. सिम्पसनला अटक.
- २०१३: भारताच्या उत्तराखंड राज्यात ढगफुटी होऊन एका दिवसात ३४० मिमी (१३ इंच पाउस) पडला. शेकडो व्यक्ती मृत्युमुखी, हजारो यात्रेकरी अडकले (व्हिडिओ).
जन्म / वाढदिवस / जयंती
१७ जून रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- १२३९: एडवर्ड (पहिला) (इंग्लंडचा राजा, मृत्यू: ७ जुलै १३०७).
- १७०४: जॉन के (फ्लाइंग शटल चे शोधक, मृत्यू: ? १७७९).
- १८६७: जॉन रॉबर्ट ग्रेग (लघुलेखन पद्धतीचा शोधक, मृत्यू: २३ फेब्रुवारी १९४८).
- १८९८: कार्ल हेर्मान (जर्मन भौतिकशास्त्रज्ञ, मृत्यू: १२ सप्टेंबर १९६१).
- १९०३: बाबूराव विजापुरे (संगीतशिक्षक, मृत्यू: ७ डिसेंबर १९८२).
- १९०३: रूथ ग्रेव्स वेकफिल्ड (चॉकोलेट चिप कुकी चे निर्माते, मृत्यू: १० जानेवारी १९७७)
- १९२०: फ्रांस्वा जेकब (नोबेल पारितोषिक विजेता फ्रेंच जीवशास्त्रज्ञ, मृत्यू: १९ एप्रिल २०१३).
- १९७३: लिएंडर पेस (भारतीय टेनिसपटू).
- १९८१: शेन वॉटसन (ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू).
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
१७ जून रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- १२९७: श्री निवृत्तीनाथ महाराज (ज्येष्ठ गुरु संत, जन्म: २९ जानेवारी १२७४)
- १६३१: मुमताज महल (मुघल बादशाह शाहजहान यांच्या पत्नी, जन्म: २७ एप्रिल १५९३)
- १६७४: जिजाबाई शहाजी भोसले (छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री, जन्म: १२ जानेवारी १५९८).
- १८९३: जनरल लॉर्ड विल्यम बेंटिंक (भारताचे १४ वे राज्यपाल, जन्म: १४ सप्टेंबर १७७४)
- १८९५: गोपाल गणेश आगरकर (थोर समाजसुधारक, जन्म: १४ जुलै १८५६).
- १९२८: गोपबंधूदास तथा उत्कलमणी (ओरिसातील समाजसुधारक, जन्म: ९ ऑक्टोबर १८७७).
- १९६५: मोतीलाल राजवंश ऊर्फ मोतीलाल (भारतीय अभिनेते, जन्म: ४ डिसेंबर १९१०).
- १९८३: शरद पिळगावकर (चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, जन्म: ?).
- १९९६: बाळासाहेब देवरस (राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरसंघचालक, जन्म: ११ डिसेंबर १९१५).
- २००४: इंदुमती पारीख (सामाजिक कार्यकर्त्या, जन्म: ८ मार्च १९१८).
१७ जून दिनविशेष संबंधी महत्त्वाचे दुवे:
जून महिन्यातील दिनविशेष | ||||||
---|---|---|---|---|---|---|
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ |
८ | ९ | १० | ११ | १२ | १३ | १४ |
१५ | १६ | १७ | १८ | १९ | २० | २१ |
२२ | २३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ |
२९ | ३० | |||||
तारखेप्रमाणे जून महिन्यातील सर्व दिनविशेष पहा. |
आज
सर्व विभाग / सेवा सुविधा / मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / जून महिन्यातील दिनविशेष
विभाग -
जानेवारी दिनविशेष · फेब्रुवारी दिनविशेष · मार्च दिनविशेष · एप्रिल दिनविशेष · मे दिनविशेष · जून दिनविशेष · जुलै दिनविशेष · ऑगस्ट दिनविशेष · सप्टेंबर दिनविशेष · ऑक्टोबर दिनविशेष · नोव्हेंबर दिनविशेष · डिसेंबर दिनविशेष
विषय -
जानेवारी · फेब्रुवारी · मार्च · एप्रिल · मे · जून · जुलै · ऑगस्ट · सप्टेंबर · ऑक्टोबर · नोव्हेंबर · डिसेंबर
अभिप्राय