७ जून दिनविशेष - इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक ७ जून चे दिनविशेष.
दिनांक ७ जून च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस
TEXT - TEXT.
शेवटचा बदल २२ मे २०२१
जागतिक दिवस
७ जून रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
- सेते ग्युन्यो: माल्टा.
ठळक घटना / घडामोडी
७ जून रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी
- १०९९: पहिली क्रुसेड - जेरुसलेमचा वेढा सुरू.
- १६९२: वेस्ट ईंडीझमधील पोर्ट रॉयल, जमैका येथे तीव्र भूकंप. अवघ्या ३ मिनिटांत १,६०० ठार, ३,००० जखमी.
- १८३२: कॅनडात आलेल्या आयरिश नागरिकांच्या द्वारे कॉलेराचा प्रादुर्भाव सुरू झाला. ६,००० मृत्यूमुखी.
- १८६२: अमेरिका व युनायटेड किंग्डमने गुलामांच्या व्यापार बंद करण्याचा निर्णय घेतला.
- १८६३: फ्रेंच सैन्याने मेक्सिको सिटी जिंकले.
- १८६६: आयरिश वंशाच्या १,८०० लुटारूंनी कॅनडात धुमाकुळ घातला. यानंतर केनेडियन सैन्याने त्यांना परत अमेरिकेत पळवून लावले.
- १८९३: महात्मा गांधीं यांनी सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली.
- १९०५: नॉर्वेने स्वीडनशी असलेला संघराज्याचा करार विसर्जित केला.
- १९३८: डी.सी.४ प्रकारच्या विमानाचे प्रथम उड्डाण.
- १९४०: नॉर्वेचा राजा हाकोन सातव्याने देशातून पळ काढला.
- १९४५: नॉर्वेचा राजा हाकोन सातवा देशात परतला.
- १९४८: चेकोस्लोव्हेकियात राष्ट्राध्यक्ष एडव्हार्ड बेनेसने कम्युनिस्ट दबावाखाली राजीनामा दिला.
- १९६५: अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने परिणित दांपत्याने गर्भनिरोधक साधने वापरणे कायदेशीर ठरवले.
- १९७५: क्रिकेटच्या पहिल्या विश्वकरंडक स्पर्धेस इंग्लंडमध्येे सुरुवात झाली.
- १९७९: रशियातील कापुस्तिनयार येथून भास्कर-१ उपग्रहाचे प्रक्षेपण.
- १९८१: इस्रायेलने इराकची ओसिराक परमाणु भट्टी नष्ट केली.
- १९८५: विम्बल्डन पुरुष एकेरीचे विजेतेपद १७ व्या वर्षी मिळवणारा बोरिस बेकर हा सर्वात तरुण खेळाडू बनला.
- १९८९: सुरिनामची राजधानी पारामारिबो येथे डी.सी.८ प्रकारचे विमान कोसळले. १६८ ठार.
- १९९१: फिलिपाईन्समधल्या माउंट पिनाटुबो ज्वालामुखीचा उद्रेक.
- १९९४: आंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या (IMF) उपव्यवस्थापकीय संचालकपदी अर्थतज्ज्ञ प्रभाकर नार्वेकर या प्रथमच एका भारतीयाची नियुक्ती झाली.
- २००१: युनायटेड किंग्डम मधील निवडणुकांत टोनी ब्लेरच्या नेतृत्वाखाली लेबर पार्टीला मोठे बहुमत.
- २००४: शिरोमणी अकाली दल (लॉॅंगोवाल) या राजकीय पक्षाची स्थापना.
- २००६: अल कायदाचा इराकमधील म्होरक्या अबू मुसाब अल झरकावी हा अमेरिकन हवाईदलाने केलेल्या बॉम्बहल्ल्यात ठार झाला.
जन्म / वाढदिवस / जयंती
७ जून रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- १८३७: अॅलॉइस हिटलर (अॅडॉल्फ हिटलर यांचे वडील, मृत्यू: ३ जानेवारी १९०३).
- १९१३: मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष (लेखक टीकाकार, मृत्यू: १९ एप्रिल २०१०).
- १९१४: ख्वाजा अहमद तथा के. ए. अब्बास (दिग्दर्शक, पटकथाकार, लेखक व पत्रकार, मृत्यू: १ जुन १९८७).
- १९१७: डीन मार्टिन (अमेरिकन गायक, संगीतकार निर्माते, मृत्यू: २५ डिसेंबर १९९५).
- १९४२: मुअम्मर गडाफी (लिबियाचा हुकूमशहा, मृत्यू: २० ऑक्टोबर २०११).
- १९७४: महेश भूपती (भारतीय लॉन टेनिस खेळाडू).
- १९८१: अमृता राव (भारतीय चित्रपट अभिनेत्री).
- १९८१: ऍना कुर्निकोव्हा (रशियन टेनिसपटू).
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
७ जून रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- १९५४: ऍलन ट्युरिंग (ब्रिटीश गणितज्ञ आणि संगणकशास्त्रज्ञ, जन्म: २३ जुन १९१२).
- १९७०: इ. एम. फोर्स्टर (ब्रिटिश साहित्यिक, जन्म: १ जानेवारी १८७९).
- १९७८: रोनाल्ड जॉर्ज व्रेफोर्ड (नोबेल पारितोषिक विजेते नॉरिश रसायनशास्त्रज्ञ, जन्म: ९ नोव्हेंबर १८९७८).
- १९९२: डॉ. स. ग. मालशे (मराठी वाङ्मयाचे अभ्यासक आणि संशोधक, जन्म: २४ सप्टेंबर १९२१).
- १९९२: बिल फ्रान्स सीनियर (NASCAR चे सहसंस्थापक, जन्म: २६ सप्टेंबर १९०९).
- २०००: गोपीनाथ तळवलकर (बालसाहित्यिक ,जन्म: २९ नोव्हेंबर १९०७).
- २००२: बसप्पा दानप्पा तथा बी. डी. जत्ती (भारताचे उपराष्ट्रपती, जन्म: १० सप्टेंबर १९१२).
- २०२०: चिरंजीवी सर्जा (भारतीय कन्नड चित्रपट अभिनेते, जन्म: १ ऑक्टोबर १९८४).
७ जून दिनविशेष संबंधी महत्त्वाचे दुवे:
जून महिन्यातील दिनविशेष | ||||||
---|---|---|---|---|---|---|
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ |
८ | ९ | १० | ११ | १२ | १३ | १४ |
१५ | १६ | १७ | १८ | १९ | २० | २१ |
२२ | २३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ |
२९ | ३० | |||||
तारखेप्रमाणे जून महिन्यातील सर्व दिनविशेष पहा. |
आज
सर्व विभाग / सेवा सुविधा / मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / जून महिन्यातील दिनविशेष
विभाग -
जानेवारी दिनविशेष · फेब्रुवारी दिनविशेष · मार्च दिनविशेष · एप्रिल दिनविशेष · मे दिनविशेष · जून दिनविशेष · जुलै दिनविशेष · ऑगस्ट दिनविशेष · सप्टेंबर दिनविशेष · ऑक्टोबर दिनविशेष · नोव्हेंबर दिनविशेष · डिसेंबर दिनविशेष
विषय -
जानेवारी · फेब्रुवारी · मार्च · एप्रिल · मे · जून · जुलै · ऑगस्ट · सप्टेंबर · ऑक्टोबर · नोव्हेंबर · डिसेंबर
अभिप्राय