२० जून दिनविशेष

२० जून दिनविशेष - इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक २० जून चे दिनविशेष.
२० जून दिनविशेष | 20 June in History
२० जून दिनविशेष, लक्ष्मणराव किर्लोस्कर. छायाचित्र: मराठीमाती अर्काईव्ह.
लक्ष्मणराव किर्लोस्कर - (२० जून १८६९ - २६ सप्टेंबर १९५६) भारतीय उद्योजक लक्ष्मणराव किर्लोस्कर हे किर्लोस्कर उद्योग समूहाचे संस्थापक होते. सन १८८८ साली त्यांनी बेळगाव येथे एक सायकल दुरुस्तीच्या दुकानाने आपल्या व्यावसायाची सुरुवात केली होती. पुढे त्यांच्या किर्लोस्कर समूहाने शेतीसाठी बनविलेले आपले लोखंडी नांगर हे पहिले उत्पादन.

जागतिक दिवस

२० जून रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
 • ध्वज दिन: आर्जेन्टिना.

ठळक घटना (घडामोडी)

२० जून रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी
 • १६३१: आयर्लंडमधील बाल्टिमोर शहर अल्जीरियाच्या चाच्यांनी लुटले.
 • १७५६: कोलकाताचा फोर्ट विल्यम हा ब्रिटीश किल्ला जिंकल्यावर बंगालच्या नवाब सिराज उद् दौलाने ब्रिटीश सैनिकांना तुरुंगात डांबले.
 • १७८२: अमेरिकेच्या कॉंग्रेसने राष्ट्रमुद्रा ठरवली.
 • १७८९: पॅरिसमध्ये सुमारे ५०० लोकप्रतिनिधींनी टेनिस कोर्टवरील शपथ घेतली व फ्रेंच क्रांतीला बळ दिले.
 • १७९१: फ्रेंच क्रांतीत आपले मरण असल्याचे ओळखून फ्रेंच राजघराण्याने व्हारेनला पळ काढण्याचा प्रयत्न सुरू केला.
 • १८३७: व्हिक्टोरिया इंग्लंडच्या राणीपदी.
 • १८६२: रोमेनियाचा पंतप्रधान बार्बु कटार्जुची हत्या.
 • १८६३: वेस्ट व्हर्जिनीया अमेरिकेचे ३५वे राज्य झाले.
 • १८७७: अलेक्झांडर ग्रॅहॅम बेलने कॅनडातील हॅमिल्टन शहरात व्यापारी तत्त्वावर चालणारा प्रथम दूरध्वनी बसवला.
 • १९१९: मायाग्वेझ, पोर्तोरिको येथील तियात्रो याग्वेझ या नाट्यगृहाला आग. १५० ठार.
 • १९५६: व्हेनेझुएलाचे सुपर कॉन्स्टेलेशन प्रकारचे विमान अमेरिकेच्या ऍस्बरी पार्क, न्यू जर्सी शहराजवळ समुद्रात कोसळले. ७४ ठार.
 • १९६०: मालीला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
 • १९६०: सेनेगालला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
 • २००१: परवेझ मुशर्रफ पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षपदी.
 • १८४०: म्युअल मोर्स यांना टेलिग्राफ चा पेटंट मिळाला.
 • १८८७: देशातील मुंबई येथील सर्वाधिक गर्दीचे स्टेशन व्हिक्टोरिया टर्मिनस (सध्याचे नाव सी. एस. टी.) सुरू झाले.
 • १८९९: केंब्रिज विद्यापीठाच्या ट्रायपॉस या गणिताच्या अंतिम परीक्षेत रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे पहिल्या वर्गात पहिले आल्यामुळे त्यांना सिनिअर रॅंग्लर होण्याचा बहुमान मिळाला.
 • १९२१: टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना झाली.
 • १९६०: महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची स्थापना झाली.
 • १९९०: ७.४ मेगावॅटचा भूकंपात इराण मध्ये ५०,००० लोक ठार तर १,५०,००० पर्यंत जखमी झाले.
 • १९९७: महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे राज्यातील पहिली मुलींची सैनिकी शाळा पुण्याजवळ सुरू झाली.

जन्म (वाढदिवस, जयंती)

२० जून रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
 • १८६९: लक्ष्मणराव किर्लोस्कर (किर्लोस्कर उद्योग समूहाचे संस्थापक, मृत्यू: २६ सप्टेंबर १९५६).
 • १९१५: टेरेन्स यंग (चिनी-इंग्लिश दिग्दर्शक आणि पटकथाकार, मृत्यू: ७ सप्टेंबर १९९४).
 • १९३९: रमाकांत देसाई (जलदगती गोलंदाज व राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष, मृत्यू: २८ एप्रिल १९९८).
 • १९४६: जनाना गुस्माव (पूर्व तिमोरचे राष्ट्राध्यक्ष).
 • १९४८: लुडविग स्कॉटी (नौरूचे राष्ट्राध्यक्ष).
 • १९५२: विक्रम सेठ (भारतीय लेखक आणि कवी).

मृत्यू (पुण्यतिथी, स्मृती दिवस, बलिदान दिवस, शहीद दिवस)

२० जून रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
 • १६६८: हेन्‍रिच रॉथ (जर्मनीतील संस्कृत विद्वान आणि धर्मप्रसारक, जन्म: १८ डिसेंबर १६२०).
 • १८३७: विल्यम चौथा (इंग्लंडचा राजा, जन्म: २१ ऑगस्ट १७६५).
 • १९१७: जेम्स मेसन क्राफ्ट्स (अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ, जन्म: ८ मार्च १८३९).
 • १९८७: डॉ. सलीम अली (पक्षिशास्त्रज्ञ व पद्मभूषण पुरस्कर्ते, जन्म: १२ नोव्हेंबर १८९६).
 • १९९७: भाऊसाहेब पाटणकर उर्फ जिंदादिल (मराठीतले शायर, जन्म: २९ डिसेंबर १९०८).
 • २००८: चंद्रकांत गोखले (मराठी रंगभूमी नट व चित्रपट अभिनेता, जन्म: ७ जानेवारी १९२१).
 • २०१३: डिकी रुतनागुर (भारतीय पत्रकार, जन्म: २६ फेब्रुवारी १९३१).


संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा

जून महिन्यातील दिनविशेष

नवी नोंद सुचवा · चूक कळवा · संदर्भांची यादी · अस्वीकरण

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.