दिनांक १९ जून च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस
TEXT - TEXT.
शेवटचा बदल १४ जून २०२१
जागतिक दिवस
१९ जून रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
- जून्टीन्थ: अमेरिका.
ठळक घटना / घडामोडी
१९ जून रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी
- १२६९: फ्रांसचा राजा लुई नवव्याने ज्यू व्यक्तींना जाहीर ठिकाणी पिवळे फडके न घालता आढळल्यास १० लिव्रचा दंड फर्मावला.
- १७७०: इमॅन्युएल स्विडेनबर्गने येशू ख्रिस्त पुन्हा जन्मल्याची नांदी केली.
- १८६२: अमेरिकेने आपल्या प्रांतातील गुलामगिरीची प्रथा बेकायदा जाहीर केली.
- १८६५: अमेरिकेतील गॅल्व्हेस्टन येथील गुलामांना मुक्ती. हा दिवस येथपासून जून्टीन्थ या नावाने साजरा केला जातो.
- १८६७: मेक्सिकोच्या सम्राट मॅक्सिमिलियन पहिल्याला मृत्यूदंड.
- १९१२: अमेरिकेत कामगारांसाठी ८ तासांचा एक दिवस कायदेशीर झाला.
- १९४३: बोमॉंट, टेक्सास येथे वांशिक दंगल.
- १९६१: वैतला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
- १९६६: शिवसेना या राजकीय पक्षाची स्थापना झाली.
- १९७८: गारफील्ड या कार्टून व्यक्तिमत्त्वाचे वर्तमानपत्रात पदार्पण.
- १६७६: शिवाजी महाराजांनी प्श्चात्त्पादग्ध सरनोबत नेताजी पालकर यांना विधीपूर्वक शुद्ध करून हिंदू धर्मात पुन्हा समाविष्ट केले.
- १९७७: ट्रान्स अलास्कन पाइपलाइन मधुन आर्क्टिक प्रदेशातुन तेलवाहतुक सुरू झाली.
- १९७८: इंग्लंडच्या इयान बोथम याने पाकिस्तान विरुद्ध लॉर्डसवर ८ बळी घेऊन शतकही केले.
- १९८१: भारताच्या ‘अॅपल’ उपग्रहाचे प्रक्षेपण.
- १९८९: ई. एस. वेंकटरामय्या यांनी भारताचे १९ वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला.
- १९९९: मैत्रेयी एक्स्प्रेस या कोलकाता ते ढाका बस सेवेचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी उद्घाटन केले.
जन्म / वाढदिवस / जयंती
१९ जून रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- १५९५: गुरु हर गोविंद (सहावे सिख गुरु, मृत्यू: ३ मार्च १६४४).
- १६२३: ब्लेस पास्कल (फ्रेंच गणितज्ञ व तत्त्वज्ञानी, मृत्यु: १९ ऑगस्ट १६६२).
- १८७७: पांडुरंग चिमणाजी पाटील (पुण्याच्या कृषी महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य, मृत्यू: ७ ऑगस्ट १९७८).
- १९४१: वाक्लाव क्लाउस (चेकोस्लोव्हेकियाचा राष्ट्राध्यक्ष ).
- १९४५: ऑॅंग सान सू की (म्यानमारची राजकारणी).
- १९४७: सलमान रश्दी (ब्रिटीश लेखक).
- १९७०: राहुल गांधी (भारतीय राजकारणी).
- १९७६: डेनिस क्रॉवले (फोरस्क्वेअरचे सह-संस्थापक).
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
१९ जून रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- १७४७: नादिर शाह (पर्शियाचा सम्राट, जन्म: २२ ऑक्टोबर १६९८).
- १९४९: सैयद जफरुल हसन (भारतीय तत्त्वज्ञ, जन्म: १४ फेब्रुवारी १८८५).
- १९५६: थॉमस वॉटसन (अमेरिकन उद्योगपती, आय. बी. एम. (IBM) चे अध्यक्ष, जन्म: १७ फेब्रुवारी १८७४).
- १९९३: विल्यम गोल्डिंग (नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश लेखक, जन्म: १९ सप्टेंबर १९११).
- १९९८: रमेशमंत्री (प्रवासवर्णनकार, कथाकार आणि विनोदी लेखक, जन्म: ६ जानेवारी १९२५).
- २००८: बरुण सेनगुप्ता (बंगाली पत्रकार, जन्म: २३ जानेवारी १९३४).
- २०२०: विद्याबेन शाह (भारतीय ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, जन्म: ७ नोव्हेंबर १९२२).
जून महिन्यातील दिनविशेष | |||||
---|---|---|---|---|---|
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ |
७ | ८ | ९ | १० | ११ | १२ |
१३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ |
२५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |