१४ जून दिनविशेष

१४ जून दिनविशेष - [14 June in History] दिनांक १४ जून च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
१४ जून दिनविशेष | 14 June in History

दिनांक १४ जून च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस


गोविंद बल्लाळ देवल - (१३ नोव्हेंबर १८५५ - १४ जून १९१६) गोविंद बल्लाळ देवल हे आद्य मराठी नाटककार होते. देवल यांनी वेगवेगळ्या विषयांवर लिहिलेली नाटके जसे दुर्गा, मृच्छकटिक, विक्रमोर्वशीय, झुंजारराव, शापसंभ्रम, संगीत शारदा आणि संशयकल्लोळ आहेत. यापैकी मृच्छकटिक, संगीत शारदा आणि संशयकल्लोळ या नाटकांना मराठीत मानाचे स्थान आहे.

शेवटचा बदल १४ जून २०२१

जागतिक दिवस
१४ जून रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस

 • जागतिक रक्तदाता दिवस

ठळक घटना / घडामोडी
१४ जून रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी

 • ११५८: इसार नदीच्या काठावर म्यूनिच शहर स्थापन केले.
 • १६४८: मॅसेच्युसेट्समध्ये मार्गारेट जोन्सला चेटकीण ठरवून फाशी देण्यात आली.
 • १७०४: मुघलांच्या कैदेत असलेल्या संभाजीराजे यांच्या मुलाचे औरंगजेबाने लग्न लावून दिले.
 • १७७५: अमेरिकन क्रांती - खंडीय सेनेची स्थापना.
 • १७७७: अमेरिकेने स्टार्स ॲंड स्ट्राइप्सचा आपला ध्वज म्हणून स्वीकार केला.
 • १७८९: केंटकीमध्ये ‘एलिजा क्रेग’ यांनी प्रथमतः ‘बर्बन व्हिस्की’ तयार केली.
 • १८००: नेपोलियन बोनापार्टने मॅरेंगोच्या लढाईत ऑस्ट्रियाला हरवले व इटलीचा प्रदेश जिंकला.
 • १८०७:नेपोलियन बोनापार्ट’ यांनी फ्रीडलॅंडच्या लढाईत रशियाला.
 • १८९६: महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रम ही संस्था स्थापन केली.
 • १९००: हवाई अमेरिकेचा प्रांत झाला.
 • १९००: राइकस्टॅगने जर्मनीचे आरमार वाढवण्याचे ठरवले.
 • १९०७: नॉर्वेत स्त्रीयांना मतदानाचा अधिकार.
 • १९१९: जॉन ऍल्कॉक व आर्थर व्हिटन विमानातून सेंट जॉन्स, न्यू फाउंडलॅंडमधून न थांबता अटलांटिक महासागर पार करण्यासाठी निघाले.
 • १९२६: ब्राझिल लीग ऑफ नेशन्समधून बाहेर.
 • १९३८: सुपरमॅनची चित्रपकथा पहिल्यांदा प्रकाशित.
 • १९४०: दुसरे महायुद्ध - पॅरिस जर्मनीच्या हवाली.
 • १९४०: दुसरे महायुद्ध - ऑश्वित्झ छळ केंद्रात पोलंडचे ७२८ राजकीय कैदी दाखल.
 • १९४५: भारताला स्वायत्तता देण्यासंबंधीची वेव्हेल योजना जाहीर.
 • १९५२: अमेरिकेने अणुशक्तीवर चालणारी पहिली पाणबुडी यु.एस.एस. नॉटिलस बांधण्यास सुरुवात केली.
 • १९६२: ऍना स्लेसर्स आल्बर्ट डिसाल्व्हो उर्फ बॉस्टन स्ट्रॅंग्लरची पहिली शिकार झाली.
 • १९६६: व्हॅटिकन सिटीने लिबोरम प्रोहिबिटम (बंदी घातलेल्या पुस्तकांची यादी) जाहीर करणे बंद केले.
 • १९६७: मरीनर ५ या अंतराळयानाचे शुक्राकडे प्रक्षेपित.
 • १९६७: चीनने पहिल्या हायड्रोजन बॉम्ब ची चाचणी केली.
 • १९७२: डी. डी. टी. या कीटकनाशकाच्या वापरावर अमेरिकेत बंदी घालण्यात आली.
 • १९८२: फॉकलॅंड युद्ध समाप्त.
 • १९९९: दक्षिण आफ्रिकेचे पहिले श्वेतवर्णीय राष्ट्राध्यक्ष नोबेल पारितोषिक विजेते नेल्सन मंडेला यांचा कायर्काळ संपला.
 • २००१: ए. सी. किंवा डी. सी. यापैकी कोणत्याही विद्युतप्रवाहावर चालणार्‍या उपनगरी गाडीचा (Electric Multiple Unit - 90EMU) शुभारंभ पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक वासुदेव गुप्ता यांच्या हस्ते झाले.

जन्म / वाढदिवस / जयंती
१४ जून रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे


मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
१४ जून रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १८२५: पिअर चार्ल्स एल्फांट (वॉशिंग्टन शहराचे रचनाकार फ्रेन्च अमेरिकन वास्तुविशारद आणि स्थापत्य अभियंता, जन्म: २ ऑगस्ट १७५४).
 • १९१६: गोविंद बल्लाळ देवल (मराठी नाटककार नाट्यदिग्दर्शक, जन्म: १३ नोव्हेंबर १८५५).
 • १९२०: मॅक्स वेबर (जर्मन अर्थशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ, जन्म: २१ एप्रिल १८६४).
 • १९४६: जॉन लोगी बेअर्ड (ब्रिटिश शास्त्रज्ञ, आद्य दूरचित्रवाणी संशोधक, जन्म: १३ ऑगस्ट १८८८).
 • १९८९: सुहासिनी मुळगावकर (मराठी अभिनेत्री व संस्कृत पंडित, जन्म: दिनांक उपलब्ध नाही).
 • २००७: कुर्त वॉल्डहाइम (संयुक्त राष्ट्रांचे चौथे सरचिटणीस, जन्म: २१ डिसेंबर १९१८).
 • २०१०: मनोहर माळगावकर (इंग्रजी लेखक, जन्म: १२ जुलै १९१३).
 • २०२०: राज मोहन वोहरा (शौर्य आणि नेतृत्त्वाबद्दल महावीर चक्र आणि परम विशिष्ठ सेवा पद सन्मानित लेफ्टनंट जनरल, जन्म: ७ मे १९३२).
 • २०२०: सुशांतसिंग राजपूत (भारतीय सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेते, जन्म: २१ जानेवारी १९८६).

दिनविशेष        जून महिन्यातील दिनविशेष
तारखेप्रमाणे #जून महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०
११
१२
१३
१४
१५
१६
१७
१८
१९
२०
२१
२२
२३
२४
२५
२६
२७
२८
२९
३०


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.