दिनांक ११ जून च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस
TEXT - TEXT.
शेवटचा बदल १० जून २०२१
जागतिक दिवस
११ जून रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
- -
ठळक घटना / घडामोडी
११ जून रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी
- १६६५: ‘मिर्झाराजे जयसिंग’ आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांच्यात पुरंदरचा तह झाला.
- १७८८: रशियाचे शोधक ‘गेरासिम इझ्माइलोव्ह’ अलास्काला पोहोचले.
- १८०५: डेट्रॉइट शहर आगीत जवळजवळ नष्ट झाले होते.
- १८६६: अलाहाबाद उच्च न्यायालयाची स्थापना.
- १९०१: न्यू झीलॅंडने कूक द्वीपे बळकावली.
- १९१७: पहिले महायुद्ध - दोस्त राष्ट्रांच्या दबावाखाली ग्रीसचा राजा कॉन्स्टन्टाईनने पदत्याग केला. त्याचा मुलगा अलेक्झांडर राजेपदी.
- १९३५: एडविन आर्मस्ट्रॉंगने पहिल्यांदा एफ. एम. लहरींचे प्रसारण केले.
- १९३७: जोसेफ स्टालिनने आपल्याच आठ लश्करी अधिकाऱ्यांना ठार करवले.
- १९३८: दुसरे चिनी-जपानी युद्ध - चालून येणाऱ्या जपानी सैन्याला रोखण्यासाठी चीनने यांगत्से नदीला कृत्रिम पूर आणला. यात ५,००,००० ते ९,००,००० नागरिक मारले गेले.
- १९६३: दोन श्यामवर्णीय विद्यार्थ्यांना अलाबामा विद्यापीठात शिरु न देण्याकरता अलाबामा राज्याचा गव्हर्नर जॉर्ज वॉलेस स्वतः दारात उभा राहिला.
- १९६४: जर्मनीच्या कोलोन शहरातील प्राथमिक शाळेत वॉल्टर सायफर्टने धुमाकूळ घातला. आठ विद्यार्थी व दोन शिक्षक ठार.
- १९७०: ऍना मे हेस व एलिझाबेथ पी. हॉइसिंग्टन अमेरिकन सैन्यातील पहिल्या स्त्री जनरल झाल्या.
- १९७२: दारू पिउन रेल्वे गाडी चालवण्यार्यां चालकामुळे एल्थाम वेल हॉल येथे रेल्वे अपघात. सहा ठार, १२६ जखमी.
- १९९७: सुखोई-३०के ही रशियन बनावटीची विमाने भारतीय हवाई दलात दाखल.
- १९९८: कॉम्पॅक कॉम्पुटर कंपनी ने डिजिटल एक़्पिमेंट कॉर्पोरेशन विकत घेण्यासाठी ९ अब्ज अमेरिकी डॉलर मध्ये इतिहासातील सर्वात मोठा सौदा केला.
- २००१: ओक्लाहोमा सिटीतील बॉम्बस्फोट घडवून आणण्याबद्दल टिमोथी मॅकव्हेला मृत्युदंड.
- २००४: कॅसिनी-हायगेन्स अंतराळयान शनिच्या उपग्रह फीबीच्या जवळून पसार झाला.
- २००७: बांगलादेशातील चितगावमध्ये भूस्खलनामुळे १३० लोक ठार झाले.
जन्म / वाढदिवस / जयंती
११ जून रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- १८१५: ज्युलिया मार्गारेट कॅमेरॉन (भारतीय-श्रीलंकन छायाचित्रकार, मृत्यू: २६ जानेवारी १८७९).
- १८९४: काइचिरो टोयोडा (टोयोटा मोटर कंपनीचे संस्थापक, मृत्यू: २७ मार्च १९५२).
- १८९७: रामप्रसाद बिस्मिल (क्रांतिकारक, मृत्यू: १९ डिसेंबर १९२७).
- १९४८: लालूप्रसाद यादव (बिहारचे मुख्यमंत्री).
- १९८२: मार्को आर्मेंट (टंबलर चे सहसंस्थापक).
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
११ जून रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- ख्रिस्त पूर्व ३२३: अलेक्झांडर द ग्रेट (मॅसेडोनियाचा राजा, जन्म: २० जुलै ख्रिस्त पूर्व ३५६).
- १७२७: जॉर्ज (पहिला) (इंग्लंडचा राजा, जन्म: २८ मे १६६०)
- १९२४: वासुदेव वामन तथा वासुदेवशास्त्री खरे (इतिहासाचार्य, लेखक, नाटककार व कवी, जन्म: ५ ऑगस्ट १८५८).
- १९५०: पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ सानेगुरुजी (बालसाहित्यिक, जन्म: २४ डिसेंबर १८९९).
- १९९७: मिहिर सेन (इंग्लिश खाडी पोहुन जाणारे पहिले भारतीय, जन्म: १६ नोव्हेंबर १९३०).
- २०००: राजेश पायलट (कॉंग्रेस नेता केंद्रीय मंत्री, जन्म: १० फेब्रुवारी १९४५).
दिनविशेष जून महिन्यातील दिनविशेष | |||||
---|---|---|---|---|---|
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ |
७ | ८ | ९ | १० | ११ | १२ |
१३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ |
२५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |