२ जून दिनविशेष

२ जून दिनविशेष - [2 June in History] दिनांक 2 जून च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
२ जून दिनविशेष | 2 June in History

दिनांक २ जून च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस


आनंद अभ्यंकर - (२ जून १९६३ - २४ डिसेंबर २०१२).


शेवटचा बदल २ जून २०२१

जागतिक दिवस
२ जून रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस

 • -
ठळक घटना / घडामोडी
२ जून रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी

 • ४५५: व्हॅन्डाल टोळ्यांनी रोम लुटले.
 • १६१५: रुआचे रिकोले धर्मप्रसारक कॅनडात क्वुबेक सिटी येथे पोचले.
 • १७७४: ब्रिटिश सैनिकांना अमेरिकेतील वसाहतीत कोणाच्याही घरात कधीही शिरायची मुभा.
 • १८००: कॅनडातील न्यू फाऊंडलंड प्रांतात जगातील सर्वप्रथम कांजिण्याची लस देण्यात आली.
 • १८९६: गुग्लियेमो मार्कोनीला रेडियोसाठी पेटंट बहाल.
 • १८९७: आपल्या मृत्यूचे वृत्त वर्तमानपत्रात वाचून मार्क ट्वेनने न्यूयॉर्क टाईम्सला सांगितले - माझ्या मृत्यूचे वृत्त ही अतिशयोक्ती आहे.
 • १९२४: देशाच्या हद्दीत राहणाऱ्या अमेरिकेतील मूळ रहिवाशांना अमेरिकेचे नागरिकत्व बहाल केले गेले.
 • १९४६: राजा उंबेर्तो दुसऱ्याला हटवून इटलीने राजेशाही संपवली व स्वतःला प्रजासत्ताक घोषित केले.
 • १९५३: इंग्लंडमध्ये राणी एलिझाबेथ दुसरीचा राज्याभिषेक.
 • १९९९: भूतानमध्ये दूरचित्रवाणी प्रसारण सुरू.
 • २०००: लेखिका अमृता प्रीतम यांना दिल्ली सरकारचा अकरा लाख रुपयांचा सहस्रकातील कवयित्री हा पुरस्कार जाहीर.
 • २००३: मंगळ ग्रहाचा अधिक अभ्यास करण्यासाठी मार्स एक्सप्रेस प्रोब हे उपकरण अवकाशयानाद्वारे सोडण्यात आले.
 • २०१४: तेलंगण भारताचे २९वे राज्य झाले.

जन्म / वाढदिवस / जयंती
२ जून रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १३२८: मुराकामी (जपानचे सम्राट).
 • १७३१: मार्था वॉशिंग्टन (अमेरिकेचा प्रथम राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या पत्नी).
 • १८४०: थॉमस हार्डी (इंग्लिश लेखक आणि कवी).
 • १८६५: जॉर्ज लोहमन (इंग्लिश क्रिकेट खेळाडू).
 • १९०७: विष्णू विनायक बोकील (मराठी नाटककार, लेखक).
 • १९३०: पीट कॉन्राड (अमेरिकन अंतराळवीर).
 • १९४३: ईलया राजा (भारतीय संगीतकार).
 • १९५५: नंदन निलेकणी (इन्फोसिसचे सहसंस्थापक).
 • १९५५: मणिरत्नम (चित्रपट दिग्दर्शक).
 • १९६३: आनंद अभ्यंकर (भारतीय अभिनेते).
 • १९६५: स्टीव वॉ (ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू).
 • १९६५: मार्क वॉ (ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू).

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
२ जून रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १८८२: ज्युसेप्पे गॅरिबाल्डी (इटलीचे क्रांतिकारक).
 • १९५८: कर्ट आल्टर (जर्मन रसायनशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेते).
 • १९७५: देवेन्द्र मोहन बोस (वैश्विक किरणांवर मूलभूत संशोधनाची सुरुवात करणारे भारतीय पदार्थवैज्ञानिक).
 • १९८२: फझल इलाही चौधरी (पाकिस्तानी राजकारणी).
 • १९८८: राज कपूर (भारतीय अभिनेते, चित्रपट निर्माते व दिग्दर्शक).
 • १९९०: सर रेक्स हॅरिसन (ब्रिटिश आणि अमेरिकन रंगभूमीवरील आणि हॉलीवूड चित्रपटांतील अभिनेते).
 • १९९२: डॉ. गुंथर सोन्थायमर (मराठी संस्कृतीचे जर्मन अभ्यासक).
 • २०१४: दुर्यसामी सायमन लौरडुसामी (भारतीय कार्डिनल / कॅथोलिक चर्चमधील उच्च पदाचे पुजारी).

दिनविशेष        जून महिन्यातील दिनविशेष
तारखेप्रमाणे #जून महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०
११
१२
१३
१४
१५
१६
१७
१८
१९
२०
२१
२२
२३
२४
२५
२६
२७
२८
२९
३०


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.