५ जून दिनविशेष

५ जून दिनविशेष - [5 June in History] दिनांक ५ जून च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
गोविंदराव टेंबे | Govindrao Tembe

दिनांक ५ जून च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस


गोविंदराव टेंबे - (५ जून १८८१ - ९ ऑक्टोबर १९५५) गोविंदराव टेंबे हे प्रख्यात महाराष्ट्रीय हार्मोनियम वादक, संगीत रचनाकार, गायक नट व मराठी साहित्यिक होते. त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील सांगवडे येथील.

शेवटचा बदल ५ जून २०२१

जागतिक दिवस
५ जून रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस

 • जागतिक पर्यावरण दिन
 • संविधान दिन: डेन्मार्क.
 • मुक्ती दिन: सेशेल्स.

ठळक घटना / घडामोडी
५ जून रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी

 • १३०५: क्लेमेंट पाचवा पोपपदी.
 • १८३२: पॅरिसमध्ये विद्यार्थ्यांचा उठाव.
 • १८४९: डेन्मार्कने नवीन संविधान अंगिकारले व संवैधानिक राजेशाही कायम केली.
 • १८६४: अमेरिकन यादवी युद्ध-पीडमॉंटची लढाई - दक्षिणेचा पराभव.
 • १९०७: स्वामीनारायण पंथाची स्थापना.
 • १९१५: डेन्मार्कमध्ये स्त्रीयांना मतदानाचा हक्क.
 • १९१७: पहिले महायुद्ध - अमेरिकेत सक्तीची सैन्यभरती सुरू.
 • १९२४: अर्न्स्ट अलेक्झांडरसनने पहिला फॅक्स संदेश स्वतःच्या वडिलांना पाठवला.
 • १९३३: अमेरिकेने गोल्ड स्टॅन्डर्ड रद्द केले.
 • १९४४: दुसरे महायुद्ध - रॉयल एर फोर्सने नॉर्मंडीवर तुफान बॉम्बफेक केली.
 • १९४६: शिकागोच्या लासाल हॉटेलमध्ये आग. ६१ ठार.
 • १९५९: सिंगापुरमध्ये सर्वप्रथम सरकारची स्थापना.
 • १९७५: सहा दिवसांच्या युद्धानंतर सुएझ कालवा पुन्हा खुला.
 • १९७७: सेशेल्समध्ये उठाव.
 • १९८०: भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक व ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे (AITUC) एक संस्थापक नारायण मल्हार जोशी यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीटाचे अनावरण करण्यात आले.
 • १९८४: अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात लपून बसलेल्या अतिरेक्यांचा बीमोड करण्यासाठी भारतीय पंतप्रधान इंदिरा गांधीने मंदिरावर हल्ला करण्याचा आदेश दिला.
 • १९८९: चीनची राजधानी बिजींगच्या तियेनआनमेन चौकातील चळवळीदरम्यान एका अज्ञात निःशस्त्र व्यक्तीने रणगाड्यासमोर उभे राहून रणगाडा थांबवला. हे छायाचित्र या चळवळीचा मानबिंदू ठरले.
 • १९९४: वेस्ट इंडिजच्या ब्रायन लाराने इंग्लिश कौटी क्रिकेट स्पर्धेत वॉरविकशायरकडून खेळताना नाबाद ५०१ धावा करून प्रथम दर्जाच्या क्रिकेटमध्ये नवीन जागतिक विक्रम प्रस्थापित केला.
 • २००३: पाकिस्तान आणि भारतामध्ये तीव्र उष्णतेची लाट आल्यामुळे तापमान ५० डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त झाले.
 • २०१३: चीनच्या जिलिन प्रांतातील मिशाझी गावात असलेल्या कुक्कुटमांस तयार करण्याच्या कारखान्यात आग लागून ११९ कामगार ठार. ६० जखमी.

जन्म / वाढदिवस / जयंती
५ जून रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १७२३: अ‍ॅडॅम स्मिथ (स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ आणि तत्त्ववेत्ते, मृत्यू: १७ जुलै १७९०).
 • १८५०: पॅट गॅरेट (अमेरिकेच्या न्यू मेक्सिको राज्यातील पोलिस अधिकारी, मृत्यू: २९ फेब्रुवारी १९०८).
 • १८७९: नारायण मल्हार जोशी (भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक, मृत्यू: ३० मे १९५५).
 • १८८१: गोविंदराव टेंबे (हार्मोनियम वादक, अभिनेते व संगीतकार, नाट्यसंगीताचे पहिले शिल्पकार, पहिल्या बोलपटाचे संगीत दिग्दर्शक, संगीत क्षेत्रातील पहिले सौंदर्य मीमांसक, संगीतिकांचे प्रवर्तक, मृत्यू: ९ ऑक्टोबर १९५५).
 • १८८३: जॉन मायनार्ड केन्स (ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ, मृत्यू: २१ एप्रिल १९४६).
 • १९००: डेनिस गॅबॉर (हंगेरीयन-ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेते, मृत्यू: ९ फेब्रुवारी १९७९).
 • १९०८: रवि नारायण रेड्डी (कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया चे सहसंस्थापक, मृत्यू: ७ सप्टेंबर १९९१).
 • १९१२: एरिक हॉलिस (इंग्लिश क्रिकेट खेळाडू, मृत्यू: १६ एप्रिल १९८१).
 • १९१६: सिड बार्न्स (ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू, मृत्यू: १६ डिसेंबर १९७३).
 • १९४५: अंबर रॉय (भारतीय क्रिकेट खेळाडू, मृत्यू: १९ सप्टेंबर १९९७).
 • १९४६: पॅट्रिक हेड (विल्यम्स एफ१ टीम चे सहसंस्थापक).
 • १९५०: हरिश्चंद्र माधव बिराजदार (मराठी पहिलवान / कुस्तीगीर, मृत्यू: १४ सप्टेंबर २०११).
 • १९६१: रमेश कृष्णन (भारतीय टेनिस खेळाडू आणि प्रशिक्षक).
 • १९७२: अजय सिंह बिष्ट / योगी आदित्यनाथ (भारतीय राजकारणी, महंत व उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री).
 • १९७४: मर्व्हिन डिलन (वेस्ट ईंडीझचे क्रिकेट खेळाडू).

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
५ जून रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १०१७: सांजो (जपानचे सम्राट, जन्म: ५ फेब्रुवारी ९७६).
 • १९७३: माधव सदाशिव गोळवलकर / श्री गुरूजी (राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक, जन्म: १९ फेब्रुवारी १९०६).
 • १९८७: गणेश हरी खरे (भारतीय इतिहासतज्ञ, जन्म: १० जानेवारी १९०१).
 • १९९६: आचार्य कुबेर नाथ राय (भारतीय कवी आणि विद्वान, जन्म: २६ मार्च १९३३).
 • २००४: रोनाल्ड रेगन (अभिनेते आणि अमेरिकेचे ४० वे राष्ट्राध्यक्ष, जन्म: ६ फेब्रुवारी १९११).
 • २०१६: एलिनॉर झेलियट (अमेरिकन लेखिका आणि इतिहासकार, जन्म: ८ ऑक्टोबर १९२६).

दिनविशेष        जून महिन्यातील दिनविशेष
तारखेप्रमाणे #जून महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०
११
१२
१३
१४
१५
१६
१७
१८
१९
२०
२१
२२
२३
२४
२५
२६
२७
२८
२९
३०


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.