१० जून दिनविशेष

१० जून दिनविशेष - इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक १० जून चे दिनविशेष.
१० जून दिनविशेष | 10 June in History

दिनांक १० जून च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस


TEXT - TEXT.

शेवटचा बदल १० जून २०२१

जागतिक दिवस
१० जून रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस

 • दृष्टिदिन: महाराष्ट्र.
 • जागतिक दृष्टिदान दिन.

ठळक घटना / घडामोडी
१० जून रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी

 • ११९०: जेरुसलेमवर चाल करून निघालेले फ्रेडरिक बार्बारोसा सॅली नदीत बुडुन मृत्यू पावले.
 • १६९२: सेलम, मॅसेच्युसेट्स मध्ये ‘ब्रिजेट बिशप’ यांना चेटकीण ठरवून फाशी देण्यात आले.
 • १७६८: ‘माधवराव पेशवे’ आणि ‘राघोबादादा’ यांच्यामधे धोडपची लढाई झाली. त्यात ‘राघोबादादा’ पराभूत झाला.
 • १७७०: ‘कॅप्टन जेम्स कूक’चे जहाज ऑस्ट्रेलियाच्या किनार्‍यावरील ग्रेट बॅरियर रीफ वर अडकले.
 • १८३८: म्यॉल क्रीकची कत्तल - ऑस्ट्रेलियातील २८ स्थानिक आदिवासी व्यक्तींची हत्या.
 • १८८६: न्यू झीलॅंडमधील माउंट तारावेरा ज्वालामुखीचा उद्रेक, १५३ ठार.
 • १९१८: पहिले महायुद्ध - इटलीच्या छोट्या मोटारबोटीने टोरपेडो मारुन हंगेरीची बॅटलशिप एस.एम.एस. इस्तवान बुडवली.
 • १९२४: इटलीच्या समाजवादी नेता ‘ज्याकोमो मॅट्टेओटी’ यांची हत्या.
 • १९४०: दुसरे महायुद्ध - इटलीने फ्रांस व युनायटेड किंग्डमविरुद्ध युद्ध पुकारले.
 • १९४०: दुसरे महायुद्ध - कॅनडाने इटली विरुद्ध युद्ध पुकारले.
 • १९४०: दुसरे महायुद्ध - फील्ड मार्शल एर्विन रोमेलचे जर्मन सैन्य इंग्लिश चॅनल पर्यंत चाल करून गेले.
 • १९४०: दुसरे महायुद्ध - नॉर्वेने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.
 • १९४४: डिस्टोमोची कत्तल - जर्मन सैन्याने स्त्री व बालकांसह २१८ व्यक्तींची हत्या केली.
 • १९६७: सहा दिवसांचे युद्ध-इस्रायेल व सिरियात संधी.
 • १९८२: १० जून १९८२ पासून दृष्टीदिन महाराष्ट्र राज्यात साजरा केला जातो.
 • १९९७: ख्मेर रूज नेता पॉल पॉटने आपल्याच संरक्षणमंत्री सॉन सेन व त्याच्या ११ कुटुंबियांची हत्या करण्याचे आदेश देउन पलायन केले.
 • १९९९:उस्ताद झाकीर हुसेन’ यांची अमेरिकेतील प्रतिष्ठाप्राप्त नॅशनल हेरिटेज गौरववृत्तीसाठी निवड झाली.
 • २००३: स्पिरिट रोव्हर मंगळाकडे रवाना.

जन्म / वाढदिवस / जयंती
१० जून रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १९०८: जनरल जयंतीनाथ चौधरी (भारताचे लष्करप्रमुख, हैदराबादचे लष्करी प्रशासक व भारताचे कॅनडातील राजदूत, पद्‌मविभूषण, मृत्यू: ६ एप्रिल १९८३).
 • १९१६: विल्यम रोसेनबर्ग (डंचिन डोनट्स चे स्थापक, मृत्यू: २२ सप्टेंबर २००२).
 • १९२४: के. भालचंद्र (नेत्रशल्यविशारद).
 • १९३८: राहुल बजाज (भारतीय उद्योगपती).
 • १९३८: वासंती एन. भाट नायक (भारतीय गणितज्ञ आणि शिक्षक, मृत्यू: १२ फेब्रुवारी २००९).
 • १९५५: प्रकाश पादुकोण (भारतीय बॅडमिंटनपटू).

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
१० जून रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १८३६: आंद्रे अ‍ॅम्पिअर (फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ, जन्म: २० जानेवारी १७७५).
 • १९०३: लुईगी क्रेमॉना (इटालियन गणितज्ञ, जन्म: ७ डिसेंबर १८३०).
 • १९५५: मार्गारेट अ‍ॅबॉट (भारतीय-अमेरिकन गोल्फर, जन्म: १५ जून १८७८).
 • १९७६: अ‍ॅडॉल्फ झुकॉर (पॅरामाउंट पिक्चर्स चे सहसंस्थापक, जन्म: ७ जानेवारी १८७३).
 • २००१: फुलवंतीबाई झोडगे (सामाजिक कार्यकर्त्या).
 • २००६: गुलाबदास ब्रोकर (गुजराती लेखक समीक्षक, जन्म: २० सप्टेंबर १९०९)


संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा

जून महिन्यातील दिनविशेष

नवी नोंद सुचवा · चूक कळवा · संदर्भांची यादी · अस्वीकरण

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.