४ जून दिनविशेष

४ जून दिनविशेष - [4 June in History] दिनांक ४ जून च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
अशोक सराफ | Ashok Saraf

दिनांक ४ जून च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस


अशोक सराफ - (४ जून १९४७) अशोक सराफ हे एक लोकप्रिय मराठी अभिनेते आहेत. मराठी चित्रपटांसोबतच त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांतही लक्षवेधी भूमिका केल्या आहेत. दूरचित्रवाणीच्या छोट्या पडद्यावरील हम पांच सारख्या मालिकेमध्येही त्यांनी अभिनय केला आहे.

शेवटचा बदल ४ जून २०२१

जागतिक दिवस
४ जून रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस

 • राष्ट्र सेवादल दिवस.
 • हुतात्मा दिन.
 • विश्व निष्पाप बालक व आक्रमणपीडित दिन.
 • सेना दिन: फिनलंड.
 • स्वातंत्र्य दिन: टोंगा.

ठळक घटना / घडामोडी
४ जून रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी

 • १६७४: राज्याभिषेकापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची सुवर्णतुला झाली. ब्रिटिश वकिलातीच्या मते त्यांचे वजन सुमारे ७३ किलो भरले.
 • १७९२: कॅप्टन जॉर्ज व्हॅनकूवरने प्युजेट साउंड हा अखात ग्रेट ब्रिटनच्या नावे जाहीर केला.
 • १७९४: ब्रिटिश सैन्याने हैतीची राजधानी पोर्ट-औ-प्रिंस जिंकली.
 • १८०४: आपल्या पत्नीच्या मृत्यूने व्यथित असलेल्या सार्डिनियाच्या राजा चार्ल्स इम्मॅन्युएल चौथ्याने पदत्याग केला. त्याचा भाऊ व्हिक्टर इम्मॅन्युएल राजेपदी.
 • १८७६: न्यू यॉर्कहून निघालेली ट्रान्सकॉंटिनेन्टल एक्सप्रेस ही रेल्वे गाडी ८३ तास ३९ मिनिटांच्या प्रवासानंतर सान फ्रांसिस्को येथे पोचली. अमेरिकेच्या दोन तीरांना जोडणारी ही रेल्वेची पहिली प्रवासी खेप होती.
 • १९१२: मॅसेच्युसेट्स कामगारांचा लघुत्तम पगार ठरवणारे पहिले अमेरिक राज्य झाले.
 • १९२०: ट्रायानॉनचा तह.
 • १९३९: ज्यूंचे शिरकाण - युरोपमधून ९६३ ज्यूंना घेउन आलेल्या एस.एस. सेंट लुईस या बोटीला अमेरिकेने परवानगी नाकारली. यापूर्वी क्युबानेही हे प्रवासी स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे ही बोट युरोपला परतली. यातील अनेक प्रवासी नाझींच्या छळसत्रात मृत्यू पावले.
 • १९४०: दुसरे महायुद्ध - जर्मन सैन्य पॅरिसमध्ये घुसले.
 • १९४४: अमेरिकेच्या हंटर किलर प्रकारच्या पाणबुड्यांनी जर्मनीची यु-५०५ ही पाणबुडी पकडली.
 • १९४४: दुसरे महायुद्ध - दोस्त सैन्याने रोम जिंकले.
 • १९६७: ब्रिटिश मिडलॅंड विमान कंपनीचे विमान कोसळले. ७२ ठार.
 • १९७०: टोंगाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
 • १९७९: घानामध्ये लश्करी उठाव.
 • १९९३: आय.एन. एस. म्हैसूर या युद्धविनाशिकेचे जलावतरण.
 • १९९४: वेस्टइंडिजच्या ब्रायन लाराचा ८ डावांत ७ शतकांचा नवा विक्रम.
 • १९९४: गीतकार मजरुह सुलतानपुरी यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.
 • १९९७: इन्सॅट-२डी या संपूर्ण भारतीय बनावटीच्या उपग्रहाचे फ्रेंच गयानातील कोऊरू येथून यशस्वी प्रक्षेपण झाले.
 • २००१: नेपाळचे शेवटचे राजे ग्यानेंद्र राज्यपदावर.

जन्म / वाढदिवस / जयंती
४ जून रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १७३८: जॉर्ज (तिसरा) (इंग्लंडचे राजे, मृत्यू: २९ जानेवारी १८२०).
 • १९०४: भगत पुराण सिंह (भारतीय प्रकाशक, पर्यावरणवादी, मृत्यू: ५ ऑगस्ट १९९२).
 • १९१०: ख्रिस्तोफर कॉकेरेल्म (होव्हर्क्राफ्ट चे शोधक, मृत्यू: १ जुन १९९९).
 • १९१५: मालिबो केएटा (माली देशाचे पहिले अध्यक्ष, मृत्यू: १६ मे १९७७).
 • १९३६: नूतन बहल (भारतीय चित्रपट अभिनेत्री, मृत्यू: २१ फेब्रुवारी १९९१).
 • १९४६: एस. पी. बालसुब्रमण्यम (भारतीय पार्श्वगायक व दाक्षिणात्य चित्रपटातील पार्श्वगायक पद्मश्री व पद्मभूषण, मृत्यू: २५ सप्टेंबर २०२०).
 • १९४७: अशोक सराफ (भारतीय अभिनेते).
 • १९७४: जॅकब सहाय्या कुमार अरुनी (भारतीय शेफ, मृत्यू: ४ नोव्हेंबर २०१२).
 • १९७५: अँजेलिना जोली (अमेरिकन अभिनेत्री).
 • १९९०: जेत्सुन पेमा वांग्चुक (भूतानच्या राणी).

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
४ जून रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १९४७: पंडित धर्मानंद कोसंबी (बौद्ध धर्माचे अभ्यासक, जन्म: ९ ऑक्टोबर १८७६).
 • १९६२: चार्ल्स विल्यम बीब (अमेरिकन निसर्गतज्ज्ञ).
 • १९९८: डॉ.अश्विन दासगुप्ता (इतिहासतज्ज्ञ).
 • २०२०: बासु चटर्जी (भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक, जन्म: १० जानेवारी १९३०).

दिनविशेष        जून महिन्यातील दिनविशेष
तारखेप्रमाणे #जून महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०
११
१२
१३
१४
१५
१६
१७
१८
१९
२०
२१
२२
२३
२४
२५
२६
२७
२८
२९
३०


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.