१६ मे दिनविशेष

१६ मे दिनविशेष - [16 May in History] दिनांक १६ मे च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
माधव मनोहर | Madhav Manohar

दिनांक १६ मे च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस


माधव मनोहर - (२० मार्च १९११ - १६ मे १९९४) लेखक, नाटककार आणि समिक्षक असलेले माधव मनोहर यांचं बी. ए. पर्यंत शिक्षण झालं होतं आणि ते मुंबईतील एस. एन. डी. टी. महाविद्यालयात प्राध्यापक झाले होते आणि पुढे ते तेथूनच निवृत्त झाले होते.

शेवटचा बदल १६ मे २०२१

जागतिक दिवस
१६ मे रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस

 • शिक्षक दिन: मलेशिया.

ठळक घटना / घडामोडी
१६ मे रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी

 • १५६८: मेरी स्टुअर्ट पळून इंग्लंडला आली.
 • १८३६: २७ वर्षाच्या एडगर ऍलन पोने त्याच्या १३ वर्षाच्या चुलत बहिणीशी लग्न केले.
 • १८६६: अमेरिकेत पाच सेन्ट किंवा निकेल हे नाणे व्यवहारात आणले.
 • १९१८: अमेरिकेत सरकारवर टीका करणे हा तुरुंगवासास पात्र गुन्हा ठरवण्यात आला.
 • १९२९: पहिले ऑस्कार पुरस्कार वितरीत.
 • १९६६: चीनी कम्युनिस्ट पक्षाने सांस्कृतिक क्रांतीला सुरुवात केली.
 • १९६९: सोवियेत संघाचे अंतराळयान व्हेनेरा ५ शुक्रावर उतरले.
 • १९७५: सिक्कीममधील जनतेने कौल दिल्यावर भारताने सिक्कीमला देशाचा भाग करून घेतले.
 • १९७५: जुन्को ताबेई एव्हरेस्टवर चढणारी प्रथम स्त्री ठरली.
 • १९९२: स्पेस शटल एन्डेव्हरची प्रथम अंतराळयात्रा सफल.
 • १९९३: बचेन्द्री पालच्या नेतृत्वाखालील पहिल्या महिला भारतीय मोहिमेने सात मुलींसह अठरा गिर्यारोहकांना एव्हरेस्ट पादाक्रांत करण्याचा मान मिळवून दिला व नवा जागतिक विक्रम नोंदविला.
 • १९९६: अटलबिहारी वाजपेयी भारताच्या पंतप्रधानपदी.
 • २०००: बॅडमिंटन अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी तसेच खेळांचे दूरचित्रवाणी प्रसारण सुलभ करण्यासाठी या खेळातील गेम १५ ऐवजी ७ गुणांचा करण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन महासंघाच्या क्‍वालालंपूर येथील बैठकीत घेण्यात आला. मात्र २००६ मधे हा नियम परत बदलला गेला.
 • २००५: कुवैतमध्ये स्त्रीयांना प्रथमच मतदानाचा हक्क.

जन्म / वाढदिवस / जयंती
१६ मे रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १८२५: केरुनाना लक्ष्मण छत्रे (आद्य गणिती, आधुनिक भास्कराचार्य, मृत्यू: १९ मार्च १८८४).
 • १८३१: डेव्हिड एडवर्ड ह्यूजेस (मायक्रोफोनचे सहसंशोधक, मृत्यू: २२ जानेवारी १९००).
 • १९०५: हेन्‍री फोंडा (अमेरिकन अभिनेते, मृत्यू: १२ ऑगस्ट १९८२).
 • १९२६: माणिक वर्मा (शास्त्रीय व सुगम संगीत गायिका, मृत्यू: १० नोव्हेंबर १९९६).
 • १९३१: के. नटवर सिंग (भारताचे माजी परराष्ट्रमंत्री / कार्यकाळ: २३ मे २००४ ते ७ नोव्हेंबर २००५).
 • १९७०: गॅब्रियेला सबातिनी (अर्जेंटिनाच्या टेनिस खेळाडू).

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
१६ मे रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १८३०: जोसेफ फोरियर (फ्रेंच गणितज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ, जन्म: २१ मार्च १७६८).
 • १९५०: अण्णासाहेब लठ्ठे (कोल्हापूर संस्थानचे दिवाण व शिक्षणमंत्री, जन्म: ९ डिसेंबर १८७८).
 • १९७७: मादीबो केएटा (माली देशाचे पहिले अध्यक्ष).
 • १९९०: जिम हेन्सन (मॅपेट्स आणि फ्रेगल रॉकचे निर्माते, २४ सप्टेंबर १९३६).
 • १९९४: माधव मनोहर (साहित्य समीक्षक, जन्म: २० मार्च १९११).
 • १९९४: फनी मजूमदार (चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथा लेखक, जन्म: २८ डिसेंबर १९११).
 • २०००: माधव गोविंद काटकर (मराठी कवी, २५ डिसेंबर १९१४).
 • २००८: रॉबर्ट मोन्डावी (ओपस वन वायनरीचे सहसंस्थापक, जन्म: १८ जून १९१३).
 • २०१४: रुसी मोदी (टाटा स्टीलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, १७ जानेवारी १९१८).

दिनविशेष        मे महिन्यातील दिनविशेष
तारखेप्रमाणे #मे महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०
११
१२
१३
१४
१५
१६
१७
१८
१९
२०
२१
२२
२३
२४
२५
२६
२७
२८
२९
३०
३१


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.