१२ मे दिनविशेष

१२ मे दिनविशेष - [12 May in History] दिनांक १२ मे च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
विजय भट् | Vijay Bhatt

दिनांक १२ मे च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस


विजय भट्ट - (१२ मे १९०७ - १७ ऑक्टोबर १९९३) विजय भट्ट हे भारतीय चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज निर्माता / दिग्दर्शक आणि पटकथा लेखक होते. विजय भट्ट यांनी ‘राम राज्य’, ‘बैजू बावरा’, ‘गूंज उठी शहनाई’ आणि ‘हिमालय की गोद में’ या चित्रपटांची निर्मिती केली आहे.

शेवटचा बदल ११ मे २०२१

जागतिक दिवस
 • जागतिक परिचारिका दिन

ठळक घटना / घडामोडी
 • १६६६: आग्रा येथे शिवाजी महाराज व औरंगजेब यांची पहिली व शेवटची भेट झाली.
 • १७९७: नेपोलियन बोनापार्टने व्हेनिस जिंकले.
 • १९०९: सेवानंद बाळुकाका कानिटकर, डॉ. गजानन श्रीपत तथा अण्णासाहेब खेर आणि वि. ग. केतकर यांनी पुणे अनाथ विद्यार्थी गृहाची स्थापना केली.
 • १९५२: प्रजासत्ताक भारताचे पहिले संसदीय अधिवेशन सुरू.
 • १९५२: गजसिंग जोधपुरच्या राजेपदी.
 • १९९८: केन्द्र सरकारी कर्मचार्‍यांचे निवृत्तीचे वय ५८ वर्षांवरुन वरुन ६० वर्षे करण्याचा केन्द्र सरकारचा निर्णय.
 • १९९८: भाषातज्ज्ञ आणि वैदिक संस्कृतीचे अभ्यासक रामचंद्र नारायण दांडेकर यांना बिर्ला अ‍ॅकॅडमी ऑफ आर्ट ॲंड कल्चर या संस्थेचा जी. डी. बिर्ला आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर
 • २०१०: एस. एच. कपाडीया यांनी भारताचे ३८ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

जन्म / वाढदिवस
 • १८२०: फ्लोरेंस नाइटिंगेल, आधुनिक शुश्रुषाशास्त्राच्या संस्थापिका; ब्रिटिश परिचारिका.
 • १८८७: सदाशिव विनायक बापट, आठवणीकार.
 • १८९९: इंद्रा देवी, लाटव्हियाच्या योगशिक्षिका, भारतीय योगी.
 • १९०५: आत्माराम रावजी भट, कृतिशील विचारवंत, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स ॲंड इंडस्ट्रीज चे संस्थापक.
 • १९०७: विजय भट्ट (विजयशंकर जग्नेश्वर), चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथालेखक.
 • १९२५: योगी बेरा, अमेरिकन बेसबॉलपटू.
 • १९३०: डॉ. तारा वनारसे (रिचर्ड्स) मराठी-इंग्लिश डॉक्टर, लेखिका.
 • १९३३: नंदकुमार महादेव नाटेकर उर्फ नंदू नाटेकर, अग्रगण्य भारतीय बॅडमिंटनपटू.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
 • १९७०: नोली सॅच, नोबेल पुरस्कार विजेते जर्मन कवी आणि नाटककार.
 • २०१४: सरत पुजारी, भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, आणि पटकथालेखक.

दिनविशेष        मे महिन्यातील दिनविशेष
तारखेप्रमाणे #मे महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०
११
१२
१३
१४
१५
१६
१७
१८
१९
२०
२१
२२
२३
२४
२५
२६
२७
२८
२९
३०
३१


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.