१० मे दिनविशेष

१० मे दिनविशेष - [10 May in History] दिनांक १० मे च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
जगदीश खेबुडकर | Jagdish Khebudkar

दिनांक १० मे च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस


जगदीश खेबुडकर - (१० मे १९३२ - ३ मे २०११)

शेवटचा बदल ९ मे २०२१

जागतिक दिवस
 • संविधान दिन: मायक्रोनेशिया.
 • पालक दिन: दक्षिण कोरिया.
 • मातृ दिन: मेक्सिको.
 • जलसंधारण दिन: महाराष्ट्र.

ठळक घटना / घडामोडी
 • इ.पू. २८: सौरडागांचे पहिले ज्ञात निरीक्षण चीनमध्ये नोंदले गेले.
 • १५०३: क्रिस्टोफर कोलंबसने केमन द्वीपसमूहाला भेट दिली व त्यांचे नामकरण ला तोर्तुगा असे केले.
 • १७७३: ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीला अमेरिकन बाजारपेठेची मक्तेदारी देणारा टी अ‍ॅक्ट ब्रिटिश पार्लमेंटमध्ये संमत झाला. १६ डिसेंबरची विख्यात 'बॉस्टन टी पार्टी' त्याविरोधात होती.
 • १७९६: नेपोलियन बोनापार्टने इटलीत ऑस्ट्रियाच्या सैन्याचा पराभव केला.
 • १८१८: इंग्रज व मराठे यांच्यात तह होऊन रायगड किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.
 • १८२४: लंडनमधील नॅशनल गॅलरी सर्वसाधारण लोकांसाठी खुली करण्यात आली.
 • १८५७: पहिला भारतीय स्वातंत्र्य संग्राम सुरू.ब्रिटिशांविरोधात उठावाची पहिली ठिणगी मीरतला पडली.
 • १९०९: सावरकरांनी ब्रिटिशांच्या आनंदोत्सवाला प्रत्युत्तर म्हणून लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये १८५७ च्या वीरांचा गौरव करणारा समारंभ आयोजित केला. त्यात त्यांनी आपल्या भाषणात त्या संघर्षाला उघड उघड स्वातंत्र्यसमर म्हटले.
 • १९३७: स्वातंत्र्यवीर सावरकर यांची रत्‍नागिरीच्या स्थानबद्धतेतून बिनशर्त मुक्तता.
 • १९८१: मुंबईत पहिला विद्युतप्रकाशातला क्रिकेट सामना खेळला गेला.
 • १९९३: तीन महिला सदस्य असलेल्या एका तुकडीने माऊंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्‍च शिखर सर केले. त्यातील २३ वर्षाच्या संतोष यादवने हे शिखर दुसर्‍यांदा सर करणारी पहिली भारतीय महिला होण्याचा मान मिळवला. एका वर्षाच्या आत हे शिखर सर करणारी ती जगातील पहिली महिला बनली.
 • १९९४: दक्षिण आफ्रिकेचे पहिले श्वेतवर्णीय राष्ट्राध्यक्ष नोबेल पारितोषिक विजेते नेल्सन मंडेला यांनी देशाची सूत्र हाती घेतली.
 • १९९६: एव्हरेस्टवर हिमवादळ. चढाई करणारे ८ व्यक्ति ठार.
 • १९९७: ७.३ मेगावॅट भूकंपाच्या तीव्र धक्क्याने इराण मधील सुमारे १५६७ लोक ठार, २३०० लोक जखमी आणि ५०००० लोक बेघर झाले.
 • २००२: घानामध्ये फुटबॉलचा सामना सुरु असताना चेंगराचेंगरी. १२० ठार.

जन्म / वाढदिवस
 • १८३८: जॉन विल्क्स बूथ, अब्राहम लिंकनचा मारेकरी.
 • १८५५: युकतेश्वर गिरी, भारतीय गुरु आणि शिक्षक.
 • १८६३: उपेंद्रकिशोर राय, संगीतकार, लेखक आणि चित्रकार.
 • १८८९: नारायण दामोदर सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे बंधू, कादंबरीकार.
 • १९०५: पंकज मलिक, गायक व संगीतकार.
 • १९०९: बेल्लारी शामण्णा केशवन, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ग्रंथालयशास्त्रज्ञ, पद्मश्री, इंडियन नॅशनल सायंटिफिक डॉक्युमेंटेशन सेंटर चे पहिले संचालक.
 • १९१४: ताराचंद बडजात्या, चित्रपट निर्माते.
 • १९१८: रामेश्वरनाथ काओ, रिसर्च ॲंड अ‍ॅनॅलेसिस विंग (RAW) या भारतीय गुप्तचर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष.
 • १९२७: नयनतारा सहगल, भारतीय लेखिका.
 • १९३१: जगदीश खेबूडकर, ज्येष्ठ गीतकार.
 • १९४०: माणिकराव गोडघाटे ऊर्फ ग्रेस, प्रसिद्धी पराङमुख गीतकार व कवी.
 • १९६०: बोनो, आयरिश गायक.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
 • १४८२: पाओलो डाल पोझो टोस्कानेली, इटलीचा गणितज्ञ व अंतराळतज्ञ.
 • १८९९: महादेव विनायक रानडे, रॅंड वधाच्या प्रकरणी द्रविड बंधूंची हत्या करणारे.
 • १९८१: विमादि तथा विनायक माधव दीक्षित पटवर्धन, विनोदी लेखक प्राध्यापक.
 • १९९८: यदुनाथ दत्तात्रय थत्ते, पत्रकार, समाजसेवक, लेखक, चरित्रकार, साधना मासिकाचे संपादक.
 • २०००: नागोराव घन:श्याम तथा ना. घ. देशपांडे, कवी.
 • २००१: सुधाकरराव नाईक, महाराष्ट्राचे १३ वे मुख्यमंत्री,हिमाचल प्रदेशचे राज्यपाल.
 • २००२: सय्यद अख्तर हुसेन रिझवी ऊर्फ कैफी आझमी, गीतकार.
 • २०१५: निनाद बेडेकर, भारतीय इतिहासकार, लेखक.

दिनविशेष        मे महिन्यातील दिनविशेष
तारखेप्रमाणे #मे महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०
११
१२
१३
१४
१५
१६
१७
१८
१९
२०
२१
२२
२३
२४
२५
२६
२७
२८
२९
३०
३१


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.