
रामकृष्ण मिशन - (१ मे १८९७) ‘स्वामी विवेकानंद’ यांनी रामकृष्ण परमहंसांची शिकवण जनमानसांत पोचवण्यासाठी ‘रामकृष्ण मिशन’ सुरू केले.
जागतिक दिवस
१ मे रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस- महाराष्ट्र दिन: महाराष्ट्र.
- गुजरात दिन: गुजरात.
- कामगार दिन: अमेरिका व अमेरिकाप्रभावित देश वगळता जगभर.
- लेइ दिन: हवाई.
- बेल्टेन: आयर्लंड.
- राष्ट्रीय प्रेम दिन: चेक प्रजासत्ताक.
- कायदा दिन: अमेरिकेची संयुक्त संस्थाने.
ठळक घटना (घडामोडी)
१ मे रोजी घडलेल्या ठळक ऐतिहासिक घटना आणि घडामोडी- १८६२: मुंबई विद्यापिठाचा पहिला पदवीदान समारंभ.
- १८८६: या दिवशी अमेरिकेत आठ तासाचे काम हे एक दिवसाचे काम असे प्रमाणित करण्यासाठी संप सुरू झाला. हा दिवस जगभर (अमेरिका सोडून) कामगार दिन म्हणून पाळला जातो.
- १८९७: स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना
- १९३०: सूर्यमालेतील नवव्या ग्रहाचे प्लुटो असे नामकरण करण्यात आले.
- १९५६: पोलियोची लस जनतेस उपलब्ध.
- १९६०: द्वैभाषिक मुंबई राज्याचे विभाजन होऊन महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन राज्ये निर्माण केली गेली.
- १९८१: सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती.
- १९७२: कोळसा खाणीचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.
- १७३९: चिमाजी अप्पा यांनी सैन्यासह वसई वर हल्ला केला.
जन्म (वाढदिवस, जयंती)
१ मे रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे- १९१३: बलराज साहनी (ज्येष्ठ भारतीय हिंदी चित्रपट, रंगमंच अभिनेते, पंजाबी लेखक, मृत्यू: १३ एप्रिल १९७३).
- १९१५: रामेश्वर शुक्ल / टोपणनाव: अंचल (आधुनिक हिंदी कवी, कादंबरीकार, कथाकार व निबंधकार, मृत्यू: १२ ऑक्टोबर १९९५).
- १९१९: मन्ना डे (हिंदी चित्रपटसृष्टीतील पार्श्वगायक व संगीतकार, मृत्यू: २४ ऑक्टोबर २०१३).
- १९४४: सुरेश कलमाडी (भारतीय राजकारणी).
- १९५५: आनंद महिंद्रा / आनंद गोपाल महिंद्रा (भारतीय उद्योगपती आणि महिंद्रा समूहाचे अध्यक्ष, हयात).
- १९८४: राणा अय्युब (भारतीय पत्रकार आणि लेखिका, हयात).
- १९८८: अनुष्का शर्मा (भारतीय हिंदी चित्रपट अभिनेत्री, हयात).
मृत्यू (पुण्यतिथी, स्मृती दिवस, बलिदान दिवस, शहीद दिवस)
१ मे रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे- १९७२: कमलनयन बजाज (भारतीय उद्योगपती).
- १९९३: नानासाहेब गोरे / ना. ग. गोरे (समाजवादी विचारवंत).
- १९९८: गंगुताई पटवर्धन (शिक्षणतज्ञ).
- २००२: पंडित आवळीकर (मराठी वाङ्मयाचे अभ्यासक).
संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
मे महिन्यातील दिनविशेष
मे | ||||||
---|---|---|---|---|---|---|
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ |
८ | ९ | १० | ११ | १२ | १३ | १४ |
१५ | १६ | १७ | १८ | १९ | २० | २१ |
२२ | २३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ |
२९ | ३० | ३१ | ||||
तारखेप्रमाणे मे महिन्यातील सर्व दिनविशेष पहा. |
नवी नोंद सुचवा · चूक कळवा · संदर्भांची यादी · अस्वीकरण