२३ मे दिनविशेष - [23 May in History] दिनांक २३ मे च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
दिनांक २३ मे च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस
TEXT - TEXT
शेवटचा बदल २३ मे २०२१
जागतिक दिवस
२३ मे रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
- -
ठळक घटना / घडामोडी
२३ मे रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी
- १५६८: नेदरलॅंड्सला स्पेनपासून स्वातंत्र्य.
- १६०९: व्हर्जिनीयाचे दुसरे संविधान स्वीकृत.
- १७०१: समुद्री चाचा कॅप्टन विल्यम किडला फाशी.
- १७३७: पोर्तुगीजांकडुन जिंकल्यानंतर पेशव्यांनी अर्नाळा किल्ला परत बांधून घेतला.
- १७८८: दक्षिण कॅरोलिनाने अमेरिकेचे संविधान स्वीकारले.
- १८०५: नेपोलियन बोनापार्टला इटलीचा राज्यपदी राज्याभिषेक.
- १८१३: व्हेनेझुएलाचा स्वातंत्र्यसैनिक सिमोन बॉलिव्हारच्या नेतृत्त्वाखाली क्रांतिकारकांनी मेरिदा शहर जिंकले. बॉलिव्हारला एल लिबर्तादोर (मुक्तिदाता) ही पदवी बहाल.
- १८२९: सिरील डेमियनला अॅकॉर्डियन या वाद्याचे पेटंट मिळाले.
- १८४४: सर्वप्रथम तार संदेश मोर्स कोडमध्ये पाठवण्यात आला. संदेश होता - व्हॉट हॅथ गॉड रॉट! (देवाने काय ठरवले आहे!).
- १९११: न्यूयॉर्क सार्वजनिक ग्रंथालय सामान्य जनतेस खुले.
- १९१५: पहिले महायुद्ध - इटली दोस्त राष्ट्रांना सामील झाले.
- १९२३: बेल्जियमच्या सबिना एरलाइन्सची स्थापना.
- १९३४: अमेरिकन दरोडेखोर बॉनी पार्कर व क्लाईड बॅरो पोलिसांकडून ठार.
- १९३९: चाचणीची सफर सुरु असताना अमेरिकेची पाणबुडी यु.एस.एस. स्क्वॉलस बुडाली. २६ खलाशी मृत्युमुखी. ३२ खलाशी, अधिकारी व १ प्रवाश्याला दुसर्या दिवशी वाचवण्यात आले.
- १९५१: तिबेट देशाने चीनबरोबर तिबेटच्या शांततेत मुक्तीसाठी सतरा बिंदू करार केला.
- १९५६: आयुर्विमा व्यवसायाचे राष्ट्रीयीकरण करण्यासंबंधीचे विधेयक मंजूर झाले.
- १९५८: अमेरिकेचा पहिला उपग्रह एक्सप्लोरर १ बंद पडला.
- १९७७: नेदरलॅंड्समध्ये अतिरेक्यांनी रेल्वे गाडीतील प्रवाशांना धरले. अजून एका गटाने शाळेतील १०० विद्यार्थ्यांना धरले.
- १९८४: बचेंद्री पाल या भारतीय महिलेचे एव्हरेस्ट शिखरावर यशस्वी पदार्पण.
- १९९५: जावा संगणक भाषेची अधिकृत घोषणा.
- १९९७: माऊंट एव्हरेस्ट हे सर्वोच्च शिखर सर्वप्रथम सर करणार्या तेनसिंग नोर्गे यांचे नातू ताशी तेनसिंग यांनी माऊंट एव्हरेस्ट सर केले.
- २००१: एव्हरेस्ट शिखर प्रथमच भारतीय लष्कराच्या पथकाकडून सर.
- २००४: पॅरिसच्या चार्ल्स दि गॉल विमानतळाचा काही भाग कोसळला. ५ ठार. ३ जखमी.
जन्म / वाढदिवस / जयंती
२३ मे रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- १७०७: कार्ल लिनिअस, स्वीडीश वनस्पतीतज्ञ.
- १८४४: अब्दुल बहा, बहाई धर्मगुरु.
- १८७५: आल्फ्रेड पी. स्लोन, अमेरिकन उद्योगपती.
- १८९६: केशवराव भोळे, मराठी संगीत समीक्षक, संगीतकार, संगीत दिग्दर्शक, लेखक.
- १९१८: डेनिस कॉम्प्टन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९१९: महाराणी गायत्रीदेवी, जयपूरच्या राजमाता.
- १९२६: पी. गोविंद पिल्लई, मार्क्सवादी कम्युनिस्ट नेते.
- १९२६: बॅसिल साळदादोर डिसोझा, भारतीय बिशप.
- १९३३: मोहन वेल्हाळ, मुद्रितशोधन तज्ञ.
- १९४३: कोवेलमूडी राघवेंद्र राव, पटकथालेखक आणि दिग्दर्शक.
- १९४५: पद्मराजन, भारतीय चित्रपट दिग्दर्शक.
- १९५१: अनातोली कार्पोव्ह, रशियन बुद्धीबळपटू.
- १९६५: वूर्केरी रामन, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९६६: ग्रेम हिक, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
२३ मे रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- १४९८: गिरोलामो साव्होनारोला, ख्रिश्चन धर्मप्रसारक व फ्लोरेन्सचा राजा.
- १५२४: इस्माईल पहिला, इराणचा शहा.
- १८५७: ऑगस्टिन लुई कॉशि, फ्रेंच गणितज्ञ.
- १९०६: हेन्रिक इब्सेन, नॉर्वेजियन नाटककार, दिग्दर्शक आणि कवी.
- १९३४: बॉनी पार्कर, अमेरिकन दरोडेखोर.
- १९३४: क्लाईड बॅरो, अमेरिकन दरोडेखोर.
- १९३७: जॉन डी. रॉकफेलर, अमेरिकन उद्योगपती.
- १९४५: हाइनरिक हिमलर, नाझी अधिकारी.
- १९६०: जॉर्ज क्लोडे, निऑन लाईट चे निर्माते.
- २०१४: माधव मंत्री, भारतीय क्रिकेटर.
- २०१४: आनंद मोडक, भारतीय संगीतकार आणि दिग्दर्शक.
- २०२०: मोहित बघेल, अभिनेता.
दिनविशेष मे महिन्यातील दिनविशेष | |||||
---|---|---|---|---|---|
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ |
७ | ८ | ९ | १० | ११ | १२ |
१३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ |
२५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |
३१ |