१८ मे दिनविशेष

१८ मे दिनविशेष - [18 May in History] दिनांक १८ मे च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
रीमा लागू | Reema Lagoo

दिनांक १८ मे च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस


रीमा लागू - (२१ जून १९५८ - १८ मे २०१७).

शेवटचा बदल १८ मे २०२१

जागतिक दिवस
१८ मे रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस

 • -

ठळक घटना / घडामोडी
१८ मे रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी

 • १८०४: नेपोलियन बोनापार्ट फ्रांसच्या सम्राटपदी.
 • १९१२: पूर्णपणे भारतात बनवलेला पुंडलिक हा मूकपट प्रदर्शित झाला.
 • १९१७: अमेरिकन कॉंग्रेसने नागरिकांना सक्तीने सैन्यात भरती करण्याचा अधिकार राष्ट्राध्यक्षाला दिला.
 • १९३८: प्रभात चा गोपालकृष्ण हा चित्रपट मुंबईच्या सेंट्रल सिनेमात प्रदर्शित झाला.
 • १९४०: प्रभात चा संत ज्ञानेश्वर हा चित्रपट मुंबई व पुणे या ठिकाणी एकाच दिवशी प्रदर्शित झाला.
 • १९४४: दुसरे महायुद्ध-मॉन्टे कॅसिनोची लढाई - उभय पक्षातील २०,००० सैनिकांच्या मृत्यूनंतर जर्मन सैन्याची पीछेहाट.
 • १९५३: जॅकी कॉक्रन ही स्वनातीत विमान चालवणारी प्रथम स्त्री ठरली.
 • १९५८: अमेरिकेच्या एफ.१०४ स्टारफायटर विमानाने ताशी २,२५९.८२ कि.मी.चा वेग गाठून विक्रम प्रस्थापित केला.
 • १९६९: अपोलो १०चे प्रक्षेपण.
 • १९७२: दापोली येथे कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना झाली.
 • १९७४: भारताने पोखरण १ परमाणू परीक्षण केले. परमाणू ताकद असणारा सहावा देश झाला.
 • १९८०: पेरूमध्ये शायनिंग पाथ या अतिरेकी संघटनेने मतदान केन्द्रावर हल्ला चढवून आपल्या कारवायांची सुरुवात केली.
 • १९९०: फ्रान्स च्या टीजीव्ही रेल्वे ने ५१५.३ किमी/ताशी वेगाने धावण्याचा नवीन जागतिक विक्रम केला.
 • १९९१: रशियाच्या सोयुझ अंतराळातुन भ्रमण करणारी हेलन शेरमन ही महिला पहिली ब्रिटिश अंतराळयात्री बनली.
 • १९९५: स्थानिक ठिकाणचे ५,००० रुपयांपर्यंतचे धनादेश खात्यात भरल्यानंतर तिसर्‍या दिवशी ती रक्‍कम ग्राहकास काढण्याची मुभा द्यावी, असा आदेश रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने दिला.
 • १९९८: पुण्याच्या सुरेन्द्र चव्हाणने जगातील सर्वोच्‍च एव्हरेस्ट शिखर सर केले.
 • २००९: श्रीलंका सरकारने एलटीटीई ला पराभूत करून सुमारे २६ वर्षच्या युद्धाला संपवले.

जन्म / वाढदिवस / जयंती
१८ मे रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १०४८: उमर खय्याम (पर्शियन कवी).
 • १६८२: छत्रपती शाहूराजे भोसले (मराठा साम्राज्याचे पाचवे छत्रपती).
 • १८७२: बर्ट्रान्ड रसेल (इंग्लिश तत्त्वज्ञानी व गणितज्ञ).
 • १८९७: फ्रॅंक काप्रा (अमेरिकन चित्रपट निर्माता, दिग्दर्शक व लेखक).
 • १९१३: पुरुषोत्तम काकोडकर (गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, काँग्रेस नेते).
 • १९३१: डॉन मार्टिन (अमेरिकन व्यंगचित्रकार).
 • १९३३: एच. डी. देवेगौडा (भारताचे तेरावे पंतप्रधान).
 • १९७९: जेन्स बर्गेंस्टन (माईनक्राफ्ट या गेमचे सहसंस्थापक).

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
१८ मे रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १६७५: जॉक मार्केट (फ्रेंच जेसुइट धर्मप्रचारक व शोधक).
 • १८०८: एलीया क्रेग (बोर्नबॉन व्हिस्कीचे निर्माते).
 • १८४६: बाळशास्त्री जांभेकर (मराठी वृत्तपत्र व्यवसायाचे जनक, दर्पणकार).
 • १९६६: पंचानन माहेश्वरी (वनस्पतीशास्त्रज्ञ).
 • १९८६: कानरू लक्ष्मण राव (स्थापत्य अभियंता).
 • १९९७: कमलाबाई रघुनाथराव गोखले (भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या स्त्री कलाकार).
 • १९९९: रामचंद्र सप्रे (पहिले राष्ट्रीय बुद्धीबळ विजेते).
 • २००९: वेल्लुपल्ली प्रभाकरन (एल. टी. टी. ई., Liberation Tigers of Tamil Eelam चे संस्थापक).
 • २०१२: जय गुरूदेव (भारतीय धार्मिक नेते).
 • २०१५: अरुणा शानबाग (भारतीय परिचारिका).
 • २०१७: रीमा लागू (भारतीय अभिनेत्री).

दिनविशेष        मे महिन्यातील दिनविशेष
तारखेप्रमाणे #मे महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०
११
१२
१३
१४
१५
१६
१७
१८
१९
२०
२१
२२
२३
२४
२५
२६
२७
२८
२९
३०
३१


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.