दिनांक ४ मे च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस
अनंत काणेकर: (२ डिसेंबर १९०५ - ४ मे १९८०) अनंत आत्माराम काणेकर हे मराठी कवी, लेखक, पत्रकार होते. १९३५ ते १९३९ अशी चार वर्षे ते आधी ‘चित्रा’ आणि नंतर ‘आशा’ या साप्ताहिकांचे संपादक होते.
शेवटचा बदल ८ मे २०२१
जागतिक दिवस
- कोळसा कामगार दिन
- स्मृती दिन: नेदरलँड्स.
- युवा दिन: चीन.
- स्वातंत्र्य दिन: लात्व्हिया.
ठळक घटना / घडामोडी
- १९०४: अमेरिकेने पनामा कालव्याचे काम सुरू केले.
- १९३०: ब्रिटीश पोलिसांनी महात्मा गांधींना अटक करून येरवडा तुरुंगात ठेवले.
- १९९५: ‘बॉम्बे’ ऎवजी ‘मुंबई’ हेच मूळ नाव अधिकृत राहील, असा शिवसेना-भाजप युती यांच्या राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय.
जन्म / वाढदिवस
- श्रीनृसिंह जयंती
- ११३४: महात्मा बसवेश्वर.
- १७६७: त्यागराज, भारतीय संगीतकार.
- १९३३: बाबा कदम, प्रख्यात मराठी कादंबरीकार.
- १९३४: अरुण दाते, भावगीत गायक.
- १९४३: प्रसांत पटनाईक, भारतीय अर्थशास्त्रज्ञ.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
- १७९९: टिपू सुलतान, म्हैसुरचा वाघ म्हणून ओळखला जाणारा पराक्रमी श्रीरंगपट्टणम येथे इंग्रजांशी लढताना मारला गेला.
- १९६८: आशुतोष मुखोपाध्याय, बंगाली साहित्यिक.
- १९८०: प्रा. अनंत काणेकर, मराठीतील विख्यात साहित्यिक.
- २००८: तबलावादक किशन महाराज
दिनविशेष मे महिन्यातील दिनविशेष | |||||
---|---|---|---|---|---|
तारखेप्रमाणे #मे महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा | |||||
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ |
७ | ८ | ९ | १० | ११ | १२ |
१३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ |
२५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |
३१ |