इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक २ डिसेंबर चे दिनविशेष
TEXT - TEXT.
शेवटचा बदल १ डिसेंबर २०२१
जागतिक दिवस
२ डिसेंबर रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
- राष्ट्र दिन: संयुक्त अरब अमीराती, ब्रिटनपासून स्वातंत्र्य.
- राष्ट्र दिन: लाओस.
ठळक घटना / घडामोडी
२ डिसेंबर रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी
- १४०२: लीपझीग विद्यापीठ सुरू झाले.
- १८०४: नोत्र देम कॅथेड्रलमध्ये नेपोलियन बोनापार्टचा फ्रांसच्या सम्राटपदी राज्याभिषेक.
- १८०५: ऑस्टर्लित्झची लढाई - नेपोलियन बोनापार्टच्या नेतृत्त्वाखाली फ्रांसच्या लश्कराचा रशिया व ऑस्ट्रियाच्या संयुक्त दलावर विजय.
- १९४२: एनरिको फर्मी याने प्रथमच शिकागो येथील अणूभट्टीत अणुविभाजनाची शृंखला अभिक्रिया (Chain Reaction) नियंत्रित करण्यात यश मिळवले. यामुळे अणूऊर्जेचा शोध लागला.
- १९४२: योगी अरविंदांच्या अरविंद आश्रमाची पॉडिचेरी येथे स्थापना झाली.
- १८४५: मॅनिफेस्ट डेस्टिनी - पश्चिमेचे प्रदेश काबीज करावयाची अमेरिकन कॉंग्रेसला उद्देशून अमेरिकन अध्यक्ष जेम्स पोकची घोषणा.
- १८४८: फ्रांझ जोसेफ पहिला ऑस्ट्रियाच्या सम्राटपदी.
- १८५२: नेपोलियन तिसरा फ्रांसच्या सम्राटपदी.
- १९३९: न्यू यॉर्क शहरातील ला ग्वार्डिया विमानतळाचे उद्घाटन.
- १९७१: संयुक्त अरब अमीरातीची स्थापना. अबु धाबी, अजमान, फुजैरा, शारजा, दुबई व उम-अल-कुवैन सदस्य.
- १९७६: फिडेल कॅस्ट्रो क्यूबाचे अध्यक्ष झाले.
- १९८८: बेनझीर भुट्टो पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी.
- १९८९: भारताच्या पंतप्रधानपदी विश्वनाथ प्रताप सिंग यांचा शपथविधी.
- १९९९: काळा पैसा अधिकृत व्यवहारात आणण्यास प्रतिबंध करणारे आणि परकीय चलन व्यवस्थापन करणारे (FEMA) ही दोन विधेयके लोकसभेत मंजूर.
- २००१: एन्रॉनने दिवाळे काढल्याचे जाहीर केले.
जन्म / वाढदिवस / जयंती
२ डिसेंबर रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- १८५५: सर नारायण गणेश चंदावरकर (कायदेपंडित, समाजसुधारक, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, मृत्यू: १४ मे १९२).
- १८८५: जॉर्ज रिचर्ड मिनोत (यकृत आणि यकृताच्या स्रावांचा अभ्यास करणारे शास्रज्ञ, मृत्यू: २५ फेब्रुवारी १९५०).
- १८९८: इंदर लाल रॉय (पहिल्या महायुद्धातील भारतीय पायलट, मृत्यू: २२ जुलै १९१८).
- १९०५: अनंत काणेकर (सोविएत लँड नेहरू पुरस्कार विजेते मराठी साहित्यिक, मृत्यू: ४ मे १९८०).
- १९३७: मनोहर जोशी (महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री).
- १९४२: डॉ. अनिता अवचट (मुक्तांगणच्या संस्थापिका).
- १९४४: इब्राहिम रुगोवा (कोसोवो देशाचे पहिले अध्यक्ष, मृत्यू: २१ जानेवारी २००६).
- १९४७: धीरज पारसणा (भारतीय क्रिकेटपटू).
- १९५९: बोमन ईराणी (भारतीय अभिनेते).
- १९७२: सुजित सोमसुंदर (भारतीय क्रिकेटपटू).
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृती दिवस
२ डिसेंबर रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- १५९४: गेरहार्ट मरकेटर (नकाशाकार, गणितज्ञ आणि तत्त्वज्ञ, जन्म: ५ मार्च १५१२).
- १९०६: बाळाजी प्रभाकर मोडक (कालाजंत्रीकार आणि आद्य विज्ञान प्रसारक, जन्म: २२ मार्च १८४७).
- १९८०: चौधरी मुहम्मद अली (पाकिस्तानचे ४थे पंतप्रधान चौधरी मुहम्मद अली यांचे निधन. (जन्म: १५ जुलै १९०५)
- १९९६: एम. चेन्ना रेड्डी (आंध्र प्रदेशचे ११वे मुख्यमंत्री, जन्म: १३ जानेवारी १९१९).
- २०१४: ए आर अंतुले (महाराष्ट्राचे ८ वे मुख्यमंत्री, जन्म: ९ फेब्रुवारी १९२९).
२ डिसेंबर दिनविशेष
दिनविशेष डिसेंबर महिन्यातील दिनविशेष | |||||
---|---|---|---|---|---|
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ |
७ | ८ | ९ | १० | ११ | १२ |
१३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ |
२५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |
३१ |