३ डिसेंबर दिनविशेष

३ डिसेंबर दिनविशेष - [3 December in History] दिनांक ३ डिसेंबर च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
३ डिसेंबर दिनविशेष | 3 December in History

इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक ३ डिसेंबर चे दिनविशेष


TEXT - TEXT.


शेवटचा बदल १ डिसेंबर २०२१

जागतिक दिवस
३ डिसेंबर रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस

  • वकील दिवस: भारत.

ठळक घटना / घडामोडी
३ डिसेंबर रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी

  • १७९६: दुसरा बाजीराव मराठा साम्राज्याचा पेशवा बनला.
  • १८१८: इलिनॉय अमेरिकेचे २१वे राज्य झाले.
  • १८२९: लॉर्ड विल्यम बेंटिंग यांनी सतीच्या प्रथेवर बंदी घातली.
  • १८७०: बॉम्बे म्युच्युअल लाईफ अ‍ॅश्युअरन्स सोसायटी या भारतातील पहिल्या विमा कंपनीची स्थापना झाली.
  • १९२७: लॉरेल आणि हार्डी यांचा पहिला चित्रपट पुटिंग पॅट ऑन फिलिप्स प्रकाशित झाला.
  • १९६७: डॉ. क्रिस्टियन बर्नार्ड यांनी दक्षिण अफ्रिकेतील केपटाऊन येथे जगातील पहिली मानवी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी केली.
  • १९७१: पाकिस्तानने भारतावर हल्ला केला.
  • १९७९: आयातुल्लाह खोमेनी ईराणचे सर्वेसर्वा बनले.
  • १९८४: भोपाळ वायू दुर्घटना - भोपाळमधील युनियन कार्बाईड या कारखान्यातून मेथिल आयसोसायनेट या विषारी वायूची गळती होऊन सुमारे चौदाशे लोक लगेच मृत्युमुखी पडले तर नंतरच्या काही वर्षांत मृतांची एकूण संख्या सुमारे २०,००० इतकी झाली.
  • १९९४: जपानमध्ये प्लेस्टेशन रिलीझ करण्यात आले.
  • २००९: सोमालियाची राजधानी मोगादिशूमधील आत्मघातकी बॉम्बहल्ल्यात तीन मंत्र्यांसह २५ ठार.

जन्म / वाढदिवस / जयंती
३ डिसेंबर रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

  • १७७६: श्रीमंत यशवंतराव होळकर बहादूर (हिज हायनेस राजराजेश्वर सवाई, मृत्यू: २८ ऑक्टोबर १८११).
  • १८८२: नंदलाल बोस (जगविख्यात चित्रकार, मृत्यू: १६ एप्रिल १९६६).
  • १८८४: राजेंद्र प्रसाद श्रीवास्तव (भारताचे पहिले राष्ट्रपती, मृत्यू: २८ फेब्रुवारी १९६३).
  • १८८९: खुदिराम बोस (मुझफ्फरनगर बॉम्बस्पोटातील क्रांतिकारक, मृत्यू: ११ ऑगस्ट १९०८).
  • १८९२: माधव केशव काटदरे (कवी, मृत्यू: ३ सप्टेंबर १९५८).
  • १८९४: दिवा जिवरतीनम (भारतीय वकील आणि राजकारणी, मृत्यू: २५ मार्च १९७५).
  • १९३७: बिनोद बिहारी वर्मा (मैथिली लेखक, मृत्यू: ९ नोव्हेंबर २००३).

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृती दिवस
३ डिसेंबर रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

  • १५५२: सेंट फ्रान्सिस झेविअर (ख्रिस्ती धर्मप्रसारक, जन्म: ७ एप्रिल १५०६).
  • १८८८: कार्ल झैस (ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट चे निर्माते, जन्म: ११ सप्टेंबर १८१६).
  • १८९४: आर. एल. स्टीव्हनसन (इंग्लिश लेखक व कवी, जन्म: १३ नोव्हेंबर १८५०).
  • १९५१: बहिणाबाई चौधरी (राठी कवयित्री, जन्म: ११ ऑगस्ट १८८०).
  • १९५६: माणिक बंदोपाध्याय (भारतीय लेखक, कवी आणि नाटककार, जन्म: १९ मे १९०८).
  • १९७९: मेजर ध्यानचंद (भारतीय हॉकीपटू, जन्म: २९ ऑगस्ट १९०५).
  • २०११: देव आनंद (हिंदी चित्रपट अभिनेते, जन्म: २६ सप्टेंबर १९२३).

३ डिसेंबर दिनविशेष



दिनविशेष        डिसेंबर महिन्यातील दिनविशेष
तारखेप्रमाणे #डिसेंबर महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०
११
१२
१३
१४
१५
१६
१७
१८
१९
२०
२१
२२
२३
२४
२५
२६
२७
२८
२९
३०
३१


२ टिप्पण्या

  1. मला whatsapp var कोनत्याही प्रकारचे अपडेट /नेटीफिगेशन मीळत नाही आहे माझा वाट्ससप नंबर ईमेल तूमच्या जवळ रजिस्टर आहे तरी पण
    प्लिज ते पूर्वरत चालू करन्यात यावे ही विनंती.
    wa.mo.9284598966
    1. काही तांत्रिक अडचनीमुळे ही सेवा काही काळासाठी बंद करण्यात आली होती, आता ही सेवा पुन्हा पुर्ववत करण्यात आली असुन तुम्ही या सेवेचा लाभ पुन्हा घेऊ शकता.

      सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी आम्हाला 9326052552 येथे START असा मेसेज पाठवावा.

      धन्यवाद!
स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.