२९ मे दिनविशेष

२९ मे दिनविशेष - [29 May in History] दिनांक २९ मे च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
हिराबाई बडोदेकर | Hirabai Barodekar

दिनांक २९ मे च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस


हिराबाई बडोदेकर - (२९ मे १९०५ - २० नोव्हेंबर १९८९) हिराबाई बडोदेकर या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील किराणा घराण्याच्या ख्यातनाम गायिका होत्या. किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक अब्दुल करीमखाँ आणि ताराबाई माने यांच्या त्या कन्या.

शेवटचा बदल २७ मे २०२१

जागतिक दिवस
२९ मे रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस

 • लोकशाही दिन: नायजेरिया.

ठळक घटना / घडामोडी
२९ मे रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी

 • १६६०: चार्ल्स दुसर्‍याची इंग्लंडच्या राजेपदी पुनर्स्थापना.
 • १७३३: क्वेबेक सिटीमध्ये गोर्‍या नागरिकांना स्थानिक लोकांना गुलाम करण्याची मुभा देण्यात आली.
 • १७९०: र्‍होड आयलंडने अमेरिकेचे संविधान मान्य केले व तेरावे राज्य झाले.
 • १८४८: विस्कॉन्सिन अमेरिकेचे तिसावे राज्य झाले.
 • १८६८: सर्बियाच्या राजकुमार मायकेल ओब्रेनोविचची बेलग्रेडमध्ये हत्या.
 • १९०३: सर्बियाच्या राजा अलेक्झांडर ओब्रेनोविच व राणी ड्रागाची बेलग्रेडमध्ये क्रना रुका या संघटनेने हत्या केली.
 • १९१४: आर.एम.एस. एम्प्रेस ऑफ आयर्लंड या बोटीला जलसमाधी. १,०३४ मृत्युमुखी.
 • १९१९: अल्बर्ट आइनस्टाइन यांच्या सामान्य सापेक्षता सिद्धांताची चाचणी घेण्यात आली.
 • १९५३: एडमंड हिलरी व तेनसिंग नोर्गे यांनी एव्हरेस्ट सर केले.
 • १९८५: पाय नसलेल्या स्टीव फोन्योने व्हिक्टोरिया, ब्रिटिश कोलंबिया येथे मॅरेथॉन शर्यत पूर्ण केली. ४२ कि.मी. अंतर पार करण्यास फॉन्योला चार महिने लागले.
 • १९९९: स्पेस शटल डिस्कव्हरी पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला जोडले गेले.

जन्म / वाढदिवस / जयंती
२९ मे रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १६३०: चार्ल्स दुसरे (इंग्लंडचे राजे).
 • १८७४: जी.के. चेस्टरटन (इंग्लिश लेखक).
 • १९०५: हिराबाई बडोदेकर (किराणा घराण्याच्या गायिका).
 • १९०६: टी. एच. व्हाईट (भारतीय-इंग्रजी लेखक)
 • १९१४: शेर्पा तेनसिंग नोर्गे (एव्हरेस्टवीर).
 • १९१७: जॉन एफ. केनेडी (अमेरिकेचे ३५ वे राष्ट्राध्यक्ष).
 • १९२९: पीटर हिग्ज (ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ).
 • १९५७: टेड लेव्हाइन (अमेरिकन अभिनेते).
 • १९५८: ऍनेट बेनिंग (अमेरिकन अभिनेत्री).

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
२९ मे रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १२५९: क्रिस्टोफर पहिले (डेन्मार्कचे राजा).
 • १४५३: कॉन्स्टन्टाईन नववे पॅलियोलोगस (शेवटचे बायझेंटाईन सम्राट).
 • १५००: बार्थोलोम्यू डायस (पोर्तुगीझ शोधक).
 • १९७२: पृथ्वीराज कपूर (हिंदी अभिनेते).
 • १९८७: चौधरी चरण सिंग (लोकदलाचे संस्थापक, भारताचे माजी पंतप्रधान)
 • १९९४: एरिक होनेकर (पूर्व जर्मनीचे राष्ट्राध्यक्ष).
 • २०२०: अजित जोगी (छत्तीसगढचे पहिले मुख्यमंत्री).

दिनविशेष        मे महिन्यातील दिनविशेष
तारखेप्रमाणे #मे महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०
११
१२
१३
१४
१५
१६
१७
१८
१९
२०
२१
२२
२३
२४
२५
२६
२७
२८
२९
३०
३१


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.