दिनांक ३० मे च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस
दीनानाथ दलाल - (३० मे १९१६ - १५ जानेवारी १९७१) दीनानाथ दलाल हे वाङ्मयीन पुस्तकांतील बोधचित्रांकरता, मुखपृष्ठांकरता ख्यातनाम झालेले मराठी चित्रकार होते. यांचे मूळ नाव नृसिंह दामोदर दलाल-नाईक होते परंतु पुढे दीनानाथ दलाल या नावाने ते प्रसिद्धीस आले.
शेवटचा बदल २८ मे २०२१
जागतिक दिवस
३० मे रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
- -
ठळक घटना / घडामोडी
३० मे रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी
- १४३१: फ्रांसच्या रुआ शहरात जोन ऑफ आर्कला जाळून मृत्यूदंड.
- १५७४: हेन्री तिसरा फ्रांसच्या राजेपदी.
- १६३५: प्रागचा तह.
- १६३१: पहिले फ्रेंच वृत्तपत्र गॅझेट डी फ्रान्सचे प्रकाशन झाले.
- १८१४: पॅरिसचा पहिला तह - नेपोलियन बोनापार्टला एल्बा येथे हद्दपारीची शिक्षा.
- १८५४: अमेरिकेच्या नेब्रास्का व कॅन्सस प्रांतांची रचना.
- १८८३: न्यू यॉर्कचा ब्रुकलिन ब्रिज पडणार असल्याची अफवा. चेंगराचेंगरीत १२ ठार.
- १९२२: वॉशिंग्टन डी.सी.त लिंकन मेमोरियल खुले.
- १९३४: मुंबई नभोवाणी केंद्राची सुरुवात.
- १९४२: दुसरे महायुद्ध - युनायटेड किंग्डमच्या १,००० विमानांनी जर्मनीच्या कोलोन शहरावर तुफान बॉम्बफेक केली.
- १९४८: अमेरिकेच्या ओरेगॉन राज्यातील कोलंबिया नदीची संरक्षक भिंत तुटली. व्हॅनपोर्ट शहर काही मिनिटांत उद्ध्वस्त.
- १९६७: नायजेरियाच्या बियाफ्रा राज्याने विभक्त होण्याचे ठरवले. गृहयुद्धास सुरुवात.
- १९७१: मरिनर ९चे प्रक्षेपण.
- १९७४: एअरबस ए-३०० विमानांची सेवा सुरू झाली.
- १९७५: युरोपियन स्पेस एजंसीची स्थापना झाली.
- १९८७: गोव्याला राज्याचा दर्जा देण्यात आला.
- १९९३: पु. ल. देशपांडे यांना त्रिदल’ संस्थेच्या वतीने पुण्यभूषण पुरस्कार प्रदान.
- १९९८: अफगाणिस्तानमध्ये रिश्टर मापनपद्धतीनुसार ६.६ तीव्रतेचा भूकंप. ५,००० ठार.
जन्म / वाढदिवस / जयंती
३० मे रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- १०१०: रेनझॉंग (चिनी सम्राट).
- १६७२: पीटर द ग्रेट (रशियाचे राजे / झार).
- १८९४: डॉ. पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर (इतिहासकार).
- १८९५: मॉरिस टेट (इंग्लिश क्रिकेट खेळाडू).
- १९०९: जॉर्ज हेडली (वेस्ट ईंडीझचे क्रिकेट खेळाडू).
- १९१६: दीनानाथ दलाल (लोकप्रिय व प्रतिभावान चित्रकार).
- १९५०: परेश रावल (भारतीय अभिनेते).
- १९८०: देवेन्द्र बार्नहार्ट (अमेरिकन संगीतकार).
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
३० मे रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- १४३१: जोन ऑफ आर्क (इंग्लंड-फ्रान्समधील युद्धाच्या वेळी फ्रेंच लोकांची एकजूट करून इंग्रजांविरुद्ध यशस्वी लढा देणारी एक थोर नायिका).
- १७४४: अलेक्झांडर पोप (इंग्लिश लेखक).
- १७७८: व्होल्तेर (फ्रेंच लेखक व तत्त्वज्ञानी).
- १९१२: विल्बर राइट (विमानाचे संशोधक असलेल्या राइट बंधूंपैकी एक).
- १९४१: प्रजाधिपोक / राम सातवे (थायलंडचे राजे).
- १९५०: देवदत्त रामकृष्ण भांडारकर (प्राच्यविद्या संशोधक).
- १९५५: नारायण मल्हार जोशी (भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक).
- १९६०: बोरिस पास्तरनाक (रशियन लेखक).
- १९६८: सावळाराम लक्ष्मण हळदणकर (मराठी चित्रकार).
- १९८९: दर्शनसिंहजी महाराज (शिख संतकवी).
- २००७: गुंटूर सेशंदर शर्मा (भारतीय कवी आणि समीक्षक).
दिनविशेष मे महिन्यातील दिनविशेष | |||||
---|---|---|---|---|---|
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ |
७ | ८ | ९ | १० | ११ | १२ |
१३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ |
२५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |
३१ |