१७ मे दिनविशेष

१७ मे दिनविशेष - [17 May in History] दिनांक १७ मे च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
गोविंद सखाराम सरदेसाई | Govind Sakharam Sardesai

दिनांक १७ मे च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस


गोविंद सखाराम सरदेसाई - (१७ मे १८६५ - २९ नोव्हेंबर १९५९).

शेवटचा बदल १६ मे २०२१

जागतिक दिवस
१७ मे रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस

 • जागतिक दूरसंचार दिन.
 • संविधान दिन: नॉर्वे.

ठळक घटना / घडामोडी
१७ मे रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी

 • १६७३: लुई जोलिये व जॉक मार्केटने मिसिसिपी नदीच्या आसपासच्या प्रदेशांचा शोध घेण्यास सुरुवात केली.
 • १७७५: अमेरिकन क्रांती - अमेरिकेने कॅनडाशी व्यापार बंद केला.
 • १७९२: न्यूयॉर्क शेअरबाजाराची स्थापना.
 • १८०२: नेपोलियन बोनापार्टने पोपची राष्ट्रे फ्रांसमध्ये समाविष्ट करून घेतली.
 • १८६५: आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ (ITU) स्थापन झाला.
 • १८७२: इंग्रज व मराठे यांच्यात सालबाईचा तह झाला.
 • १९४९: भारताचा राष्ट्रकुलामधे राहण्याचा निर्णय.
 • १९५४: अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने ब्राउन वि. टोपेका, कॅन्ससचे शिक्षण मंडळ या खटल्यात एकमताने निर्णय दिला की शाळांमधून वंशभेद करणे असंवैधानिक आहे.
 • १९७०: थॉर हायरडाल मोरोक्कोहून अटलांटिक महासागर पार करण्यासाठी रा २ या कागद व वनस्पतींपासून तयार केलेल्या नावेतून निघाला.
 • १९८०: विद्यार्थ्यांची निदर्शने रोखण्यासाठी दक्षिण कोरियात लश्करी कायदा लागू.
 • १९९०: जागतिक आरोग्य संघटनेने समलैंगिकता मानसोपचार रोगांच्या यादीतून काढून टाकले.
 • २००४: अमेरिकेतील पहिला कायदेशीर समलिंगी विवाह झाला.

जन्म / वाढदिवस / जयंती
१७ मे रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १७४९: एडवर्ड जेन्‍नर (देवीची लस शोधून काढणारे संशोधक व डॉक्टर).
 • १८६५: गोविंद सखाराम सरदेसाई (मुसलमानी काळापासून ब्रिटिश अमदानीपर्यंतचा महाराष्ट्राचा इतिहास लिहीणारे इतिहासकार रियासतकार, मृत्यू: २९ नोव्हेंबर १९५९).
 • १८६८: होरॅस डॉज (डॉज मोटर कंपनीचे संस्थापक).
 • १९३४: रॉनाल्ड वेन (ऍपल इन्क कंपनीचे सहसंस्थापक).
 • १९४५: भागवत चंद्रशेखर (भारतीय क्रिकेट खेळाडू).
 • १९५१: पंकज उदास (गझल गायक).
 • १९६६: कुसय हुसेन (सद्दाम हुसेन यांचा मुलगा).
 • १९६९: उजेश रणछोड (झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू).
 • १९७९: मुक्ता बर्वे (भारतीय अभिनेत्री).

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
१७ मे रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १७२७: कॅथेरिन पहिली (रशियाची साम्राज्ञी).
 • १८८६: जॉन डियर (अमेरिकन उद्योगपती).
 • १९७२: रघुनाथ कृष्ण फडके (शिल्पकार).
 • १९९६: रुसी शेरियर मोदी (कसोटी क्रिकेटपटू).
 • २०००: सज्जन (जुन्या जमान्यातील चित्रपट व नाट्य अभिनेते).
 • २००४: कमिला तय्यबजी (वकील, समाजसेविका).
 • २०१२: डोना समर (अमेरिकन गायिका).
 • २०१४: सी. पी. कृष्णन नायर (द लीला पॅलेस, हॉटेल्स अँड रिसॉर्ट्सचे स्थापक).
 • २०२०: रत्नाकर मतकरी (मराठी लेखक, रंगकर्मी, साहित्यिक, नाटककार).

दिनविशेष        मे महिन्यातील दिनविशेष
तारखेप्रमाणे #मे महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०
११
१२
१३
१४
१५
१६
१७
१८
१९
२०
२१
२२
२३
२४
२५
२६
२७
२८
२९
३०
३१


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.