६ मे दिनविशेष

६ मे दिनविशेष - [6 May in History] दिनांक ६ मे च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
६ मे दिनविशेष | 6 May in History

दिनांक ६ मे च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस


छत्रपती शाहू महाराज - (२६ जून १८७४ - ६ मे १९२२)

शेवटचा बदल ६ मे २०२१

जागतिक दिवस
 • हॉलोकॉस्ट स्मृति दिन: इस्राइल.
 • आंतरराष्ट्रीय ‘नो डाएट’ दिवस.

ठळक घटना / घडामोडी
 • १५४२: संत फ्रांसिस झेव्हिअर तत्कालीन पोर्तुगीज गोव्याची राजधानी ओल्ड गोवा येथे पोहोचला.
 • १६३२: मुघल सम्राट शाहजहान व आदिलशहा यांच्यामधे शहाजी महाराजांना पराभूत करण्याबद्दल तह झाला.
 • १७३९: चिमाजीअप्पा यांच्या नेतृत्त्वाखाली मराठ्यांनी वसई मोहीम जिंकून उत्तर कोकण मराठा साम्राज्यात आणले.
 • १८१८: राजधानी रायगड लढवत असताना शेवटच्या बाजीरावांच्या पत्‍नी वाराणशीबाई इंग्रजांकडून पराभूत झाल्या.
 • १८४०: पेनी ब्लॅक नावाचे जगातील पहिले टपाल तिकीट प्रसारित झाले.
 • १८८९: पॅरिसमधील आयफेल टॉवरचे उद्‍घाटन झाले.
 • १९४९: ईडीएसएसी पहिले इलेक्ट्रॉनिक डिजिटल संचयित संगणक सॉफ्टवेअर सुरु झाले.
 • १९५४: रॉजर बॅनिस्टर हे १ मैल चार मिनिटांच्या आत धावणारे पाहिले व्यक्ती ठरले.
 • १९८३: ॲडॉल्फ हिटलर यांच्या डायरीचा लबाडी म्हणून खुलासा केला गेला.
 • १९८४: कृत्रिम श्वसन न करता एव्हरेस्ट पादाक्रांत करणारा फू दोरजी हे पहिले भारतीय ठरले.
 • १९९४: इंग्लिश खाडी खालून जाण‍ाऱ्या आणि इंग्लंड फ्रान्स यांना जोडण‍ाऱ्या युरो टनेलचे इंग्लंडची राणी एलिझाबेथ (दुसऱ्या) आणि फ्रान्सचे अध्यक्ष फ्रॅंकॉइस मित्रॉं यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले.
 • १९९७: बॅंक ऑफ इंग्लंडला स्वायत्तता देण्यात आली.
 • १९९९: महाराष्ट्र राज्यातील सर्व कृषी विद्यापीठात महिलांसाठी तीस टक्के आरक्षणाचा निर्णय घेण्यात आला.
 • २००१: पोप जॉन पॉल (दुसरे) यांनी सिरीयातील एका मशिदीस भेट दिली. मशिदीस भेट देणारे ते पहिलेच पोप होत.
 • २००२: भूपिंदर नाथ किरपाल यांनी भारताचे ३१ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
 • २०१५: सलमान खान यांना सदोष मनुष्यवधाच्या आरोपास दोषी ठरवून ५ वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच सलमान खान यांची हायकोर्टात अपील दाखल करून जामिनावर सुटका.

जन्म / वाढदिवस

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
 • १५८९: तानसेन, अकबराच्या दरबारातील एक नवरत्‍न रामतनू पांडे ऊर्फ मोहमाद आट्टा खान तथा संगीतसम्राट.
 • १८६२: हेन्‍री थोरो, अमेरिकन लेखक व विचारवंत.
 • १९२२: छत्रपती शाहू महाराज, सामाजिक सुधारणांचे कृतिशील पुरस्कर्ते, कला, नाटक, संगीत यांचे प्रोत्साहक.
 • १९४६: भुलाभाई देसाई, स्वातंत्र्यसेनानी व कायदेपंडित, त्यांनी होमरुल चळवळीतील कार्यकर्ते.
 • १९५२: मारिया मॉंटेसरी, इटालियन डॉक्टर शिक्षणतज्ञ.
 • १९६६: रॅंगलर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे, उदारमतवादी समाजसुधारक, नेमस्त पुढारी आणि शिक्षणज्ज्ञ.
 • १९९५: आचार्य गोविंदराव गोसावी, प्रवचनकार, संत वाङ्‍मयाचे गाढे अभ्यासक, हैदराबाद मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक.
 • १९९९: कृष्णाजी शंकर हिंगवे, पुणे विद्यापीठातील जयकर ग्रंथालयाचे पहिले ग्रंथपाल व संस्थापक सदस्य.

दिनविशेष        मे महिन्यातील दिनविशेष
तारखेप्रमाणे #मे महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०
११
१२
१३
१४
१५
१६
१७
१८
१९
२०
२१
२२
२३
२४
२५
२६
२७
२८
२९
३०
३१


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.