दिनांक ३१ मे च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस
अहिल्याबाई होळकर - (३१ मे १७२५ - १३ ऑगस्ट १७९५).
शेवटचा बदल २८ मे २०२१
जागतिक दिवस
३१ मे रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
- जागतिक तंबाखूसेवन विरोधी दिन.
- स्वातंत्र्य दिन: दक्षिण आफ्रिका.
ठळक घटना / घडामोडी
३१ मे रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी
- १७५९: अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया प्रांतात नाटकांवर बंदी.
- १७९०: अमेरिकेत १७९०चा कॉपीराईट कायदा लागू.
- १८८४: जॉन हार्वे केलॉगने कॉर्न फ्लेक्सचा पेटंट मिळवला.
- १८८९: जॉन्सटाउनचा पूर - अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया राज्यातील कॉनेमॉ सरोवरावरचा बांध फुटला. जॉन्सटाउन शहरात ६० फूट पाणी. २,००० ठार.
- १९१०: दक्षिण आफ्रिकेला स्वातंत्र्य.
- १९१३: अमेरिकेच्या संविधानातील १३वा बदल संमत.
- १९२४: सोवियेत संघाने बाह्य मोंगोलियावरील चीनचे आधिपत्य मान्य केले.
- १९२७: फोर्ड मोटर कंपनीची मॉडेल टी प्रकारची शेवटची कार तयार झाली. या प्रकारच्या एकूण १,५०,०७,००३ कार तयार केल्या गेल्या.
- १९४२: दुसरे महायुद्ध - जपानच्या पाणबुड्यांनी सिडनीवर हल्ला केला.
- १९५२: जनरल ड्वाइट डी. आयझेनहॉवर अमेरिकन सैन्यातून निवृत्त.
- १९५२: संगीत नाटक अकादमी ची स्थापना.
- १९६१: दक्षिण आफ्रिका प्रजासत्ताक झाले.
- १९६२: वेस्ट ईंडीझ संघाचे विघटन.
- १९७०: पेरू मध्ये भूकंप. डोंगर कोसळून युंगे गाव नष्ट. ४७,००० ठार.
- १९९०: नेल्सन मंडेला यांना लेनिन आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार जाहीर.
- १९९२: प्रख्यात गुजराती कवी हरिंद्र दवे यांना १९९१ चा कबीर सन्मान मध्य प्रदेश सरकारकडून जाहीर.
- २००५: वॉटरगेट कुभांड - डब्ल्यु. मार्क फेल्टने आपणच डीप थ्रोट नावाने ओळखला जाणारा गुप्त बातमीदार असल्याचे कबूल केले.
जन्म / वाढदिवस / जयंती
३१ मे रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- १५५७: फियोदोर पहिला (रशियाचा झार).
- १६४०: मिकाल विस्नियोवीकी (पोलंडचा राजा).
- १६८३: जीन पियरे क्रिस्टिन (सेल्सियस थर्मामीटरचे संशोधक).
- १७२५: अहिल्याबाई होळकर (पुण्यश्लोक महाराणी).
- १८५२: फ्रान्सिस्को मोरेनो (आर्जेन्टिनाचा शोधक).
- १९१०: भा. रा. भागवत (मराठी बालसाहित्यकार आणि विज्ञान कथाकार).
- १९२१: सुरेश हरिप्रसाद जोशी (आधुनिक गुजरातीतील प्रसिद्ध कवी).
- १९२८: पंकज रॉय (भारतीय क्रिकेट खेळाडू).
- १९३०: क्लिंट ईस्टवूड (अमेरिकन अभिनेता, चित्रपट निर्माता, दिग्दर्शक).
- १९३१: जॉन रॉबर्ट श्रीफर (अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ).
- १९३८: जॉन प्रेस्कॉट (युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान).
- १९३८: विश्वनाथ भालचंद्र / वि. भा. देशपांडे (नाट्यसमीक्षक).
- १९६६: रोशन महानामा (श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू).
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
३१ मे रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- १४०८: आशिकागा योशिमित्सु (जपानी शोगन).
- १४१०: मार्टिन पहिला (अरागॉनचा राजा).
- १७९९: पिएर लेमॉनिये (फ्रेंच अंतरिक्षशास्त्रज्ञ).
- १८७४: भाऊ दाजी लाड (प्राच्यविद्यापंडित आणि समाजसेवक).
- १९१०: डॉ. एलिझाबेथ ब्लॅकवेल (वैद्यकशास्त्रातील पहिली महिला पदवीधर).
- १९६२: एडॉल्फ आइकमन (नाझी अधिकारी).
- १९७३: दिवाकर कृष्ण केळकर (कथालेखक).
- १९९४: पंडित सामताप्रसाद (बनारस घराण्याचे नामवंत तबलावादक).
- २००२: सुभाष गुप्ते (भारतीय क्रिकेट खेळाडू, लेग स्पिनर गोलंदाज, त्रिनिदाद येथे).
- २००३: अनिल बिस्वास (प्रतिभासंपन्न संगीतकार).
दिनविशेष मे महिन्यातील दिनविशेष | |||||
---|---|---|---|---|---|
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ |
७ | ८ | ९ | १० | ११ | १२ |
१३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ |
२५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |
३१ |