२२ मे दिनविशेष - [22 May in History] दिनांक २२ मे च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
दिनांक २२ मे च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस
TEXT - TEXT
शेवटचा बदल २३ मे २०२१
जागतिक दिवस
२२ मे रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
- राष्ट्र दिन: यमन.
- जागतिक जैवविविधता दिन.
ठळक घटना / घडामोडी
२२ मे रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी
- ११७६: इराकी सम्राट सलाद्दीन वर खूनी हल्ला.
- १७६२: स्वीडन आणि प्रशियामधे हॅम्बुर्गचा तह झाला.
- १८०७: अमेरिकेत ज्युरीने भूतपूर्व उपाध्यक्ष एरन बरवर देशद्रोहाचा आरोप ठेवला.
- १८५६: अमेरिकन कॉंग्रेसमध्ये गुलामगिरी विरुद्ध भाषण केल्या बद्दल मॅसेच्युसेट्सच्या सेनेटर चार्ल्स सम्नरला दक्षिण कॅरोलिनाच्या सेनेटर प्रेस्टन ब्रूक्सने कॉंग्रेसच्या आवारातच छडीने चोप दिला.
- १९०६: अथेन्समध्ये तिसरे ऑलिंपिक खेळ सुरु. काही काळानंतर यांची अधिकृत खेळ म्हणून मान्याता काढून घेण्यात आली.
- १९०६: राइट बंधूंना त्यांच्या उडणाऱ्या यंत्रासाठी पेटंट देण्यात आला.
- १९१५: स्कॉटलंडच्या ग्रेटना ग्रीन शहराजवळ चार रेल्वे गाड्यांची एकमेकांस धडक. २२७ ठार, २४६ जखमी.
- १९३६: आयर्लंडची राष्ट्रीय एरलाईन एर लिंगसची स्थापना.
- १९३९: जर्मनी व इटलीत पोलादी तह.
- १९६०: चिली देशात आजतगायत नोंदण्यात आलेला सगळ्यात तीव्र भूकंप झाला. रिश्टर मापनपद्धतीनुसार याची तीव्रता ९.५ होती.
- १९६१: हुंडाबंदी विधेयकाला राष्ट्रपतींची संमती मिळून हुंडाबंदी कायदा अस्तित्त्वात आला.
- १९७२: सिलोनने नवीन राज्यघटना स्वीकारुन ते प्रजासत्ताक बनले. त्या देशाचे श्रीलंका असे नामकरण झाले आणि त्याने राष्ट्रकुल देशांत प्रवेश केला.
- १९७२: श्रीलंकेने नवीन संविधान अंगिकारले.
- १९८७: मेरठ जिल्ह्यात हाशिमपूरा हत्याकांड झाले.
- १९९०: उत्तर यमन व दक्षिण यमन यमनचे प्रजासत्ताक या नावाने एकत्र झाले.
- २००४: अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील हलाम या गावात एफ.४ टोर्नेडो. ४ कि.मी. रुंदी असलेल्या या टोर्नेडोने सगळे गाव नेस्तनाबूद केले. आधीच धोक्याची सूचना मिळाल्यामुळे फक्त एक नागरिक ठार.
- २००४: भारताचे पंतप्रधान म्हणून मनमोहन सिंग यांचा शपथविधी.
- २००९: भारताचे पंतप्रधान म्हणून मनमोहन सिंग यांचा दुसऱ्यांदा शपथविधी.
- २०११: अमेरिकेच्या मिसूरी राज्यातील जॉपलिन शहरात एफ.५ टोर्नेडो. २ कि.मी. रुंदी असलेल्या या टोर्नेडोने अर्धे शहर नेस्तनाबूद केले. वीस मिनिटांपूर्वी धोक्याची सूचना मिळूनही ११६ ठार.
- २०११: पाकिस्तानच्या कराची शहरातील पी.एन.एस. मेहरान या नाविकी तळावर तालिबान आणि बलूची अतिरेक्यांनी हल्ला चढवला. सोळा सैनिक आणि सहा अतिरेकी ठार. पाकिस्तानच्या अनेक लढाऊ आणि सर्वेक्षक विमानांचे नुकसान.
- २०१५: आयर्लंड देश सार्वजानिक जनमतदानंतर समलिंगी विवाहाला कायदेशीर ठरवण्यासाठी जगातील पहिला देश बनला.
जन्म / वाढदिवस / जयंती
२२ मे रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- १४०८: अन्नामचार्य, हिंदू संत.
- १६८८: अलेक्झांडर पोप, इंग्लिश कवी.
- १७७२: राजा राममोहन रॉय, आधुनिक भारतातील अग्रगण्य धर्मसुधारक, समाजसुधारक आणि ब्राह्मो समाज संस्थापक.
- १७८३: विल्यम स्टर्जन, विद्युत चुंबक आणि विद्युत मोटर चे शोधक.
- १८१३: रिचर्ड वॅग्नर, जर्मन संगीतकार.
- १८५९: सर आर्थर कोनन डॉयल, इंग्लिश लेखक व डॉक्टर.
- १८७१: विष्णू वामन बापट, संस्कृत-मराठी अनुवादक.
- १९०५: बोडो वॉन बोररी, इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाचे सहसंशोधक.
- १९०७: सर लॉरेन्स ऑलिव्हिये, इंग्लिश अभिनेता व चित्रपट दिग्दर्शक.
- १९४०: इरापल्ली प्रसन्ना, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९४८: नेदुमुदी वेणू , भारतीय अभिनेता आणि पटकथालेखक.
- १९५९: मेहबूबा मुफ्ती, भारतीय राजकारणी.
- १९८४: डस्टिन मॉस्कोविट्झ, फेसबुकचे सह-संस्थापक.
- १९८७: नोव्हान जोकोव्हिच, सर्बियाचा टेनिस खेळाडू.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
२२ मे रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- ३३७: कॉन्स्टन्टाईन, रोमन सम्राट.
- १५४५: शेरशाह सूरी, भारतीय शासक.
- १८०२: मार्था वॉशिंग्टन, अमेरिकेची पहिली फर्स्ट लेडी.
- १८८५: व्हिक्टर ह्यूगो, जागतिक कीर्तीचे फ्रेन्च कादंबईकार, कवी आणि लेखक.
- १९९१: श्रीपाद अमृत डांगे, भारतीय साम्यवादी नेता व कामगार पुढारी.
- १९९५: रविंद्र बाबुराव मेस्त्री, चित्रकार व शिल्पकार.
- १९९८: डॉ. मधुकर आष्टीकर, लेखक, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष.
- २००३: डॉ. नित्यनाथ ऊर्फ नीतू मांडके भारतीय हृदयरोगतज्ञ.
दिनविशेष मे महिन्यातील दिनविशेष | |||||
---|---|---|---|---|---|
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ |
७ | ८ | ९ | १० | ११ | १२ |
१३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ |
२५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |
३१ |