९ मे दिनविशेष

९ मे दिनविशेष - [9 May in History] दिनांक ९ मे च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
पंडित फिरोज दस्तूर | Pandit Firoz Dastur

दिनांक ९ मे च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस


पंडित फिरोज दस्तूर - (३० सप्टेंबर १९१९ – ९ मे २००८) किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक ‘पंडित फिरोज दस्तूर’ यांना सवाईगंधर्व यांनी संगीताचे शिक्षण दिले होते. ‘पंडित फिरोज दस्तूर’ यांची संगीत क्षेत्रातील कारकीर्द १९३० च्या दरम्यान असुरू झाली होती तसेच त्यांनी भारतीय चित्रपट सृष्टीत अभिनेता म्हणून देखील काम केले आहे.

शेवटचा बदल ९ मे २०२१

९ मे रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
 • जागतिक थॅलेसेमिया दिन
 • मे महिन्यातला दुसरा रविवार: आंतरराष्ट्रीय मातृदिन
 • विजय दिन: रशिया व भूतपूर्व सोवियेत संघातील राष्ट्रे.
 • युरोप दिन: युरोपीय संघ.
 • मुक्ति दिन: जर्सी, गर्न्सी व ईतर चॅनेल द्वीपे.
 • स्वातंत्र्य दिन: रोमानिया.

९ मे रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी
 • १५०२: क्रिस्टोफर कोलंबस आपल्या चौथ्या व अखेरच्या सफरीवर नव्या जगाकडे निघाला.
 • १६७१: थॉमस ब्लडने टॉवर ऑफ लंडनमधून खजिना लुटण्याचा प्रयत्न केला.
 • १८६८: अमेरिकेच्या नेव्हाडा राज्यातील रिनो शहराची स्थापना.
 • १८७४: मुंबईत घोड्याने ओढलेल्या ट्राम सुरू.ट्राम ओढण्यासाठी आणलेल्या विलायती घोड्यांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून त्यांना टोप्या घालत असत. ही ट्रामसेवा सुमारे ३१ वर्षे सुरू होती.
 • १९०४: वाफेवर चालणारे सिटी ट्रुरो हे इंजिन १६० कि.मी / ताशी पेक्षा जास्त वेगाने धावणारे यूरोपमधील पहिले इंजिन बनले.
 • १९६०: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या विकण्यास परवानगी.
 • १९९४: नेल्सन मंडेला दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी.
 • १९९९: अटलांटा ग्रांप्री नेमबाजी स्पर्धेत भारताच्या रुपी उन्नीकृष्णनने प्रोन गटात रौप्यपदक पटकाविले.
 • २००१: जगातील सर्वात लांब घरगुती वापराच्या गॅसची लाइन जामनगरपासून लोणीपर्यंत घालण्यात आली. याची लांबी १२४० किलोमीटर आहे.
 • २००२: भारतातील अभिमत विद्यापीठांची संख्या ५५ पर्यंत पोहोचली.
 • २००६: तास्मानियात खाणीतील अपघातानंतर १४ दिवस जमिनीखाली अडकलेल्या दोन कामगारांची सुटका.

९ मे रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
 • १५४०: महाराणा प्रताप, मेवाडचे सम्राट.
 • १८१४: दादोबा पांडुरंग तर्खडकर, इंग्लिश व्याकरणकार, ग्रंथकार.
 • १८६६: गोपाळ कृष्ण गोखले, भारतीय स्वातंत्र्यसेनानी, मराठी समाजसुधारक.
 • १८८६: केशवराव मारुतराव जेधे, स्वातंत्र्यसैनिक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक प्रमुख नेते, शेतकरी कामगार पक्षाचे एक संस्थापक.
 • १९२८: वसंत नीलकंठ गुप्ते, मराठी कामगार चळवळ कार्यकर्ते, लेखक.

९ मे रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
 • १३३८: चोखा मेळा, भगवद्‍भक्त.
 • १९१७: कान्होबा रणझोडदास, डॉक्टर, कवी व शास्त्रज्ञ.
 • १९१९: नारायण वामन टिळक, रेव्हरंड.
 • १९३१: अल्बर्ट मायकेलसन, वर्णपटाद्वारे प्रकाशाच्या मापनासंबंधीच्या शोधासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे जर्मन-अमेरिकन पदार्थवैज्ञानिक.
 • १९५९: कर्मवीर भाऊराव पाटील, मराठी शिक्षणतज्ञ.
 • १९८१: डॉ. केशव नारायण वाटवे, संस्कृतज्ञ, मराठी कवी. रसविमर्श, संस्कृत काव्याचे पंचप्राण, पाच मराठी कवी, संस्कृत सुबोधिनी (भाग १ ते ३), संस्कृत मुक्तहार (भाग १ ते ३) ईत्यादी पुस्तके त्यांनी लिहिली.
 • १९८६: तेनझिंग नॉर्गे, नेपाळी शेरपा; एडमंड हिलरी बरोबर एव्हरेस्ट सर करणारा प्रथम माणूस.
 • १९९५: अनंत माने, दिग्दर्शक.
 • १९९८: तलत मेहमूद, पार्श्वगायक, अभिनेते आणि गझलचे बादशहा .
 • १९९९: करमसीभाई जेठाभाई सोमय्या, उद्योगपती.
 • २००८: पंडित फिरोज दस्तूर, किराणा घराण्याचे शास्त्रीय गायक.
 • २०१४: नेदुरुमल्ली जनार्दन रेड्डी, भारतीय राजकारणी.

दिनविशेष        मे महिन्यातील दिनविशेष
तारखेप्रमाणे #मे महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०
११
१२
१३
१४
१५
१६
१७
१८
१९
२०
२१
२२
२३
२४
२५
२६
२७
२८
२९
३०
३१


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.