२६ जून दिनविशेष

२६ जून दिनविशेष - [26 June in History] दिनांक २६ जून च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
२६ जून दिनविशेष | 26 June in History

दिनांक २६ जून च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस


TEXT - TEXT.

शेवटचा बदल २५ जून २०२१

जागतिक दिवस
२६ जून रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस

 • ध्वज दिन: रोमेनिया.
 • स्वातंत्र्य दिन: मादागास्कर, सोमालिया.

ठळक घटना / घडामोडी
२६ जून रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी

 • १४८३: रिचर्ड तिसरा इंग्लंडच्या राजेपदी.
 • १७२३: रशियन सैन्याने अझरबैजानची राजधानी बाकु जिंकली.
 • १८०७: लक्झेम्बर्गमध्ये गोदामावर वीज पडून २३० ठार.
 • १८१९: सायकलचा पेटंट देण्यात आला.
 • १९०६: पहिली ग्रांड प्रिक्स मोटर रेस स्पर्धा आयोजित करण्यात आली.
 • १९२४: अमेरिकेच्या सैन्याने डॉमिनिकन प्रजासत्ताकमधून माघार घेतली.
 • १९४५: सान फ्रान्सिस्कोमध्ये संयुक्त राष्ट्रांचे संविधान जाहीर झाले.
 • १९४८: सोवियेत संघाने बर्लिनची रसद कापल्यावर अमेरिकेने विमानाद्वारे रसद कायम केली.
 • १९५९: अमेरिकेतील सेंट लॉरेन्स सी वे खुला झाला.
 • १९५९: स्वीडिश बॉक्सर इंगेमेर जोहान्सन हे हेव्ही वेट बॉक्सिंगचे जागतिक विजेते झाले.
 • १९६०: सोमालियाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
 • १९६०: मादागास्करला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
 • १९६३: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडीने मी बर्लिनचा एक नागरिक आहे (इश बिन आइन बर्लिनेर) असे जाहीर केले.
 • १९६८: पुणे येथे बालगंधर्व रंगमंदिराचे उद्घाटन झाले.
 • १९७३: सोवियेत संघातील प्लेसेत्स्क कॉस्मोड्रोम या उपग्रह प्रक्षेपणतळावर कॉसमॉस ३-एम. प्रकारच्या रॉकेटचा स्फोट. ९ ठार.
 • १९७४: ओहायो अमेरिका येथील एका सुपर मार्केटमधे वस्तुंवर बार कोड लावण्यास सुरूवात झाली.
 • १९७४: नागपुरजवळील कोराडी येथील (त्याकाळच्या) सर्वात मोठया वीजनिर्मितीकेंद्रातून वीजनिर्मितीला प्रारंभ झाला.
 • १९७५: सुरक्षिततेसाठी राष्ट्रपति फक्रुद्दिन अली अहमद यांनी भारतात आणीबाणी घोषीत केली.
 • १९७५: तत्कालीन भारतीय राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांनी आणीबाणी जारी केली.
 • १९७६: कॅनडातील टोरोंटो शहरातील सी.एन. टॉवर खुला.
 • १९७७: एल्व्हिस प्रेस्लीचा शेवटचा जाहीर कार्यक्रम.
 • १९७८: एर कॅनडा फ्लाइट १८९ हे डी.सी.९ प्रकारचे विमान टोरोंटो येथे उड्डाण करताना कोसळले. २ ठार.
 • १९७९: मुष्टियोद्धा मुहम्मद अलीने निवृत्ती घेतली.
 • १९९९: नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्याचे विभाजन, माहूर हा नवा तालुका निर्माण करण्यात आला.
 • १९९९: शिवाजी राजांची मुद्रा असलेले रुपयांचे नाणे चलनात आले.
 • २०००: पी. बंदोपाध्याय हवाईदलातील पहिल्या महिला एअर कमोडोर बनल्या.

जन्म / वाढदिवस / जयंती
२६ जून रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १६९४: जॉर्ज ब्रांड्ट (स्वीडिश रसायनशास्त्रज्ञ, मृत्यु: २९ एप्रिल १७६८).
 • १७३०: चार्ल्स मेसिअर (फ्रेंच खगोलशास्त्रज्ञ, मृत्यू: १२ एप्रिल १८१७).
 • १८२४: लॉर्ड केल्व्हिन (इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ, मृत्यू: १७ डिसेंबर १९०७).
 • १८७३: अँजेलिना येओवार्ड ऊर्फ गौहर जान (गायिका व नर्तिका, मृत्यू: १७ जानेवारी १९३०).
 • १८७४: राजर्षी शाहू महाराज (भारतीय समाजसुधारक व कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती, मृत्यू: ६ मे १९२२).
 • १८८८: नारायण श्रीपाद राजहंस तथा बालगंधर्व (विख्यात संगीतनाट्य गायक आणि नट, मृत्यू: १५ जुलै १९६७).
 • १८९२: पर्ल एस. बक (अमेरिकन कादंबरीकार, मृत्यू: ६ मार्च १९७३).
 • १९१४: शापूर बख्तियार (इराणचे ७४ वे पंतप्रधान, मृत्यू: ६ ऑगस्ट १९९१).
 • १९५१: गॅरी गिल्मोर (ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू, मृत्यू: १० जून २०१४).

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
२६ जून रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • ३६३: ज्युलियन (रोमन सम्राट, जन्म: ३३१).
 • १८१०: जोसेफ-मायकेल मॉन्टगॉल्फर (हॉट एअर बलून चे सहसंशोधक, जन्म: २६ ऑगस्ट १७४०).
 • १९४३: कार्ल लॅन्ड्स्टायनर (नोबेल पारितोषिक विजेते जीवशास्त्रज्ञ, जन्म: १४ जून १८६८).
 • १९८०: गोविंद मोरेश्वर तथा आप्पा पेंडसे (मराठी पत्रकार).
 • २००१: वसंत पुरुषोत्तम ऊर्फ व. पु. काळे (लेखक व कथाकथनकार, जन्म: २५ मार्च १९३२).
 • २००४: यश जोहर (भारतीय चित्रपट निर्माते, जन्म: ६ सप्टेंबर १९२९).
 • २००५: एकनाथ सोलकर (अष्टपैलू क्रिकेटपटू, जन्म: १८ मार्च १९४८).

जून महिन्यातील दिनविशेष
तारखेप्रमाणे #जून महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०
११
१२
१३
१४
१५
१६
१७
१८
१९
२०
२१
२२
२३
२४
२५
२६
२७
२८
२९
३०


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.