१६ जून दिनविशेष

१६ जून दिनविशेष - इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक १६ जून चे दिनविशेष.
१६ जून दिनविशेष | 16 June in History

दिनांक १६ जून च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस


TEXT - TEXT.

शेवटचा बदल १५ जून २०२१

जागतिक दिवस
१६ जून रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस

 • -

ठळक घटना / घडामोडी
१६ जून रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी

 • १७७९: स्पेनने ग्रेट ब्रिटनविरुद्ध युद्ध पुकारले व जिब्राल्टरला वेढा घातला.
 • १८४६: पोप पायस नववा पोपपदी.
 • १८५८: अठराशे सत्तावनच्या संग्रामातील मोरारची लढाई.
 • १८९१: जॉन ऍबट कॅनडाच्या पंतप्रधानपदी.
 • १९०३: फोर्ड मोटर कंपनीची स्थापना.
 • १८४६: पोप पायस बाराव्याने हुआन पेरॉनला वाळीत टाकले.
 • १९१४: सहा वर्षांच्या तुरुंगवासातून ‘लोकमान्य टिळक’ यांची सुटका.
 • १९४७: नव्या, कल्पक उद्योजकांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने म. स. तथा बाबुराव पारखे यांनी मराठा चेंबरच्या वतीने कै. गो. स. पारखे औद्योगिक पारितोषिक देण्यास सुरुवात केली.
 • १९६३: व्हॅलेन्तिना तेरेश्कोवा पहिली स्त्री अंतराळयात्री झाली.
 • १९७६: दक्षिण आफ्रिकेच्या सोवेटो शहरात दंगलखोरांवर पोलिसांचा गोळीबार ५६६ विद्यार्थी ठार.
 • १९७७: ऑरेकल कॉर्पोरेशनची सॉफ्टवेर डेव्हलपमेंट लॅबोरेटरीझ नावाने स्थापना.
 • १९९०: मुंबई उपनगरात दिवसभरातील सर्वाधिक वृष्टी झाली. १०४ वर्षातील एका दिवसात ६००.४२ मिमि पावसाचा उच्चांक.
 • १९९४: चीनचे तुपोलेव तू-१५४ (Tupolev Tu-154) प्रकारचे विमान कोसळले त्यात १६० ठार प्रवासी ठार झाले.
 • २०१०: तंबाखूवर पूर्णपणे बंदी करणारा भूतान हा जगातील पहिला देश बनला.

जन्म / वाढदिवस / जयंती
१६ जून रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १७२३: अ‍ॅडम स्मिथ (स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ आणि तत्त्ववेत्ता, मृत्यू: १७ जुलै १७९०).
 • १९२०: हेमंत कुमार मुखोपाध्याय (गायक, संगीतकार आणि निर्माता, मृत्यू: २६ सप्टेंबर १९८९).
 • १९३६: अखलाक मुहम्मद खान / शहरयार (प्रसिद्ध ऊर्दू कवी, मृत्यू: १३ फेब्रुवारी २०१२).
 • १९५०: मिथुन चक्रवर्ती (भारतीय अभिनेते).
 • १९९४: आर्या आंबेकर (प्रसिद्ध मराठी गायिका).

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
४ जून रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १८६९: चार्ल्स स्टर्ट (भारतीय-इंग्रजी वनस्पतीशास्त्रज्ञ व संशोधक, जन्म: २८ एप्रिल १७९५).
 • १९२५: देशबंधू चित्तरंजन दास (बंगालमधील विख्यात कायदेपंडित आणि स्वातंत्र्यसेनानी, जन्म: ५ नोव्हेंबर १८७०).
 • १९३०: एल्मर अ‍ॅम्ब्रोज स्पीरी (गॅरोकोम्पास चे सहसंशोधक, जन्म: १२ ऑगस्ट १८६०).
 • १९४४: मास्टर ऑफ नायट्रेटस उर्फ आचार्य प्रफुल्लचंद्र रे (भारतीय रसायनशास्त्रज्ञ, जन्म: २ ऑगस्ट १८६१).
 • १९७१: जॉन रीथ (बीबीसी चे सह-संस्थापक, जन्म: २० जुलै १८८९).
 • १९७७: श्रीपाद गोविंद नेवरेकर (मराठी रंगभूमीवरील गायक-नट, जन्म: ३ जुलै १९१२)
 • २०२०: हरिभाऊ माधव जावळे (भारतीय राजकारणी, जन्म: १ जून १९५३).


संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा

जून महिन्यातील दिनविशेष

नवी नोंद सुचवा · चूक कळवा · संदर्भांची यादी · अस्वीकरण

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.