दिनांक १८ जून च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस
TEXT - TEXT.
शेवटचा बदल १९ जून २०२१
जागतिक दिवस
१८ जून रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
- राष्ट्र दिन: सेशेल्स.
- वॉटरलू दिन: युनायटेड किंग्डम.
- आंतरराष्ट्रीय सहल दिवस
ठळक घटना / घडामोडी
१८ जून रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी
- १७६७: सॅम्युएल वॉलिस ताहितीला पोचणारा पहिला युरोपीय झाला.
- १७७८: अमेरिकन क्रांती - ब्रिटिश सैन्याने फिलाडेल्फियातून पळ काढला.
- १८१२: १८१२चे युद्ध - अमेरिकेने युनायटेड किंग्डमविरुद्ध युद्ध पुकारले.
- १८१५: वॉटर्लूच्या युद्धानंतर नेपोलियन बोनापार्टने फ्रांसचे राज्य सोडले.
- १८३०: फ्रान्सने अल्जीरिया ताब्यात घेतले.
- १९००: चीनने देशातील बाल-स्त्रीयांसकट सगळ्या परदेशी व्यक्तींना ठार मारण्याचा हुकुम सोडला
- १९०८: ७८१ जपानी व्यक्ती पेरूच्या किनाऱ्यावर पोचले.
- १९०८: फिलीपाइन्स विश्वविद्यालाची (University of the Philippines) ची स्थापना झाली.
- १९३०: चीनचा सम्राट डोवागर लोंग्यू याने देशातील सर्व परदेशी व्यक्तींना ठार करण्याचा हुकूम दिला.
- १९४६: डॉ. राममनोहर लोहिया यांनी गोव्याच्या मडगाव शहरातून गोवा मुक्तीचे रणशिंग फुंकले.
- १९५३: इजिप्त प्रजासत्ताक झाले.
- १९५३: अमेरिकेचे सी.-१२४ प्रकारचे विमान टोक्योजवळ कोसळले. १२९ ठार.
- १९५६: रँग्लर र. पु. परांजपे पुणे विद्यापीठाचे दुसरे कुलगुरू झाले.
- १९७९: अमेरिका व सोवियेत संघात सॉल्ट २ तह.
- १९८१: जनावरांमधे आढळणार्या लाळ्या-खुरकुत (Foot and Mouth Disease) रोगावरील पहिली जनुकीय लस विकसित झाली.
- १९८३: अंतराळवीर सैली राइड या अंतराळात प्रवास करणाऱ्या पहिल्या अमेरिकन महिला आहेत.
- १९८३: सॅली राइड पहिली अमेरिकन महिला अंतराळयात्री झाली.
- २००६: कॅझसॅट या कझाकस्तानच्या पहिल्या उपग्रहाचे प्रक्षेपण.
- २०१३: भारताच्या उत्तराखंड राज्यात मुसळधार पाउस पडून मंदाकिनी व अलकनंदा नद्यांना महापूर. शेकडो मृत्युमुखी, हजारो बेघर.
जन्म / वाढदिवस / जयंती
१८ जून रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- १८९९: शंकर त्रिंबक / दादा धर्माधिकारी (स्वातंत्र्यसेनानी व समाजसुधारक, मृत्यू: १ डिसेंबर १९८५).
- १९३१: के. एस. सुदर्शन (प्रखर राष्ट्रवादी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ५ वे सरसंघचालक, मृत्यू: १५ सप्टेंबर २०१२).
- १९४२: थाबो म्बेकी (दक्षिण अफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष).
- १९४२: पॉल मॅकार्टनी (संगीतकार, संगीतसंयोजक, वादक, गीतलेखक, बीटल्स चे सदस्य).
- १९६५: उदय हुसेन (सद्दाम हुसेन यांचा मुलगा, मृत्यू: २२ जुलै २००३).
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
१८ जून रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- १८५८: मणिकर्णिका तांबे / राणी लक्ष्मीबाई (झाशीच्या राणी, जन्म: १९ नोव्हेंबर १८२८).
- १९०१: रामचंद्र भिकाजी गुंजीकर (विविध ज्ञानविस्तार या मासिकाचे संपादक, जन्म: १० एप्रिल १८४३).
- १९०२: सॅम्युअल बटलर (इंग्लिश लेखक, जन्म: ४ डिसेंबर १८३५).
- १९३६: मॅक्झिम गॉर्की (रशियन लेखक, जन्म: २८ मार्च १८६८).
- १९५८: डग्लस जार्डिन (इंग्लिश क्रिकेटपटू, जन्म: २३ ऑक्टोबर १९००).
- १९७४: सेठ गोविंद दास (स्वातंत्र्यसैनिक, लोकसभेचे हंगामी सभापती, साहित्यिक, जन्म: १६ ऑक्टोबर १८९६).
- १९९९: श्रीपाद रामकृष्ण काळे (साहित्यिक, कथा आणि कादंबरीकार, जन्म: ?).
- २००३: जानकीदास (हिंदी चित्रपटातील चरित्र अभिनेते, जन्म: ? १९१०).
- २००५: मुश्ताक अली (भारतीय क्रिकेटपटू, जन्म: १७ डिसेंबर १९१४).
- २०२१: मिल्खा सिंग, टोपणनाव फ्लाइंग सिक्ख (भारतीय धावपटू, पद्मश्री १९५९ खेळ, जन्म: १७ ऑक्टोबर १९३५).
दिनविशेष जून महिन्यातील दिनविशेष | |||||
---|---|---|---|---|---|
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ |
७ | ८ | ९ | १० | ११ | १२ |
१३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ |
२५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |