१५ जून दिनविशेष

१५ जून दिनविशेष - इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक १५ जून चे दिनविशेष.
१५ जून दिनविशेष | 15 June in History

दिनांक १५ जून च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस


TEXT - TEXT.

शेवटचा बदल १४ जून २०२१

जागतिक दिवस
१५ जून रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस

 • जागतिक ज्येष्ठ नागरिक छळ जागृती दिवस
 • जागतिक वारा दिन

ठळक घटना / घडामोडी
१५ जून रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी

 • ९२३: सोईसनची लढाई - फ्रांसचे राजे रॉबर्ट पहिले मारले गेले.
 • ११८४: फिमराईटची लढाई - नॉर्वेचे राजे मॅग्नुस पाचवे मारले गेले.
 • १२१५: इंग्लंडचे राजे जॉन यांनी मॅग्ना कार्टा (महा करार) मान्य केला आणि मारले गेले.
 • १५२०: पोप लिओ दहाव्याने एक्सर्जे डॉमने हा पोपचा फतवा काढून मार्टिन ल्युथरला वाळीत टाकण्याची धमकी दिली.
 • १६६७: डॉ.ज्यॉं-बॅप्टिस्ट डेनिसने पहिल्यांदा मानवाला दुसर्‍याचे रक्त दिले.
 • १७५२: बेंजामिन फ्रॅंकलिनने आकाशातील वीज ही वीज असल्याचे सिद्ध केले.
 • १७७५: अमेरिकन क्रांती - जॉर्ज वॉशिंग्टनची खंडीय सेनेच्या नेतेपदी नेमणूक.
 • १८०४: अमेरिकेच्या संविधानातील बारावा बदल स्वीकृत.
 • १८०८: जोसेफ बोनापार्ट स्पेनच्या राजेपदी.
 • १८३६: आर्कान्सा अमेरिकेची २५वे राज्य झाले.
 • १८४४: चार्ल्स गुडइयरने रबराच्या व्हल्कनायझेशनचे पेटंट घेतले.
 • १८४६: ऑरेगोनचा तह - ४९० उत्तर अक्षांश अमेरिका व कॅनडामधील सीमा ठरवण्यात आली.
 • १८५९: ऑरेगोनच्या तहाबद्दलच्या गैरसमजूतीमुळे अमेरिका व कॅनडाच्या नागरिकांत युद्ध.
 • १८६९: महाराष्ट्रातील पहिला विधवा विवाह साजरा झाला (श्री.पांडुरंग विनायक करमरकर यांनी वेणूबाई या विधवेबरोबर जाहीरपणे पुनर्विवाह केला).
 • १९०४: न्यू यॉर्कमध्ये एस.एस. जनरल स्लोकम या बोटीला आग लागून १,००० मृत्युमुखी.
 • १९११: आय.बी.एम.च्या पूर्वज कंपनी टॅब्युलेटिंग कम्प्युटिंग रेकोर्डिंग कंपनीची स्थापना.
 • १९१९: कॅप्टन जॉन अलकॉक, लेफ्टनंट आर्थर ब्राऊन यांनी विमानातून सर्वप्रथम अटलांटिक महासागर पार केला.
 • १९५४: युएफाची स्थापना.
 • १९७०: बा. पां. आपटे पुणे विद्यापीठाचे आठवे कुलगुरू झाले.
 • १९९२: अमेरिकेचे सर्वोच्च न्यायालयाने ठरवले की अमेरिकेला हव्या असलेल्या संशयितांना इतर देशांतून पळवून आणणे कायदेशीर आहे.
 • १९९३: संपूर्ण देशी बनावटीच्या सहा ‘अर्जुन’ रणगाड्यांची पहिली तुकडी लष्कराकडे सुपूर्द करण्यात आली.
 • १९९४: इस्त्रायल व व्हॅटिकन सिटी यांमधे पूर्ण राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.
 • १९९७: अजामीनपात्र गुन्ह्याचा आरोप असलेली व्यक्ती फरारी असेल, तर तिच्यावर आरोपपत्र दाखल नसतानाही न्यायमूर्ती अटक वॉरंट जारी करू शकतात असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला.
 • २००१: ग्रँडमास्टर विजयालक्ष्मी सुब्रह्मण्यम यांनी राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा विक्रमी पाचव्यांदा जिंकली.
 • २००२: नियर अर्थ ऍस्टेरॉइड २००२ एम.एन. पृथ्वीपासून फक्त १,२०,००० कि.मी. (७५,००० मैल) दूरून गेला.
 • २००८: लेहमन ब्रदर्स या वित्तसंस्थेने दिवाळखोरी जाहीर केली.

जन्म / वाढदिवस / जयंती
१५ जून रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १८७८: मार्गारेट अ‍ॅबॉट (भारतीय-अमेरिकन गोल्फर, मृत्यू: १० जून १९५५).
 • १८९८: गजानन श्रीपत / अण्णासाहेब खैर (पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक, मृत्यू: २९ ऑगस्ट १९८६).
 • १९०७: ना. ग. गोरे (स्वातंत्र्यसैनिक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील नेते आणि समाजवादी विचारवंत, मृत्यू: १ मे १९९३).
 • १९१७: सज्जाद हुसेन (संगीतकार मेंडोलीनवादक, मृत्यू: २१ जुलै १९९५).
 • १९२३: केशव जगन्नाथ पुरोहित / शांताराम (साहित्यिक ).
 • १९२७: इब्न-ए-इंशा (भारतीय-पाकिस्तानी कवी आणि लेखक, मृत्यू: ११ जानेवारी १९७८).
 • १९२८: शंकर वैद्य (साहित्यिक, मृत्यू: २३ सप्टेंबर २०१४).
 • १९२९: सुरैय्या जमाल शेख / सुरैय्या (गायिका व अभिनेत्री, मृत्यू: ३१ जानेवारी २००४).
 • १९३२: झिया फरिदुद्दीन डागर (धृपद गायक, मृत्यू: ८ मे २०१३)
 • १९३३: सरोजिनी वैद्य (लेखिका, मृत्यू: ३ ऑगस्ट २००७)
 • १९३७: अण्णा हजारे (भारतीय जनआंदोलन चळवळीतील एक अध्वर्यू आणि ज्येष्ठ समाजसेवक).
 • १९४७: प्रेमानंद गज्वी (साहित्यिक आणि नाटककार).

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
१५ जून रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १९३१: अच्युत बळवंत कोल्हटकर (अर्वाचीन मराठीतील सुलभ लेखन शैलीचे प्रवर्तक, संदेशकार, जन्म: १ ऑगस्ट १९३१).
 • १९७१: वेंडेल मेरेडिथ स्टॅनले (नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ, जन्म: १ ऑगस्ट १८७९).
 • १९७९: सूर्यकांत रामचंद्र खांडेकर (कवी, गीतकार, जन्म: २ एप्रिल १९२६)
 • १९८३: श्रीरंगम श्रीनिवास राव / श्री श्री (साहित्य अकादमी पुरस्कार विजेते तेलुगू कवी गीतकार, जन्म: ३० एप्रिल १९१०)
 • २०२०: कर्नल बिक्कुमल्ला संतोष बाबू (भारतीय सैन्य अधिकारी आणि १६ बिहार रेजिमेंटचे कमांडिंग अधिकारी, जन्म: १३ फेब्रुवारी १९८३)


संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा

जून महिन्यातील दिनविशेष

नवी नोंद सुचवा · चूक कळवा · संदर्भांची यादी · अस्वीकरण

 • [col]

 • टिप्पणी पोस्ट करा

  स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.