२ एप्रिल दिनविशेष - इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक २ एप्रिल चे दिनविशेष.

छत्रपती राजर्षी शाहू महाराज:
जागतिक दिवस
२ एप्रिल रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस- जागतिक ऑटिझम जागरूकता दिवस.
- आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिन.
ठळक घटना (घडामोडी)
२ एप्रिल रोजी घडलेल्या ठळक ऐतिहासिक घटना आणि घडामोडी- १६७९: सम्राट औरंगजेबाने हिंदूवर ‘जिझिया’ कर लावला.
- १७५५: सुवर्णदुर्ग किल्ल्या इंग्रजांनी काबीज केला.
- १८७०: गणेश वासुदेव जोशी उर्फ ’सार्वजनिक काका’ यांच्या प्रेरणेने पुणे सार्वजनिक सभेची स्थापना झाली
- १८८५: मध्ये स्थापन झालेल्या भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे मूळ ‘पुणे सार्वजनिक सभा’ आणि ’बॉंम्बे असोसिएशन’ या संस्थांमध्ये आहे असे मानले जाते.
- १८९४: छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा राज्याभिषेक झाला.
- १९७०: आसाममधून टेकड्यांचा प्रदेश वेगळा करून मेघालय राज्य अस्तित्त्वात आले.
- १९८२: फॉकलंड युद्ध - अर्जेंटिनाने फॉकलंड बेटे पादाक्रांत केली.
- १९८४: सोयुझ टी-११ या अंतराळयानातुन राकेश शर्मा या पहिल्या भारतीय अंतराळवीराने उड्डाण केले. राकेश शर्मा हे ७ दिवस २१ तास व ४० मिनिटे अवकाशात होते.
- १९८९: ताणलेले संबंध सुधारण्यासाठी रशियाचे अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव यांचे क्यूबातील हॅवाना येथे आगमन.
- १९९०: स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बॅंक ऑफ इंडिया (SIDBI) ची स्थापना.
- १९९८: कोकण रेल्वे वरून धावणारी निजामुद्दीन तिरुवनंतपुरम राजधानी एक्सप्रेस या गाडीचा शुभारंभ दिल्लीतील निजामुद्दीन स्थानक येथुन झाला.
- २०११: अठ्ठावीस वर्षांच्या कालखंडानंतर भारत क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत विजयी.
- २०१७: जम्मू काश्मीरमधील चेनानी ते नशरी या भारतातील सर्वात मोठ्या बोगद्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या बोगद्यामुळे जम्मू-श्रीनगर हा प्रवास ३० किलोमीटर ने कमी होईल, तर या प्रवासातील २ तास वेळ वाचणार आहे. देशातील या सर्वात मोठ्या बोगद्याची लांबी ९.२८ किलोमीटर आहे. २०११ साली या बोगद्याचे काम सुरू झाले होते. जवळपास ७ वर्षांच्या अथक मेहनतीनंतर या बोगद्याचे काम पूर्ण झाले असून त्यासाठी ३,७०० कोटी रुपये इतका खर्च लागला.
जन्म (वाढदिवस, जयंती)
२ एप्रिल रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे- १७८१: स्वामीनारायण (भारतीय धर्मगुरू, मृत्यू: १ जून १८३०).
- १८९८: हरिन्द्रनाथ चट्टोपाध्याय (हिंदी चित्रपटांतील प्रसिद्ध चरित्र अभिनेते. त्यांच्या ’साहिब, बिबी और गुलाम’, ’बावर्ची’ इ. चित्रपटांतील भुमिका विशेष गाजल्या. ते कवी (इंग्रजी), नाटककार, संगीतज्ञही होते. विजयवाडा मतदारसंघातून ते पहिल्या लोकसभेचे खासदार होते. कमलादेवी चट्टोपाध्याय यांचे पती व सरोजिनी नायडू यांचे बंधू होत, मृत्यू: २३ जून १९९०).
- १९०२: बडे गुलाम अली खॉं (पतियाळा घराण्याचे गायक व वीणावादक, त्यांच्या ’याद पियाकी आये’, ’का करु सजनी’ इ. ठुमर्या लोकप्रिय आहेत, मृत्यू: २३ एप्रिल १९६८).
- १९२६: सूर्यकांत रामचंद्र खांडेकर (कवी व गीतकार, मृत्यू: १५ जून १९७९).
- १९४२: रोशन सेठ (भारतीय - इंग्रजी अभिनेते, ह्यात).
- १९६९: अजय देवगण (भारतीय अभिनेते, ह्यात).
- १९७२: रेमो डिसूझा (भारतीय नृत्यदिग्दर्शक, ह्यात).
- १९८१: कपिल शर्मा (भारतीय स्टॅंड-अप कॉमेडीयन, ह्यात).
मृत्यू (पुण्यतिथी, स्मृती दिवस, बलिदान दिवस, शहीद दिवस)
२ एप्रिल रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे- १७२०: बाळाजी विश्वनाथ (भट) देशमुख (मराठी साम्राज्याचे पहिले पेशवे पंतप्रधान, जन्म: १६६२).
- १८७२: सॅम्युअल मोर्स (‘मोर्स कोड’ व तारायंत्राचे जनक आणि चित्रकार, जन्म: २७ एप्रिल १७९१).
- १९३३: के. एस. रणजितसिंहजी (कसोटी क्रिकेट खेळाडू व महाराजा, यांच्या स्मरणार्थ १९३४ पासून ‘रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा’ खेळल्या जातात, जन्म: १० सप्टेंबर १८७२).
- २००९: गजाननराव वाटवे (गायक व संगीतकार, जन्म: ८ जून १९१७).
संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
एप्रिल महिन्यातील दिनविशेष
एप्रिल | ||||||
---|---|---|---|---|---|---|
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ |
८ | ९ | १० | ११ | १२ | १३ | १४ |
१५ | १६ | १७ | १८ | १९ | २० | २१ |
२२ | २३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ |
२९ | ३० | |||||
तारखेप्रमाणे एप्रिल महिन्यातील सर्व दिनविशेष पहा. |
नवी नोंद सुचवा । दुरूस्ती कळवा । संदर्भ सूची । अस्वीकरण
अभिप्राय