११ एप्रिल दिनविशेष

११ एप्रिल दिनविशेष - इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक ११ एप्रिल चे दिनविशेष.
११ मार्च दिनविशेष | 11 March in History
११ एप्रिल दिनविशेष (दिनविशेष), छायाचित्र: मराठीमाती अर्काईव्ह.
के.एल्. सैगल - (११ एप्रिल १९०४ - १८ जानेवारी १९४७) हे भारताच्या स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात भारतीय बोलपटांतील सर्वात लोकप्रिय गायक अभिनेते होते. त्यांच्या आवाजाला इंग्लिश श्रोते ‘गोल्डन व्हॉइस’ म्हणायचे.

जागतिक दिवस

११ एप्रिल रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
 • हुआन सांतामारिया दिन: कॉस्टा रिका.

ठळक घटना (घडामोडी)

११ एप्रिल रोजी घडलेल्या ठळक ऐतिहासिक घटना आणि घडामोडी
 • १२४१: मोंगोल सरदार बाटु खान याने हंगेरीचा राजा बेला चौथा यास मोहीच्या लढाईत पराभूत केले.
 • १८६८: जपानमध्ये शोगन व्यवस्थेचा अंत.
 • १८९९: स्पेनने पोर्तोरिकोचा प्रांत अमेरिकेला दिला.
 • १९४५: दुसरे महायुद्ध - अमेरिकेच्या सैन्याने बुखेनवाल्ड कॉँसेन्ट्रेशन कॅम्प मधून कैद्यांची मुक्तता केली.
 • १९५१: कोरियन युद्ध - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष हॅरी ट्रुमनने जनरल डग्लस मॅकआर्थरकडून सरसेनापतीपद काढून घेतले.
 • १९६१: बॉब डिलनने आपली गायकीची सुरुवात केली.
 • १९६५: अमेरिकेच्या मध्य भागात ५१ टोर्नेडोंचा उत्पात. २५६ ठार.
 • १९६८: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष लिन्डन बी. जॉन्सनने १९६८च्या नागरी हक्क कायद्यावर सही केली. या कायद्यानुसार घराच्या खरेदी, विक्री, ई. व्यवहारात वंशानुसार भेदभाव करणे कायदेबाह्य ठरले.
 • १९७०: अपोलो १३चे प्रक्षेपण.
 • १९७९: युगांडाचा हुकुमशहा ईदी अमीन पदच्युत.
 • १९८१: दक्षिण लंडनच्या ब्रिक्स्टन भागात हिंसा. ६५ नागरिक व ३०० पोलिस जखमी.
 • २००२: ट्युनिसीयात अल कायदाकडून बॉम्बहल्ला. २१ ठार.
 • २००२: व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्ष ह्युगो चावेझविरुद्ध फसलेला उठाव सुरू.

जन्म (वाढदिवस, जयंती)

११ एप्रिल रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
 • १३५७: होआव पहिला, पोर्तुगालचा राजा.
 • १७५५: जेम्स पार्किन्सन, इंग्लिश डॉक्टर.
 • १८२७: जोतीबा फुले, भारतीय विचारवंत, समाजसुधारक.
 • १९०४: के.एल्. सैगल, हिंदी भाषा पार्श्वगायक.
 • १९५३: गाय व्हेरोफ्श्टाट, बेल्जियमचा पंतप्रधान.

मृत्यू (पुण्यतिथी, स्मृती दिवस, बलिदान दिवस, शहीद दिवस)

११ एप्रिल रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
 • १०३४: रोमानस तिसरा, बायझेन्टाईन सम्राट.
 • १६१२: इमॅन्युएल फान मेटरेन, फ्लेमिश इतिहासकार.
 • १९६७: डोनाल्ड सँगस्टर, जमैकाचा पंतप्रधान.


संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा

एप्रिल महिन्यातील दिनविशेष

नवी नोंद सुचवादुरूस्ती कळवासंदर्भ सूचीअस्वीकरण


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.