२० एप्रिल दिनविशेष - इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक २० एप्रिल चे दिनविशेष.

ॲडॉल्फ हिटलर - (२० एप्रिल १८८९ - ३० एप्रिल १९४५) हे जर्मनी देशाचा जर्मन हुकूमशहा होते. हिटलर हे एक महत्त्वाकांक्षी तसेच मुत्सद्दी नेता होते. ‘एक राष्ट्र, एक आवाज, एक नेता, एक ध्वज’ हे त्यांचे घोष वाक्य होते.
जागतिक दिवस
२० एप्रिल रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस- आंतरराष्ट्रीय गांजा संस्कृती दिवस.
ठळक घटना (घडामोडी)
२० एप्रिल रोजी घडलेल्या ठळक ऐतिहासिक घटना आणि घडामोडी- १६५७: न्यू यॉर्कमधील ज्यू व्यक्तिंना धर्मस्वातंत्र्य देण्यात आले.
- १७४९: मराठा सत्तेचा ध्वज अटकेपार नेणाऱ्या पेशव्यांचे श्रद्धास्थान असलेल्या देवदेवेश्वर मंदिराची नानासाहेब पेशवे यांनी पर्वतीवर स्थापना केली.
- १७७०: जेम्स कूकच्या तांड्याला सर्वप्रथम ऑस्ट्रेलियाचा किनारा दिसला.
- १७९२: फ्रांसने ऑस्ट्रियाविरुद्ध युद्ध पुकारले.
- १८३६: अमेरिकेत विस्कॉन्सिन प्रांताची निर्मिती.
- १८६१: अमेरिकन यादवी युद्ध - उत्तरेच्या सेनापती रॉबर्ट ई. लीने राजीनामा देउन व्हर्जिनीयाचे सेनापतीपद घेतले.
- १८६२: लुई पास्चर व क्लॉड बर्नार्डने पास्चरायझेशनचा प्रयोग केला.
- १८७६: बल्गेरियात उठाव.
- १८८४: पोप लिओ तेराव्याने ह्युमेनम जीनसचे प्रकाशन केले व त्याद्वारे मानवाचे पृथ्वीवरील वास्तव्याचे कारण समजावयाचा प्रयत्न केला.
- १९१४: लडलोची कत्तल - अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यात संपकऱ्यांविरुद्ध सोडलेल्या गुंडांनी १७ स्त्री, पुरुष व मुलांना ठार केले.
- १९३९: अॅडॉल्फ हिटलरचा ५० वा वाढदिवस जर्मनीमध्ये सार्वजनिक सुटी देऊन साजरा करण्यात आला.
- १९३९: मध्य प्रांतातील मराठी विभागाचे एकीकरण करून विदर्भ नावाचा नवीन प्रांत बनविण्याची शिफारस करणारा ठराव प्रांतिक कायदेमंडळात संमत झाला.
- १९४५: दुसरे महायुद्ध - अमेरिकन सैन्याने जर्मनीचे लीपझीग शहर काबीज केले.
- १९४६: राष्ट्रसंघ ही संस्था बरखास्त करून पुढे याचेच संयुक्त राष्ट्रांच्या संघटनेमध्ये (United Nations) रूपांतर झाले.
- १९६७: स्वित्झर्लंडचे विमान कॅनडाच्या टोरोंटो शहराजवळ कोसळले. १२६ ठार.
- १९६८: साउथ आफ्रिकन एरवेझचे बोईंग ७०७ जातीचे विमान विंडहोक शहराजवळ कोसळले. १२२ ठार.
- १९६८: पिएर त्रूदो कॅनडाच्या पंतप्रधानपदी.
- १९७२: अंतराळयान अपोलो १६ चंद्रावर उतरले.
- १९७८: सोवियेत संघाच्या लढाउ विमानांनी कोरियन एर फ्लाइट ९०२ या बोईंग ७०७ जातीच्या विमानावर क्षेपणास्त्रे सोडली. २ ठार. वैमानिकांनी कुशलतेने विमान गोठलेल्या तळ्यावर उतरवले.
- १९९२: जी.एम.आर.टी.ची पहिली ॲंटेना पुणे जिल्ह्यातल्या खोडदमध्ये उभारली गेली. ही आशियातली सगळ्यात मोठी रेडिओ दुर्बिण आहे.
- १९९८: एर फ्रांसचे बोईंग ७२७ जातीचे विमान कोलंबियाच्या बोगोटा विमानतळावरून उडल्यावर डोंगरावर कोसळले. ५३ ठार.
- १९९९: कॉलोराडोच्या लिटलटन शहरात एरिक हॅरिस व डिलन क्लेबोल्डने आपल्या कोलंबाइन हायस्कूल या शाळेतील १२ विद्यार्थी व १ शिक्षकाला ठार मारले व नंतर आत्महत्या केली.
- २००४: युटिका, इलिनॉय शहरात एफ.३ टोर्नेडो. ८ ठार.
- २००४: इराकच्या अबु गरीब तुरुंगावर हल्ला. २२ कैदी ठार. ९२ जखमी.
- २००८: डॅनिका पॅट्रिक ह्या इंडी कार रेस जिंकण्याच्या पहिल्या महिला चालक झाल्या.
जन्म (वाढदिवस, जयंती)
२० एप्रिल रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे- १६३३: गो-कोम्यो (जपानी सम्राट, मृत्यू: ३० ऑक्टोबर १६५४).
- १८८९: ॲडॉल्फ हिटलर (जर्मन हुकुमशहा, मृत्यू: ३० एप्रिल १९४५).
- १८९६: प्रा. ह. भ. प. शंकर वामन उर्फ सोनोपंत (मामासाहेब) दांडेकर (सार्थ ज्ञानेश्वरी चे लेखक, मृत्यू: ९ जुलै १९६८).
- १९१४: गोपीनाथ मोहांती (उडिया लेखक, मृत्यू: २० ऑगस्ट १९९१).
- १९३९: ग्रो हार्लेम ब्रुंड्टलॅंड (नॉर्वेच्या पंतप्रधान, हयात).
- १९४९: मासिमो दालेमा (इटलीचे पंतप्रधान, हयात).
- १९५०: एन. चंद्रबाबू नायडू (आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री, हयात).
- १९८०: अरीन पॉल (भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक, हयात).
मृत्यू (पुण्यतिथी, स्मृती दिवस, बलिदान दिवस, शहीद दिवस)
२० एप्रिल रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे- १३१४: क्लेमेंट चौथे (पोप, जन्म: २३ नोव्हेंबर ?).
- १५२१: झेंगडे (चीनी सम्राट, जन्म: २६ ऑक्टोबर १४९१).
- १९१८: कार्ल ब्राऊन (नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ, जन्म: ६ जून १८५०).
- १९३८: चिंतामणराव वैद्य (न्यायाधीश व कायदेपंडित, जन्म: १८ ऑक्टोबर १८६१).
- १९४७: क्रिस्चियन दहावा (डेन्मार्कचे राजे, जन्म: २६ सप्टेंबर १८७०).
- १९५१: इव्हानो बोनोमी (इटलीचे पंतप्रधान, जन्म: १८ ऑक्टोबर १८७३).
- १९६०: पंडीत पन्नालाल घोष (भारतीय बासरीवादक, जन्म: ३१ जुलै १९११).
- १९७०: शकील बदायूनी (हिंदी आणि उर्दू गीतकार, जन्म: ३ ऑगस्ट १९१६).
- १९९९: कमलाबाई कृष्णाजी ओगले (रुचिरा पुस्तकाच्या लेखिका, जन्म: १६ सप्टेंबर १९१३).
संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
एप्रिल महिन्यातील दिनविशेष
एप्रिल | ||||||
---|---|---|---|---|---|---|
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ |
८ | ९ | १० | ११ | १२ | १३ | १४ |
१५ | १६ | १७ | १८ | १९ | २० | २१ |
२२ | २३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ |
२९ | ३० | |||||
तारखेप्रमाणे एप्रिल महिन्यातील सर्व दिनविशेष पहा. |
नवी नोंद सुचवा । दुरूस्ती कळवा । संदर्भ सूची । अस्वीकरण
अभिप्राय