१८ एप्रिल दिनविशेष

१८ एप्रिल दिनविशेष - इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक १८ एप्रिल चे दिनविशेष.
१८ एप्रिल दिनविशेष | 18 April in History
१८ एप्रिल दिनविशेष (दिनविशेष), छायाचित्र: मराठीमाती अर्काईव्ह.
विश्वनाथ नागेशकर - (१८ एप्रिल १९१० - १८ मार्च २००१) हे विसाव्या शतकातील नावाजलेले गोवेकर मराठी चित्रकार होते.

जागतिक दिवस

१८ एप्रिल रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
 • जागतिक वारसा दिन.
 • स्वातंत्र्य दिन: झिम्बाब्वे.
 • सेना दिन: इराण.

ठळक घटना (घडामोडी)

१८ एप्रिल रोजी घडलेल्या ठळक ऐतिहासिक घटना आणि घडामोडी
 • १०२५: बोलेस्लॉ पहिला क्रॉब्री पोलंडच्या राजेपदी.
 • १५१८: बोना स्फोर्झा पोलंडच्या राणीपदी.
 • १८८०: मार्शफील्ड, मिसूरी येथे एफ. ४ टोर्नेडो. ९९ ठार, २०० जखमी.
 • १९०६: कॅलिफोर्नियात सान फ्रांसिस्को येथे रिश्टर मापनपद्धतीनुसार ७.८ तीव्रतेचा भूकंप. यात व यामुळे लागलेल्या आगीत सगळे शहर उद्ध्वस्त. ३,००० ते ६,००० ठार, हजारो जखमी.
 • १९१२: टायटॅनिकमधील वाचलेले ७०५ प्रवासी घेउन आर.एम.एस. कार्पेथिया जहाज न्यूयॉर्कला पोचले.
 • १९४२: दुसरे महायुद्ध - पिएर लव्हाल विची फ्रांसच्या पंतप्रधानपदी.
 • १९४५: दुसरे महायुद्ध - दोस्त राष्ट्रांच्या १,०००हून अधिक विमानांनी बॉम्बफेक करून जर्मनीतील हेलिगोलँड हे बेट उद्ध्वस्त केले.
 • १९४६: लीग ऑफ नेशन्स विसर्जित.
 • १९५४: गमाल अब्दल नासरने ईजिप्तमध्ये सत्ता बळकावली.
 • १९८०: झिम्बाब्वेला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
 • १९८३: बैरुतमध्ये अमेरिकेच्या वकीलातीवर आत्मघातकी हल्ला. अनेक सैनिकांसह ६३ ठार.
 • १९९२: अफगाणिस्तानमध्ये जनरल अब्दुल रशीद दोस्तमने अहमद शाह मसूदशी हातमिळवणी करून राष्ट्राध्यक्ष नजिबुल्लाह विरुद्ध उठाव केला.
 • १९९६: लेबेनॉनच्या कानामधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतींवर इस्रायेलचा हल्ला. १०२ नागरिक ठार.
 • २००७: क्विंघे स्पेशल स्टील कॉर्पोरेशन दुर्घटनेत ३२ चिनी कामगार होरपळून मृत्युमुखी.

जन्म (वाढदिवस, जयंती)

१८ एप्रिल रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
 • १५९०: पहिला एहमेद.
 • १९०२: ज्युसेप्पे पेला, इटलीचा पंतप्रधान.
 • १९१०: विश्वनाथ नागेशकर, भारतीय, गोवेकर चित्रकार.
 • १९४७: जेम्स वूड्स, अमेरिकन अभिनेता.
 • १९५४: रिक मोरानिस, केनेडियन अभिनेता.
 • १९५८: माल्कम मार्शल, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
 • १९६३: कॉनन ओब्रायन, अमेरिकन अभिनेता, निर्मता व मुलखतकार.

मृत्यू (पुण्यतिथी, स्मृती दिवस, बलिदान दिवस, शहीद दिवस)

१८ एप्रिल रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
 • १९४३: इसोरोकु यामामोटो, जपानचा दर्यासारंग.
 • १९५५: अल्बर्ट आइनस्टाइन, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.
 • २००२: थॉर हायरडाल, नॉर्वेचा शोधक, मानववंशशास्त्रज्ञ.
 • २००४: रतु सर कामिसेसे मारा, फिजीचा प्रथम पंतप्रधान, राष्ट्राध्यक्ष.


संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा

एप्रिल महिन्यातील दिनविशेष

नवी नोंद सुचवादुरूस्ती कळवासंदर्भ सूचीअस्वीकरण


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.