४ एप्रिल दिनविशेष

४ एप्रिल दिनविशेष - इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक ४ एप्रिल चे दिनविशेष.
४ एप्रिल दिनविशेष | April 4 in History
४ एप्रिल दिनविशेष (दिनविशेष), छायाचित्र: मराठीमाती आर्काईव्ह.
TEXT

जागतिक दिवस

४ एप्रिल रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
 • -

ठळक घटना (घडामोडी)

४ एप्रिल रोजी घडलेल्या ठळक ऐतिहासिक घटना आणि घडामोडी
 • १८८२: ब्रिटन च्या पहिल्या इलेक्ट्रिक ट्राम ईस्ट लंडन मध्ये चालू झाल्या.
 • १९०५: हिमालयातील कांगरा व्हॅलीमध्ये भूकंप २०,००० व्यक्ती मृत्यूमुखी.
 • १९२४: महात्मा गांधी यांनी ‘यंग इंडिया’ आणि ‘नवजीवन’ या वृत्तपत्रांचे संपादकपद स्वीकारले.
 • १९४४: दुसरे महायुद्ध – ब्रिटिश व अमेरिकन फौजांनी रुमानियातील बुखारेस्टवर केलेल्या बॉम्बहल्ल्यात ३००० नागरिक ठार झाले.
 • १९४९: पश्चिम युरोपातील राष्ट्रे व अमेरिका यांच्यात संरक्षणविषयक उत्तर अटलांटिक करार म्हणजे ‘नाटो करार’ करण्यात आला.
 • १९६८: जेम्स अर्ल रे याने ‘मार्टिन ल्यूथर किंग (ज्युनिअर)’ यांची हत्या केली.
 • १९६८: नासाने अपोलो-६ चे प्रक्षेपण केले.
 • १९६९: कृत्रिम हृदय बसवण्याचा पहिला प्रयोग डॉ. डेंटन कूली यांनी केला.
 • १९७५: बिल गेट्स आणि पॉल ॲलन यांनी भागीदारीत मायक्रोसॉफ्टची स्थापना केली.
 • १९७९: पाकीस्तानचे माजी पंतप्रधान झुल्फीकार अली भुत्तो यांना फाशी.
 • १९९०: लता मंगेशकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला.
 • २०१३: मुंब्र्यात बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळल्याने सत्तरपेक्षा जास्त बळी.

जन्म (वाढदिवस, जयंती)

४ एप्रिल रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
 • १८८: काराकॅला (रोमन सम्राट, मृत्यू: ८ एप्रिल २१७).
 • १८१९: मरिया दुसरी (पोर्तुगालची राणी, मृत्यू: १५ नोव्हेंबर १८५३).
 • १८२३: सर कार्ल विल्हेम सीमेन्स (जर्मन - ब्रिटिश विद्युत अभियंता, मृत्यू: १९ नोव्हेंबर १८८३).
 • १८४२: एदुआर्द लुकास (फ्रेंच गणितज्ञ, मृत्यू: ३ ऑक्टोबर १८९१).
 • १८८४: इसोरोकु यामामोतो (जपानी दर्यासारंग, मृत्यू: १८ एप्रिल १९४३).
 • १९०२: पं नारायणराव व्यास (शास्त्रीय गायक, मृत्यू: १ एप्रिल १९८४).
 • १९३३: बापू नाडकर्णी (भारतीय डावखुरे मंदगती गोलंदाज, मृत्यू: १७ जानेवारी २०२०).
 • १९७३: चंद्र शेखर येलेती (भारतीय संचालक आणि पटकथालेखक, हयात).
 • १९९१: जेमी लिन स्पियर्स (अमेरिकन अभिनेत्री, हयात).

मृत्यू (पुण्यतिथी, स्मृती दिवस, बलिदान दिवस, शहीद दिवस)

४ एप्रिल रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
 • १९७९: झुल्फिकार अली भुट्टो (पाकिस्तानचे चौथे राष्ट्राध्यक्ष आणि ९ वे पंतप्रधान, जन्म: ५ जानेवारी १९२८).
 • १९८७: सच्चिदानंद हिरानंद वात्स्यायन उर्फ अज्ञेय (ज्ञानपीठ पारितोषिक विजेते हिंदी लेखक आणि वृत्तपत्रकार, जन्म: ७ मार्च १९११).
 • १९९६: आनंद साधले (संस्कृत आणि मराठी साहित्यिक, जन्म: ५ जुलै १९२०).
 • २०१६: पी. ए. संगमा (भारतीय वकील आणि राजकारणी, जन्म: १ सप्टेंबर १९४७).


संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा

एप्रिल महिन्यातील दिनविशेष

नवी नोंद सुचवादुरूस्ती कळवासंदर्भ सूचीअस्वीकरण


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.