२४ एप्रिल दिनविशेष

२४ एप्रिल दिनविशेष - इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक २४ एप्रिल चे दिनविशेष.
२४ एप्रिल दिनविशेष | 24 April in History
२४ एप्रिल दिनविशेष (दिनविशेष). सचिन तेंडुलकर (सर्वोत्तम मानले जाणारे माजी भारतीय क्रिकेटपटू), चित्र: मराठीमाती अर्काईव्ह.
सचिन तेंडुलकर - (२४ एप्रिल १९७३) हे क्रिकेटविश्वात सर्वोत्तम मानले जाणारे माजी भारतीय क्रिकेटपटू आहेत. आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये शतकांचे शतक करणारे ते एकमेव क्रिकेटपटू आहेत.

जागतिक दिवस

२४ एप्रिल रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
 • प्रजासत्ताक दिन: गाम्बिया.
 • वंशहत्त्या स्मृती दिन: आर्मेनिया.
 • काप्यॉंग दिन.
 • जागतिक प्रयोगशाळा-प्राणी दिन.
 • भारतीय जलसंपत्ती दिन.
 • लोकशाही दिन: नेपाळ
 • जागतिक शिल्पकला दिन.
 • भारतीय पंचायती राज दिन.

ठळक घटना (घडामोडी)

२४ एप्रिल रोजी घडलेल्या ठळक ऐतिहासिक घटना आणि घडामोडी
 • इ.स.पू. ११८४: शहराबाहेर आणुन ठेवलेल्या प्रचंड लाकडी घोडा (ट्रोजन हॉर्स) ट्रॉयच्या सैन्याने कुतुहलापायी आत घेतला. घोड्यात लपलेले ग्रीक सैनिक रात्री बाहेर पडले व दहा वर्षे चाललेल्या ट्रॉयचा वेढा संपवला.
 • १६७४: भोर-वाई प्रांतातील केंजळगड शिवाजी महाराजांनी स्वारी करून जिंकला.
 • १७१७: खंडेराव दाभाडे यांनी अहमदनगर येथे मोगलांचा पराभव केला.
 • १८००: लायब्ररी ऑफ कॉंग्रेसची अमेरिकेत स्थापना.
 • १८६३: कीझव्हिलची कत्तल - कॅलिफोर्नियातील कीझव्हिल येथे ५३ स्थानिक अमेरिकन व्यक्तिंची हत्त्या.
 • १९१४: पुंज सिद्धांतामधला महत्त्वाचा फ्रॅंक हर्ट्झ प्रयोग जर्मन भौतिक संघटनेसमोर दाखवला गेला.
 • १९१५: आर्मेनियन वंशहत्या - कॉन्स्टेन्टिनोपलमध्ये सुरू झालेली आर्मेनियन वंशीय व्यक्तिंचे हत्याकांड नंतर ओट्टोमन साम्राज्यभर पसरले.
 • १९२२: ब्रिटिश साम्राज्य बिनतारी (रेडिओ) टेलिग्राफने जोडण्याची योजना कार्यान्वित; इंग्लंडमधून कैरोशी संदेशवहन सुरू.
 • १९५५: बांडुंगची सभा समाप्त. २९ देशांच्या या सभेत पंचशील तत्त्वांचा पुरस्कार केला गेला.
 • १९६७: रशियाचे अंतराळयान सोयुझ १ कोसळले. अंतराळवीर व्लादिमिर कोमारोव्ह मृत्युमुखी.
 • १९६८: मॉरिशियसला संयुक्त राष्ट्रांचे सभासदत्त्व.
 • १९७०: चीनचा पहिला मानवनिर्मित उपग्रह डॉंग फॅंग हॉंग १ चे प्रक्षेपण.
 • १९७०: गाम्बिया प्रजासत्ताक झाले.
 • १९७५: स्टॉकहोममध्ये बाडर-माइनहॉफ टोळीने पश्चिम जर्मनीची वकीलात उडवली.
 • १९८०: ईराणमध्ये ओलिस असलेल्या अमेरिकेच्या नागरिकांना सोडवण्याच्या निष्फळ प्रयासात ८ अमेरिकन सैनिक ठार.
 • १९८१: आय.बी.एम.ने सर्वप्रथम वैयक्तिक संगणक प्रदर्शित केला.
 • १९९०: हबल दुर्बीणीचे प्रक्षेपण.
 • १९९३: आय.आर.ए.ने लंडनच्या बिशप्सगेट भागात बॉम्बस्फोट घडवला.
 • १९९३: इंडियन एअरलाइन्सच्या फ्लाइट ४२७ या दिल्लीहून श्रीनगरला जाणाऱ्या विमानाचे अतिरेक्यांनी अपहरण केले. सर्व १४१ प्रवाशांची सुखरूप मुक्तता झाली.
 • २००४: अमेरिकेने लिब्यावर १८ वर्षांपूर्वी घातलेले आर्थिक निर्बंध दूर केले.
 • २००५: कार्डिनल जोसेफ रॅट्झिंगर पोप बेनेडिक्ट सोळावा या नावाने पोप पदी.
 • २००५: जगातला पहिला क्लोन केलेला कुत्रा जन्माला आला.
 • २००६: नेपाळचा राजा ग्यानेंद्रने ४ वर्षांपूर्वी बरखास्त केलेली संसदीला पुनः मान्यता दिली.
 • २००७: नॉर्वेने युद्ध सुरू नसताना आइसलॅंडचे रक्षण करण्याचे कबूल केले.
 • २०१३: बांगलादेशची राजधानी ढाकाच्या उपनगरातील इमारत कोसळून १,१२७ व्यक्ती ठार. २,५०० पेक्षा अधिक जखमी.
 • २०१७: छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत सीआरपीएफचे २५ जवान शहीद झाले .

जन्म (वाढदिवस, जयंती)

२४ एप्रिल रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
 • १८८९: सर स्टॅफोर्ड क्रिप्स (इंग्लिश राजकारणी, मृत्यू: २१ एप्रिल १९५२).
 • १८९६: रघुनाथ वामन दिघे (रसाळ लेखन करणारे कादंबरीकार, मृत्यू: ४ जुलै १९८०).
 • १८९७: मनुएल अव्हिला कामाचो (मेक्सिकोचा राष्ट्राध्यक्ष, मृत्यू: १३ ऑक्टोबर १९९५).
 • १९१०: राजा परांजपे (चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते, मृत्यू: ९ फेब्रुवारी १९७९).
 • १९२६: थॉर्ब्यॉम फाल्डिन (स्वीडनचा पंतप्रधान, मृत्यू: २३ जुलै २०१६).
 • १९२९: राजकुमार (कन्नड चित्रपट अभिनेता व गायक, मृत्यू: १२ एप्रिल २००६).
 • १९३८: मॅक मोहन (भारतीय सिने अभिनेते, मृत्यू: १० मे २०१०).
 • १९७०: डॅमियन फ्लेमिंग (ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू, हयात).
 • १९७३: सचिन तेंडुलकर (भारतीय क्रिकेट खेळाडू, हयात).
 • १९८७: वरुण धवन (भारतीय सिने अभिनेते, हयात).

मृत्यू (पुण्यतिथी, स्मृती दिवस, बलिदान दिवस, शहीद दिवस)

२४ एप्रिल रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
 • १८५२: व्हासिली झुकोव्स्की (रशियन कवी, जन्म: ९ फेब्रुवारी १७८३).
 • १९४२: मास्टर दीनानाथ मंगेशकर (नाट्यसंगीत, गायक आणि अभिनेते, जन्म: २९ डिसेंबर १९००).
 • १९६०: लक्ष्मण बळवंत तथा अण्णासाहेब भोपटकर (नामवंत वकील, जन्म: १० मे १८८०).
 • १९७२: जामिनी रॉय (चित्रकार, जन्म: ११ एप्रिल १८८७).
 • १९७४: रामधारीसिंह दिनकर (देशभक्त तसेच हिंदी साहित्यिक, जन्म: २३ सप्टेंबर १९०८).
 • १९९४: शंतनुराव किर्लोस्कर (उद्योगपती, किर्लोस्कर उद्योग समूहाचे आधारस्तंभ, जन्म: २८ मे १९०३).
 • २००५: एझेर वाइझमन (इस्रायेलचा राष्ट्राध्यक्ष, जन्म: १५ जून १९२४).
 • २०११: सत्य साईबाबा (आध्यात्मिक गुरू, जन्म: २३ नोव्हेंबर १९२६).
 • २०१३: शमशाद बेगम (हिंदी पार्श्वगायिका, जन्म: १४ एप्रिल १९१९).
 • २०१४: शोभा नेगी रेड्डी (भारतीय राजकारणी, जन्म: १६ डिसेंबर १९६८).


संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा

एप्रिल महिन्यातील दिनविशेष

नवी नोंद सुचवादुरूस्ती कळवासंदर्भ सूचीअस्वीकरण


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.