१४ एप्रिल दिनविशेष

१४ एप्रिल दिनविशेष - इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक १४ एप्रिल चे दिनविशेष.
१४ एप्रिल दिनविशेष | April 14 in History
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस (१४ एप्रिल दिनविशेष), छायाचित्र: मराठीमाती अर्काईव्ह.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर - (१४ एप्रिल १८९१ - ६ डिसेंबर १९५६) हे जागतिक दर्जाचे भारतीय अर्थशास्त्रज्ञ, कायदेपंडीत, राजनीतिज्ञ, लेखक, समाज सुधारक, तत्त्वज्ञ, भारतीय संविधानाचे शिल्पकार, मानवी हक्कांचे कैवारी, भारताचे प्रथम कायदा व न्यायमंत्री, बौद्ध धर्म पुनरुत्थानक होते आणि भारतीय गणराज्याचे जनक होते.

जागतिक दिवस

१४ एप्रिल रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
 • डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती: भारत व जगभरात.
 • ज्ञान दिन: महाराष्ट्र राज्य.
 • मुंबई अग्निशमन सेवा दिन.

ठळक घटना (घडामोडी)

१४ एप्रिल रोजी घडलेल्या ठळक ऐतिहासिक घटना आणि घडामोडी
 • ४३: फोरम गॅलोरमची लढाई - ज्युलियस सीझरचा मारेकरी डेसिमस ज्युनियस ब्रुटस मार्क ऍन्टनीच्या सैनिकांकडून ठार.
 • १८२८: नोआह वेब्स्टरने डिक्शनरीचा कॉपीराईट नोंदवला.
 • १८६०: पोनी एक्सप्रेसचा पहिला घोडेस्वार साक्रामेंटो, कॅलिफोर्निया येथे पोचला.
 • १८६५: जॉन विल्कस बूथने अब्राहम लिंकनवर गोळी झाडली. लिंकन दुसऱ्या दिवशी मृत्यू पावला.
 • १९१२: आर.एम.एस. टायटॅनिकची हिमनगाशी टक्कर. बोटीला भगदाड पडून बुडु लागली.
 • १९१५: तुर्कस्तानने आर्मेनियावर आक्रमण केले.
 • १९३१: स्पेनच्या सर्वोच्च न्यायालयाने राजा आल्फोन्सो तेराव्याची हकालपट्टी केली व दुसरे स्पॅनिश प्रजासत्ताक अस्तित्त्वात आल्याचे जाहीर केले.
 • १९४०: युनायटेड किंग्डमचे सैनिक नॉर्वेतील नाम्सोस गावात शिरले व गाव काबीज केले.
 • १९४४: मुंबईच्या बंदरात उभ्या असलेल्या बोटीवर महाभयानक विस्फोट. ३०० ठार. त्याकाळच्या २ कोटी पाउंडचे नुकसान.
 • १९६२: जॉर्जेस पॉम्पिदु फ्रांसच्या पंतप्रधानपदी.
 • १९८६: अमेरिकेच्या लढाउ विमानांनी लिब्याच्या बेंगाझी व ट्रिपोली शहरांवर हल्ला केला. ६० ठार.
 • १९८६: बांगलादेशमध्ये १ किलो वजनाच्या अतिप्रचंड गारांचा वर्षाव. ९२ ठार. गारांच्या वजनाचा हा विक्रम अजुन अबाधित आहे.

जन्म (वाढदिवस, जयंती)

१४ एप्रिल रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
 • १३३६: गो-कोगोन, जपानी सम्राट.
 • १५७८: फिलिप तिसरा, स्पेनचा राजा.
 • १७४१: मोमोझोनो, जपानी सम्राट.
 • १८६६: ऍन सुलिव्हान, हेलन केलरची शिक्षिका.
 • १८९१: डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भारतीय संविधानचे शिल्पकार, मानवी हक्काचे कैवारी, अद्वितीय विद्वान
 • १९२५: एबेल मुझोरेवा, झिम्बाब्वेचा पंतप्रधान.

मृत्यू (पुण्यतिथी, स्मृती दिवस, बलिदान दिवस, शहीद दिवस)

१४ एप्रिल रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
 • १५९९: हेन्री वॅलप, इंग्लिश राजकारणी.
 • १७५९: जॉर्ज फ्रीडरीक हान्डेल, जर्मन संगीतकार.
 • १९५०: श्री रमण महर्षी, भारतीय तत्त्वज्ञ.
 • १९६२: सर मोक्षगुंडम् विश्वेश्वरैया, भारतीय अभियंता.


संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा

एप्रिल महिन्यातील दिनविशेष

नवी नोंद सुचवादुरूस्ती कळवासंदर्भ सूचीअस्वीकरण


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.